२७ जाने, २०११

अस्वस्थ करणारे प्रश्न


काल २६ जानेवारीला माझ्या एका मित्राचा मला एसएमएस आलाय.
एसएमएस असा आहे की :

- मायक्रोसॉफ़्टच्या एकुण कर्मचार्‍या पैकी ३४% भारतीय आहेत.
- इंटेलच्या एकुण कर्मचार्‍या पैकी १७% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल डॉक्टरां पैकी ३८% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल शास्त्रज्ञां पैकी १२% भारतीय आहेत.
- नासा मधिल शास्त्रज्ञां पैकी ३६% भारतीय आहेत.

याचाच अर्थ भारतीय महान आहेत पण भारत नाही ..............
कारण या बुद्धीवान भारतीयांनी केलेल्या मुर्खपणा मुळेच.
जर या बुद्धीवान भारतीयांनी भारतासाठी आपली बुद्धी वापरली असती तर आपला भारत पण महान झाला असता.

या एसएमएसच्या शेवटी भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पण हा एसएमएस वाचल्यावर मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थीत होतात..................

भारत सोडुन परदेशात गेलेल्या आपल्याच माणसांना दोष देण खरच योग्य आहे का?
ते ईथेच राहीले असते तर त्यांच्या बुद्धीमत्तेला खरच वाव मिळाला असता का?
या देशात आपली प्रगती होणार नाही अशी भावना निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?
भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करणार्‍यां पैकी किती जण संधी मिळाली तरी परदेशात, विशेषत: यु.एस.ए ला जाणार नाहीत?
जात पात धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व आणि समाज ख्ररच या देशात आहे?

असे एक ना अनेक प्रश्न मनात उभे राहीले आहेत.
मला आज तरी या विषयी मत व्यक्त करावसे वाटत नाही. पण तरीही यावर विचार व्हायला हवा या विषयी दुमत नसाव.

काय वाटत तुम्हाला?






५ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

मला आज तरी या विषयी मत व्यक्त करावसे वाटत नाही. पण तरीही यावर विचार व्हायला हवा या विषयी दुमत नसाव.... +१

Devendra म्हणाले...

प्रिय भानस, बरेच वेळा काही गोष्टींवर विचार करताना आपण त्या परिस्थितीत कसे वागलो असतो हे उमजत ही पण ते कबुल करण्याचं धाडस होत नाही. म्हणूनच विचार न करण्याची पळवाट शोधली जाते नाही का?

sharayu म्हणाले...

या पैकी कितीजण मूलभूत स्वरूपाचे काम करतात हे समजल्याशिवाय मत देता येणार नाही

Devendra म्हणाले...

खरच हा महत्वाचा मुद्दा आहे.आपण विंडोज सारखी दुसरी संगणक प्रणाली (Oparating System) तयार करु शकलो नाही हे वास्तव आहे. प्रतिक्रिये बद्दल आभार.

भानस म्हणाले...

धाडस होत नाही...म्हणजे चारचौघात बोलण्याचे धाडस होत नसेल हे वरवर खरे मानले तरीही तुम्हाला तुमच्यापासून सुटका नसतेच. तिकडे पळवाटाही नसतात आणि उसने अवसान ही नसते.

बाकी माझे काही भाव ( या सगळ्यांबद्दलचे ) तुला चांगलेच माहीत आहेत. :)