३१ डिसें, २०११

अलविदा २०११

नववर्ष शुभेच्छांसह मायबोलीकरांना नमस्कार,
येत्या काही तासात २०११ ला अलविदा करुन सर्व जग नविन वर्ष २०१२ च स्वागत करणार आहे. जाणार प्रत्येक वर्ष प्रत्येकाच्या मनात काही कडु काही गोड आणि काही न विसरणार्‍या आठवणी ठेवुन जात असत आणि त्याला हे वर्षही अपवाद करणार नाही.
या वर्षी सुरुवातीला जपानाच्या किनार्‍यावर आलेल्या त्सुनामी मुळे त्या देशाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.एखाद राष्ट्र अश्या आपत्ती मुळे कोलमडुन पडल असत पण जपानी माणसांच्या तनामनात असलेल्या प्रखर राष्ट्रवादा मुळॆ त्या राष्ट्राने स्वत:ला त्या आपत्ती मधुन लवकरच सावरले.पण अणुभट्ट्यांच्या झालेल्या नुकसानीमुळॆ त्या देशाला असलेला अणुउत्सर्जानाचा धोका मात्र अजुनही टळलेला नाही.त्या मुळॆ अणुउर्जेच्या वापराबाबत व तिच्या निर्मितीसाठी नविन अणुउर्जा प्रकल्प उभारण्या बाबत जगभरात नव्याने विचार सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने जर्मनीला २०२२ पर्यंत अणुउर्जा प्रकल्पातुन संपुर्णपणे मुक्त करण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे.जपान येथील महाभिषण ’अणुसंकटा’ नंतर हा निर्णय घेतल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणॆ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखिल अमेरिकेतील शास्त्रज्ञांना,स्वच्छ उर्जेच्या स्पर्धेत चीन अथवा भारत हे अमेरीकेपेक्षा पुढे जाता कामा नयेत असे आवाहन केले आहे .याचाच अर्थ अमेरिका वा जर्मनी या सारखी विकसीत व भांडवलशाही प्रधान राष्ट्रे ,ज्यांची उर्जेची मोठी गरज ज्या अणुउर्जे व्दारे भागते ते त्या उर्जेला, स्वच्छ उर्जेचा पर्याय शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.आपल्या देशातील जवळपास सर्वच भागात सुर्यप्रकाश भरपुर पडतो.त्याचा योग्य वापर केल्यास स्वच्छ उर्जेचा स्वस्त पर्याय उपलब्ध शकेल. या सर्वांचा विचार करता जैतापुर सारखे नविन व अतिखर्चिक अणुउर्जा प्रकल्प यांचा पुर्नविचार करण्याची गरज आहे असे निश्चितच वाटते.
ईकडे आपल्या देशात जनलोकपाल आंदोलनामुळॆ गेले वर्षभर सर्वच वातावरण ढवळुन निघाल होतं. या आंदोलनाला आश्चर्यकारक आणि अनपेक्षित पणॆ मिळालेला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद पाहता हे राष्ट्र तरुणाईच आहे याची मनाला खात्री वाटली.अर्थात सरकारने लोकसभेत मंजुर केलेलं लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजुर झालं नाही. त्या मुळॆ वर्षाच्या शेवटी लोकपाल विधेयक परत एकदा त्याच ठिकाणी येवुन पोहचल आहे ही वस्तुस्थिती आहे.पण जर देशातल्या तरुणाईचा या आंदोलनाला असाच पाठींबा कायम राहीला तर आज ना उद्या ते मंजुर झाल्या शिवाय राहाणार नाही हे निश्चित.
या वर्षी आपल्या महाराष्ट्र देशात मराठी माणसांची राजकीय ताकद पक्षभेद विसरुन सिमाभागातील मराठी माणसांच्या मागे उभी राहील्याच प्रथमताच दिसुन आलं आहे.महाराष्ट्र विधिमंडळाने बेळगाव, कारवार ,निपाणी हा सिमाभाग महाराष्ट्राचाच भाग असल्याचा दावा केंद्र सरकारकडे करुन सिमाभागातील मायबोलीकरांच्या भावनांचा आदरच केला आहे. कर्नाटक सरकारने ’आपली’ बेळगाव महानगर पालीका बरखास्त केल्याच दुख: हे निश्चितच आहे पण त्या मुळे बेळगाव व आसपासच्या भागातील मराठी माणसांच्या मनातील मराठी अस्मिता अजुनही जागृत आहे याची जाणिव उर्वरीत मराठी समाजाला पुन्हा एकवार झाली हे नाकारता येणार नाही.
वर नमुद केलेल्या ३ घटना या प्रतिनिधिक म्हणुन मी मांडल्या आहेत.या शिवाय जगात घडलेल्या अश्या अनेक घटनांच व वैयक्तीक जीवनात घडलेल्या घटनांच सावट नविन वर्षाच स्वागत करताना आपल्या प्रत्येकाचाच मनात असणार आहे. पण त्यांची प्रगट अभिव्यक्ती अनेकांनी फेसबुकवर केलेल्या अत्यंत अभ्यासु आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मधुन व्यक्त झालेली आहे.त्या मुळे फेसबुकवरच्या प्रतिक्रिया वाचताना अंर्तमुख होण्या बरोबरच मजाही आली.आजची तरूणाई तर घरातल्या माणसां पेक्षा फेसबुकवर जास्त व्यक्त होते ही आता वस्तुस्थिती आहे.त्या मुळे फेसबुक,ट्वीटर सारख्या माध्यमां मधुन व्यक्त होवु पाहाणार्‍या तरूणाईकडे सगळ्यांनीच गांभिर्याने पाहण्याची व त्यांना समजुन गरज आहे ना की त्या माध्यमांवर बंदी घालण्याची.असो.
आज आपण परत एकदा नविन वर्षाच स्वागत करायला तयार झालो आहोत.आपल्या जीवनात उद्या अधिक चांगल नक्कीच काही घडणार आहे आहे हा आशावादच नविन वर्षाच जल्लोषात स्वागत करायला आपल्याला भाग पाडत असतो. हा आशावाद म्हणजेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही का?.जगजीतसिंग-चित्रा यांची "दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है"ही गझल आपल्याला जीवनाकडे कश्या दृष्टिकोनातुन बघाव या बद्दल अर्थपुर्ण शब्दात सांगते.....
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है ....
बरसात का बादल तो दिवाना है क्या जानें
किस रांह से बचना है किस छत को भिगोंना है
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है .....
गम हो या खुशी दोनों कुछं देर के सांथी है
फिर रस्तां ही रस्तां है हसनां है या रोनां है
दुनियां जीसे कहतें है जादुंका खिलौंना है
मिल जायें तो मिट्टी है खो जायें तो सोनां है ....
तेव्हा देवाने आपल्याला दिलेल जीवन हे अमुल्य आहेच पण त्याहुन महत्वाचा आहे जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला असा दृष्टिकोन.हा दृष्टीकोनच आपल्याला दुसर्‍यांपेक्षा वेगळ ठरवत असतो. तेव्हा आपलं वेगळेपण जपतानाच दुसर्‍याचा दृष्टिकोन समजुन घेण्याचा प्रयत्न करुन पाहुया.

.

४ डिसें, २०११

हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........



देव आनंद यांच्या निधना नंतर प्रतिक्रिया देताना संगितकार खय्याम म्हणाले,
 
" देव आनंद यांच्या अचानक जाण्याने खुप धक्का बसला."  अश्याच प्रकारच्या प्रतिक्रिया खुप जणांनी दिल्या आहेत. वास्तविक पाहाता ८८ वर्षांच्या वयाच्या माणसाचं निधन म्हणजे अचानक बसलेला धक्का असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण हे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत खरं असलं तरी देव आनंद यांच्या बाबतीत लागु होतं नाही.


देव आनंद म्हणजे मुर्तीमंत उत्साह.
 
 
गेले काही वर्षे ते जितक्या उत्साहाने नविन नविन चित्रपट काढत होते तितक्याच निरुत्साहाने प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांना प्रतिसाद देत होते. पण त्याचा कुठलाही परीणाम देवसाब यांच्यावर झाला नाही. परवाच्या, कालच्या आणि आजच्या अश्या तिन पिढ्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांनी आनंद दिला आहे. आणि खात्री आहे पुढच्या पिढीलाही त्यांचे चित्रपट आनंद देणार आहेत. कारण देवसाब यांच्या चित्रपटांचा आनंद लुटायचा असेल तर अट एकच ते म्हणजे मनाने तरूण असणं.

देवसाब जीवन जगले ते काळाबरोबर.
 
त्यांनी कधिही मागच्या काळाच्या आठवणी काढुन उसासे टाकल्याचं ऐकीवात नाही. त्यांच्या जगण्याच वर्णन त्यांच्याच चित्रपटा मधिल गाण्यामधुन व्यक्त होतं. ते म्हणजे," मै जिंदगी का साथ निभांता चला गया,हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........."

१४ नोव्हें, २०११

अल्टीमेटम

 

मॅथ्यु ग्लास या लेखकाची अल्टीमेटम ही पहीलीच कादंबरी असुन ती सन २००९ मध्ये अमेरिकेत प्रकाशित झाली.

.तिचे आतापर्यंत ६ भाषात अनुवाद झाले असुन तिचा मराठीतला सुदर्शन आठवले यांनी केलेला अनुवाद मेहता पब्लिशींग हाऊस यांनी प्रकाशित केला आहे.

कादंबरीचे कथानक हे आजपासुन सुमारे ४० ते ५० वर्षानंतर घडु शकेल अश्या भविष्यसुचक घटनाचक्रांवर आधारीत आहे

. मानवाच्या विकासाच्या प्रक्रीयेत जीवनाच्या झालेल्या यांत्रिकीकरणामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होवुन समुद्र किनार्‍या जवळील वरील लोकवस्तीला लवकरच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता जगभरातील पर्यावरणाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना जाणवत आहे.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या वास्तव्यात येवु पाहाणार्‍या संकटाकडे ’बागुलबुवा’ म्हणुन दुर्लक्ष करण्यात येत आहे.जपानच्या किनार्‍यावर नुकत्याच ओढवलेल्या त्सुनामीच्या संकटामुळे तेथील लोकवस्तीची झालेली हानी व नष्ट झालेल्या अणुभट्ट्यांमुळे ओढवलेला किरणोत्सर्जनाचा धोका या कडे भविष्यामध्ये मानवाच्या विनाशास कारणीभुत ठरु पाहाणार्‍या घटनांचा इशारा म्हणुन जागतीक स्तरावर अभ्यास करण्याची निकड कधी नव्हे ती आज जाणवते आहे..

ज्यो बेंटन हा

अल्टीमेटम’ या कादंबरीचा नायक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो तोच मुळी पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची ग्वाही अमेरिकन जनतेला देवुन. त्यामुळे अर्थातच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणुन त्याची प्राथमिकता असते ती पर्यावरण रक्षणासाठी हितकारक ध्येयधोरणे व ठोस उपाययोजना अंमलात आणणे यालाच.राष्ट्राध्यक्ष होण्यापुर्वी त्याला पर्यावरणाच्या नाशामुळे झालेल्या व करावयाच्या मानवीवस्तीच्या स्थलांतर व पुर्नवसन या कामाची व्याप्ती, त्यासाठी लागणारा खर्च याची असलेली कल्पना यात आणि प्रत्यक्षात ओढवु पाहाणार संकट यात महद्‍अंतर आहे याची खरीखुरी जाणिव राष्ट्राध्यक्ष झाल्या लगेचच होते. पर्यावरणाचा प्रश्न हा एकट्या दुकट्या देशाने सोडवण्याचा प्रश्न नसुन जागतीक पातळीवर त्या बद्दल जाणिवपुर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे हे ही त्याच्या लक्षात येत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या कादंबरीचा काळ आजपासुन ४०-५० वर्षानंतरचा असुन त्या वेळी अमेरिकेची जगाला नियंत्रीत करु शकणारी महासत्ता या स्थानाला चीनने धक्का देण्यास सुरुवात केलेली असते. त्या मुळे ज्यो बेंटन याला पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी चीनचे सहकार्य घेण्याशिवाय गत्यंतरच नसते. आणि मग त्यातुन सुरु होते ती आंतरराष्ट्रीय राजकारणातील एकमेकांच्या देशांचे हितसंबंध जपण्यासाठीची स्पर्धा , त्यासाठीचे कटकारस्थान आणि या सर्वामधुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी मार्ग काढण्यासाठीची काळा बरोबरची स्पर्धा..........

या जीवघेण्या स्पर्धेत काय नसतं....

चर्चांच गुर्‍हाळ, तडजोडीचे प्रयत्न करताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, उद्याची महासत्ता असलेल्या चीन मधिल देशांतर्गत राजकारण आणि ज्यो बेंटन याच्या संयमाची कसोटी पाहाणारी पर्यावरण रक्षणाच्या लढ्याची दमछाक करणारी वाटचाल.

मॅथ्यु ग्लास यांनी हे सर्व ईतकं सुंदर पद्धतीने कादंबरीत मांडल आहे की आपल्याला आपण देखिल जणु या सर्व घटनाचक्रां मध्ये प्रत्यक्ष भाग घेत आहोत अशी अनुभुती ही कादंबरी वाचताना पदोपदी येते.

तेव्हा ही कादंबरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घटनांकडे जागरुकतेने पाहाणार्‍या व भारत-चीन या देशांमधल्या ताणतणावांकडे दक्ष राहुन पाहु शकणार्‍या सगळ्यांनी नक्कीच वाचली पाहीजे. सर्वात महत्वाच म्हणजे, कुठल्याही प्रश्नांकडे आम्हाला काय त्याचं अस न मानता जागतीकीकरणामुळे जगाच्या एका कोपर्‍यात उद्‍भवलेले संकट , मग ते मानवी असो की नैसर्गिक, दुसर्‍या क्षणी आपल्या दारात यायला आता फार वेळ नाही याची जाणिव ही कादंबरी वाचल्यावर झाल्या शिवाय राहात नाही.

*****

 

१ नोव्हें, २०११

बेळगाव,कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे .....


भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय घेत असताना बेळगाव व आसपासच्या लोकांच्या भाषिक संस्कृतीचा विचार करुन बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट केले जाईल ही भाबड्या मराठी माणसांची रास्त अपेक्षा होती. पण १ नोव्हेंबर याच दिवशी बेळगावला केंद्रसरकारने जबरदस्ती कर्नाटकला देवुन टाकले. या अन्यायाचा निषेध म्हणुन तिथले आपले मराठी बांधव गेली ५५ वर्षे दरवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात.आज सुद्धा  बेळगाव व आसपासच्या भागातील आपले मराठी बांधव काळा दिवस पाळत आहेत.  महाराष्ट्रात ते सामील होवु शकत नाहीत याची खंत व वेदना उरात ठेवुन ते कर्नाटक सरकारच्या अन्यायाचा शांततामय मार्गाने प्रतिकार करत आहेत. तेव्हा मराठी भाषा व आपली संस्कृती जपण्यासाठी चाललेले त्यांचे एकाकी प्रयत्न यांना सर्व मायबोलीकरांनी सलाम करायलाच हवा.
परदेशातील मराठी माणसं आपली संस्कृती जपण्यासाठी आवर्जुन प्रयत्न करतात याची जेव्हढी दखल व कौतुक केल जात तितकही बेळगावकरांच्या नशीबी नाही.इतकी उपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवां कडुन होवुनही त्यांच मराठी माणसांवरच प्रेम काही कमी झालेलं नाही याचा अनुभव मला स्वत:ला ऑफीसच्या कामासाठी गेलो असताना आला आहे.
बेळगावकरांच्या या लढ्याबाबत असलेल्या माझ्या निष्क्रीयतेची मला खंत आहे. तुम्हाला......

२७ ऑक्टो, २०११

मुलांनो फटाके फोडाच.....

प्रिय बालमित्रांनो,
कालची बलीप्रतिपदा व लक्ष्मिपुजन खुप फटाके फोडुन तुम्ही दिवाळी साजरी केली असेलच. या वर्षात वाढलेली प्रचंड महागाई आणि अर्थातच त्यामुळे वाढलेल्या फटाक्यांच्या किंमती यामुळे कदाचीत आई-बाबांनी नाईलाजाने कमी फटाके खरेदी केले असतील तर गोष्टच वेगळी. पण फटाके फोडल्याने होणार्‍या तथाकथित प्रदुषणाच्या नावाखाली आई-बाबांनी फटाके फोडायला मज्जाव केला असेल तर मात्र ही नक्कीच गंभिर गोष्ट आहे.
मित्रांनो तुमची पिढी टेक्नोसॅव्ही आहे. त्यामुळे विविध प्रकारची माहीती सहजगत्या तुमच्या समोर क्षणार्धात उपलब्ध होवू शकते. प्रदुषणामुळे आणि विशेष करुन विविध यांत्रिक उत्पादनांच्या वापरातुन होणार्‍या वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे आपल्या पृथ्वी वरच्या ओझोन थरात मोठ्या प्रमाणात घट होत आहे हे तुमच्या पैकी काही जणांना शिक्षकांनी शिकवलं देखिल असेल. पण तुमच्या लक्षात तुमच्या शिक्षकांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात आणुन दिली नसेलच. ती म्हणजे मोठ्या माणसांनी वर्षभर केलेल्या प्रदुषणामुळे व नैसर्गिक स्तोत्रांच्या बेसुमार वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही प्रचंड प्रमाणात आहे.त्या पुढे तुमच्या लाडक्या बाप्पाच्या मुर्तींच्या विसर्जनामुळे आणि दिवाळीचे चार दिवस तुम्ही आनंदाने फोडलेल्या फटाक्यां मुळे होणारी पर्यावरणाची हानी खुपच शुल्लक आहे. असे असुनही तुम्हाला मनापासुन आनंद देणार्‍या या या गोष्टींमुळे होणार्‍या नाममात्र प्रदुषणाचा ईतका बागुलबुवा का बर केला जातो.हे म्हणजे विकसीत देशांनी जगातील नैसर्गिक स्त्रोतांचा बेलगाम वापर करुन जास्तीत जास्त प्रदुषण करायच आणि विकसनशील देशांनी केलेल्या प्रदुषणा बद्दल कांगावा करण्या सारखच आहे.
मग आता प्रश्न पडतो की प्रदुषण नक्की कश्यामुळे होत......
जलस्त्रोतांमध्ये होणार प्रदुषण हे प्रामुख्याने वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगीक वापरामुळे निर्माण झालेलं सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये वा समुद्रामध्ये सोडल जात असल्यामुळे होत असतं. याच उत्तम उदाहरण म्हणजे दादरची चौपाटी आणि पुणे शहराला पाणी पुरवणार्‍या मुळा-मुठा नद्यांची आजची अवस्था.
कार्बनच उत्सर्जन वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पेट्रोलजन्य पदार्थांच्या अतिवापर. जगभरात, विषेश करुन गेल्या काही वर्षात आपल्या देशातही, वैयक्तीक वापरावयाच्या दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या वापरामुळे शहरातल्या व हळुहळु खेड्यातल्या देखिल हवेतील प्रदुषण वाढत आहे. तेव्हा तुमचे बाबा जेव्हा कारने ऑफीसला जातात तेव्हा ते देखिल दरदिवशी प्रदुषणात भर घालत असतात नाही का?
अणुउर्जेची गरज मानवी जीवन अधिक सुखदायी करण्यासाठी असेलही पण जेव्हा चेंबर्लीन सारख्या दुर्घटनांमुळे अथवा जपान मधल्या त्सुनामी मुळे झालेल्या अणुभट्ट्यांच्या नाशामुळे किरणोत्सर्ग होतो तेव्हा होणारं प्रदुषण इतकं भयावह आहे की अजुन कित्येक वर्षे त्या भागात व आसपासच्या भागात मानवी वस्तीला तिथे राहाणं सुरक्षित असणार नाही. हा धोका लक्षात घेवुन अनेक देशांनी नविन अणुभट्ट्या न उभारण्याचा निर्णय घेतला आहे.अणुउर्जा प्रकल्पांचा मानवी जीवनास असलेला मोठा धॊका लक्षात घेवुन जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रानं तर त्यांच्या देशातील सर्व अणुभट्ट्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा व २०२२ पर्यंत सर्वाच अणुभट्ट्या बंद करुन पर्या
यी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या देशात विद्युत निर्मीती साठी कोळश्याचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. आपल्या देशातील घनदाट व विविध प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असलेल्या जंगलांपैकी आपल्या महाराष्ट्रातल्या चंद्रपुर जिल्यातील ताडोबा हे एक जंगल आहे. त्याच जिल्ह्यात कोळशाच्या खाणींमुळे व कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणार्‍या कोळश्याच्या राखेमुळे ( coal ash) त्या जिल्ह्यातल्या जंगलातील जैविक साखळीवर (Eco System) होणार्‍या परिणामांचा आढावा कोणी कधी घेतला आहे का?. जंगलातील नष्ट झालेली जैविक साखळी परत तयार करण प्रगत मानवाला आज देखिल शक्य नाही . तर निसर्गाला देखिल ही समृद्ध जैविक साखळी परत निर्माण करायला लाखो वर्ष लागणार आहेत.
हे सर्व आपण पाहीलं ते नैसर्गिक प्रदुषणा बद्दल पण नात्या नात्यां मधल्या वाढत्या प्रदुषणाच काय?
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की प्रवासाच्या सुविधा नव्हत्या तरीही तुमचे आजी-आजोबा धडपड करत आपल्या नातेवाईकांना भेटायला वर्षातुन एकदा आवर्जुन जात असतं.तुमची आजी तर जवळपास दरवर्षी आपल्या मुलांना घेवुन तिच्या भावाच्या घरी दिवाळीला वा उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असे. त्यामुळे मामाच्या गावाला जावुन तुमच्या आई-बाबांनी त्यांच्या लहानपणी केलेल्या धमालीचे भरपुर किस्से त्यांच्याच तोंडुन अनेकवार तुम्ही ऎकले असतील. पण तुमच्या पैकी अनेक जण एकुलतं एक अपत्य असाल. तसच अनेकांच्या आई-बाबांना दुसरं भावंड नसेल. मग तुम्हाला भाऊ-बहीणींच्या व आत्या-मामा या नात्यां मधली गंमत कशी बरं कळणार. ’मामाच्या गावाला जावुला तुप रोटी खावुयाया गाण्यातली भावना कळायला मामा तर असायलाच हवा. तेव्हा मामाच नाही तर मामाच्या गावाला जावुन धमाल करण्याचा प्रश्नच कुठे येतो.
ज्या वेळी आजच्या सारख्या ई-मेल, दुरध्वनी, भमणध्वनी ( अरे हो तुम्ही इंग्रजी मिडीयम मध्ये शिकता हे विसरलोच की..... Telephone, Mobile म्हणायला हव होतं) सारख्या सुविधा नव्हत्या त्यावेळी पत्राद्वारे दुर असलेल्या जीवलगांशी संवाद साधला जात असे. त्या पत्रांतल्या हस्ताक्षरा वरुन पत्र लिहीणार्‍याची मनस्थिती व जाणवणारा भावनेतला ओलावा याचा अनुभव तुमच्या पिढीला कसा बरं येणार. तुम्ही कधी बाबाच्या ड्रॉवरमध्ये डोकावुन पाहील आहे का?. संधि मिळाली तर जरुर पाहा. तुम्हाला दिसेल की, तुमच्या बाबाला कधिकाळी अवचित आलेलं कोणा मित्राच पत्र त्यानं त्याच्या ड्रॉवर मधल्या जुन्या डायरिमध्ये चुकुन(?) ठेवुन दिलेल आहे. तेव्हा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल की एव्हढा टापटीप बाबा पण हे जुनं पत्र का बरं फाडुन टाकत नाही?
तुमच्या पैकी काही सुदैवी जणांच्या घरात आजी-आजोबा असतील. तुमचे म्हातारे आजोबा लोकलच्या गर्दीत तुमच्या आत्या आजीला दरवर्षी प्रमाणे उद्याही भाउबिजेला भेटायला जाणार असतील. त्यांची तब्येत आताश्या ठीक नसल्याने त्यांना तुम्ही त्यांचा मागच्या वर्षीच्या निश्चयाची आठवण करुन द्या बरं. मागच्या वर्षी खुप दमुनभागुन घरी आल्यानंतर आजोबांनी पुढच्या वर्षी भाउबिजेला लोकलच्या गर्दीत परत जाणार नाही असा निश्चय केला होता. त्या निश्चयाची आजोबांना आठवण करुन दिलीतच तर ते फक्त हसतील पण ते आत्या आजीकडे जाणार हे नक्की. बाबांना मात्र कामाच्या गडबडीमुळे व तुमची आत्याही दिवाळी साजरी करायला बाहेरगावी सहलीला गेली असल्याने बॅंक अकौंट मधुन मनी ट्रान्सफर व्दारे गिफ्ट देण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. पण या पैकी कोणत्या नात्यामधला ओलावा जास्त टिकला असेल बरं.
तुमचा सगळ्यात आवडता सण म्हणजे दिवाळी’.दिवाळी म्हणजे फटाके, फराळ हे तर आहेच पण मुळात तो आहे दीव्यांचा उत्सव. दिवाळीच्या दिवसात घरात देवापाशी, प्रवेशव्दाराच्या उंबरठ्याशी व परसदारातल्या तुळशीपाशी पणत्या लावणं आणि घरासमोर मांगल्याची प्रतिक असलेली रांगॊळी गृहलक्ष्मीन काढणं ही आपली मुळ परंपरा. आपला देश हा मुळात कृषिप्रधान देश त्या मुळे आपल्या या मोठ्या सणाची सुरुवात खर वसुबारसपासुन होते. या दिवशी आपल्या घरातल्या गाई-वासरांची पुजा करण म्हणजे अत्यंत आनंदाच्या क्षणी देखिल आपल्या परसदारातल्या प्राण्यांची जाणिवपुर्वक आठवण ठेवण हा सर्वोत्तम संस्कारच नाही का?. पण आताच्या ब्लॉक संस्कृतीमध्ये परसदार तर हरवलच आहे आणि त्याच बरोबर ऎन दिवाळीच्या दिवशी बाहेरगावी सहलीच्या जायच्या वाईट प्रथेमुळे देवापुढे अंधार व प्रवेशव्दाराला कुलुप लागतं. मग ती वास्तुदेवता फेंगशुई आणि वास्तुशास्त्राचे विविध उपाय करुन का प्रसन्न होणार?
मुलांनो आता एक प्रश्न तुमच्यासाठी.....
आजोबांनी अथवा आत्या-मामाने प्रेमानं दिलेल्या छोट्याश्या बिस्कीटाच्या पुड्यापेक्षा बाबांच्या क्लॅयंटने दिलेला चॉकलेटचा बॉक्स तुम्हाला जास्त आवडतो का? परक्या माणसांनी व्यावसाईक संबंधापोटी दिलेलं गिफ्ट आणि घरातल्या वडिलधार्‍यांनी मनापासुन दिलेली भेट यामधला फरक तुम्हाला समजावुन सांगण्याची जबाबदारी तुमच्या पालकांची. पण हा फरक समजावुन सांगण्यात जर ते कमी पडले तर तुमच्या कुटूंबातल्या नात्यांमध्ये निर्माण होणार्‍या मानसिक प्रदुषण मुळे होणारी हानी ही न भरुन पावणारी असेल नाही का?
तेव्हा आम्ही मोठ्या माणसांनी तुमच्या भवितव्याचा विचार न करता विविध प्रकारच प्रदुषण करायच आणि तुम्हाला मात्र प्रदुषणाचा बागुलबुवा दाखवुन छोट्या छोट्या आनंदा पासुन दुर ठेवायच हे म्हणजे मुळ दुखणं एकीकडे तर उपाय भलती कडेच अस होणार आहे. मग आता आई-बाबां कडे हट्ट करुन भरपुर फटाके फोडाच. जो पर्यंत जगातली मोठी माणसं प्रदुषण कमी करण्यासाठी स्वत: काही प्रयत्न जाणिवपुर्वक करत नाहीत तो पर्यंत तुम्हाला सुद्धा फटाके फोडण्याचा पुर्ण अधिकार आहे.
तेव्हा बालमित्रांनो तुम्हाला खुप फटाके, भरपेट फराळ आणि आजी-आजोबा, आत्या, मामा या नात्यां मधलं प्रेम आणि कौतुक मिळो याच दिवाळीच्या झुप खुप शुभेच्छा.
 

२६ ऑक्टो, २०११

दीपावली २०११

पैशाने सर्व चैनी पुर्ण होतात, पदाने व अधिकाराने समाजात प्रतिष्ठा मिळते, वयाने मान मिळतो पण मनाला खरा आनंद.......
मनाला आनंद मिळतो जेव्हा आपल्या प्रेमाच्या ( व प्रेमातल्या....) माणसांकडुन कौतुक होत आणि आठवणीने शुभेच्छा मिळतात तेव्हाच....

तेव्हा सर्व मायबोलीकरांना व त्यांच्या कुटुंबीयांना तसच माझ्या ब्लॉगवर नियमीत भेट देणार्‍या माझ्या जीवलगांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
मैत्रेय १९६४

११ ऑक्टो, २०११

तो होता म्हणुनच ........

तो त्याला पहिल्यांदा भेटला त्याला साधारण पणे २९-३० वर्षे सहज झाली असतील. तो आणि त्याची सर्व मित्रमंडळी कोजागिरीपौर्णिमा साजरी करायला भामरागडच्या जंगलात गेले होते. एका मित्राचा मोठा भाउ फॉरेस्ट रेंजर होता त्यानेच हा बेत आखला होता. भर जंगलात , तेही भामरागड सारख्या वाघाचं अस्तित्व असलेल्या जंगलात, वस्ती पासुन काहीश्या दुरच असलेल्या छोट्या मैदानात कोजागिरी साजरी करण ही कल्पनाच भन्नाट होती. आकाशातला पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश व दुध आटवण्यासाठी पेटवलेली शेकोटी एव्हडाच काय तो उजेड. त्यामुळे रेंजर साहेबांनी संरक्षणासाठी रायफली असलेले २ शिपाई सोबत दिलेले असले तरी सगळ्यांच्या मनात अनामिक भिती चोरपावलांनी शिरली होतीच. त्या मुळे सुरुवातीचे २ तास गप्पा टप्पा करण्यात गेल्या नंतर पुढे कसा वेळ घालवायचा हा प्रश्नच होता. वन्य श्वापदांची भिती असल्याने आजुबाजुला फिरायला जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यातच त्यांना त्या ठिकाणी सोडुन गेलेली जीप सकाळीच परत नेण्यासाठी येईल याची मित्राच्या फॉरेस्ट रेंजर भावाने पुर्व कल्पना दिलेली असल्याने जंगलात रात्र जागवण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ह्ळुहळु गप्पांचा आवेग कमी झाला आणि सर्व जण त्या जंगलाचाच भाग असल्या सारखे त्या जगावेगळ्या अनुभवाचा थरार अनुभव करायला लागले. त्या शांत व निरव वातावरणतला एकटेपणा अलगद्पणे सर्वांच्याच मनामध्ये झिरपत गेला आणि प्रत्येकाच जणु एक स्वतंत्र बेटच तयार झालं.
तो सुद्धा पाठीवर पडुन अंगावर झिरपणारा चंद्राचा शितल प्रकाश अनुभवत होता. त्या शितलतेमुळे त्याच्या मनातला कोलाहल कधी शांत होत गेला ते त्याला कळलच नाही. त्याच वेळी तो त्याच्या कानात ह्ळुच गुणगुणला.........
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा
कुछने कहां ये चांद है
कुछने कहां चेहरा तेरा.....
हम भी वहीं मौजुद थे
हमसे भी सब पुछा किये
हम हंस दिये हम चुप रहें
मंजुर था पर्दा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा .....
त्याला मात्र उगाचच कोणीतरी आपली चोरी पकडली अस वाटल आणि त्यानं चमकुन आजुबाजुला बघीतल. पण कोणाचच त्याच्या कडे लक्षच नव्हतं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला कारण त्याच ते गुपीत एव्हड्या लवकर मित्रांना कळावं असं त्याला वाटत नव्हतं.
तो मात्र त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता.....
ईस शहर मे किससे मिलें
हमसे तो छुठीं मेहफीलें
हर शख्स तेरा नाम ले
हर शख्स दिवाना तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
काही दिवसां पुर्वीची गोष्ट. त्याला कॉलेज मध्ये नविनच आलेली एक मुलगी आवडायला लागली होती. तिलाही तो आवडत असावा अस वाटत होत पण खात्री नव्हती. त्यामुळे मित्रांना ही गोष्ट एवढ्यात कळण ईष्ट नव्हत. त्यासाठी तो आजकाल ग्रुप पासुन थोडासा फटकुन वागत होता. आल्या-गेल्या प्रत्येक मुलींवर कॉमेंट्स पास करण हा त्याच्या ग्रुपचा अलिखीत नियम. त्या मुळे तिनं आपल्याला ग्रुप बरोबर पाहु नये याची काळजी त्यानं घेण साहाजिकच होतं.त्यातच ही नविन चिवळी जरा जास्तच लांब नाकाचीआहे असं त्याच्या ग्रुपच मत असल्याने तिची आणि ग्रुपची लवकरच चकमक उडणार हे स्पष्ट्च होत. आपल्या प्रेमाच बलीदान या चकमकीत होवु नये या साठी त्याच काळजी घेण योग्यच होतं.
कुचे को तेरे छोंडकर
जोगी ही बनजांये मगर
जंगल तेरे परबत तेरे
बस्ती तेरी सेहरा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
तो तिच्या एवढ्या प्रेमात पडला होता की एखाद्या दिवशी ’मॅडम’ दिसल्या नाहीत की त्याला फार फार उदास वाटायच. पण सांगतो कुणाला ?. त्या मुळे आपल्या ग्रुप मध्ये असुन सुद्धा त्याला अगदी ’लोन्ली’ वाटायचं. मग संध्याकाळी तिच्या गल्लीत सायकल वरुन याच्या सारख्या चकरा होत होत्या. तिच्या गल्लीतल्या मुलांना देखिल याच चकरा मारण लक्षात आल होतच त्यामुळे नजरेची ठसन देण वैगरे सुरु होत. पण पुरावा नसल्यानं या ’दादाभाईं’ना याच्यावर हात टाकता येत नव्हता.
बेदर्द सुन्नी हो तो चल
कहता है क्या अच्छी गझल
आशिक तेरा रुसवा तेरा
शायर तेरा इन्शा तेरा
कल चौदहवी की रात थी
शबभर रहा चर्चा तेरा ....
त्यातच मॅडमच वागणं. कधीकधी अशी बघायची की जैसे पसंत है मजनु तर कधि कधि ओळख नसल्या सारख पाहाणं. त्या मुळे तिच्याशी बोलायच धाडस याला होत नव्हतं. पण ही कोंडि लवकर सोडवण भाग होत कारण आज ना उद्या याच तिच्यावर ’मरणं’ ग्रुपच्या लक्षात आलच असतं. तेव्हा तिच्याशी बोलायची संधी साधणं आणि तेही ग्रुपच्या अपरोक्ष या साठी याचे आटॊकाट प्रयत्न सुरु झाले......आणि शेवटी ती वेळ आलीच. पण नको त्या वेळी.
तिची येण्याची वेळ लक्षात ठेवुन नेहमी प्रमाणे तो मित्रां बरोबर चकल्लस करत उभा होता. मुलींना या टवाळ ग्रुपची माहिती असल्याने त्यां यांच्या नेहमीच्याच कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करुन निघुन जात होत्या. इतक्यात ती अचानक समोरुन आली. यानं पळ काढण्या पुर्वीच तिच्यावर पण ग्रुपच्या कॉमेंट्स पास झाल्याच. तिने मात्र कॉमेंट ऎकुन ग्रुप कडे रागाचा कटाक्ष टाकला. याला ग्रुपमध्ये पाहुन तर तिनं त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. तिने त्याच्यावर टाकलेल्या नजरे वरुन तिला याच तिथं असणं अजिबात पसंत पडलेल नाही हे त्याच्या लक्षात आल. पण अश्या वेळी ग्रुपला सोडण म्हणजे बेईमानी झाली असती. यान तिचा नजरादेश धुडकावल्यान ती याच्याकडे तिरस्काराचा जहरीला कटाक्ष टाकुन तणतणत निघुन गेली.मग काय..... दिलके टुकडे हुवे हजार , कही ईधर तो कही उधर अशी या आशिकची हालत झाली.
अश्या प्रेमभंग अवस्थेत ’ कोजागिरी’चा कसला मुड असणार याला. पण ग्रुपसाठी आपलं सगळ दुख: विसरुन महाशय आले तर ईथे हे महाराज सारख कानात गुणगुणत बसलेले. पण खरच होत की या महाशयांच म्हणणं. तिचच तर अस्तित्व सगळीकडे जाणवत होतं. या जंगलात सुद्धा ती ईथेच कुठेतरी जवळच आहे याची अनुभुती याला होत होती हे नाकारता कसं बरं येईल.
 

१२ सप्टें, २०११

गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....


आज सकाळी साधारण ६.३० च्या सुमारास लालबागच्या राजाच गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाल आणि प्रतिमात्मक अर्थाने मुंबईतील सार्वजनिक गणेशमुर्तींच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.त्याच बरोबर पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व मानाच्या गणेशमुर्तींच देखिल एव्हाना विसर्जन झालेल आहे.त्या मुळे साक्षात परमेश्वराने आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी येण्याच्या आनंदवारीची संपुर्ण सांगता आता झालेली आहे.
या संपुर्ण उत्सवाच्या काळात भक्तीने भारलेल्या व उत्साहाच्या आवेगात काहीश्या बेशिस्त झालेल्या जनसमुहाला नियंत्रीत ठेवण्याची तारेवरची कसरत करताना कार्यकर्त्यांची आणि विशेष करुन महाराष्ट्र पोलीस दलाची मोठी कसोटी लागलेली होती.त्यातच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभुमीवर अति दक्षतेचा इशारा दिलेला असल्याने राज्यातील संपुर्ण पोलीस यंत्रणेवर प्रचंड शारिरीक आणि त्याचबरोबर न जाणवणारा मानसिक ताण आलेला होता.अर्थात याची कल्पना तुमच्या माझ्या सारख्या घरात बसुन विसर्जन सोहळयाचा टीव्हीवर आनंद लुटणार्‍‍यांना येण शक्यच नाही.
अश्या तणावपुर्ण परिस्थितीतही अहोरात्र रस्त्यावर उभे असलेले थकलेभागले पोलीस जनसामान्यांना जराही जाणिव न करुन देता शांतपणे शिस्त लावत होते.तेव्हा पोलीसांकडुन देखिल तणावाच्या परिस्थितीत कस वागायच हे शिकण्या सारख बरचं काही आहे हे लक्षात येतं.
आता आज आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा व्यवस्थित पार पडला आहे. तेव्हा श्री गणरायाच आनंदाने, उत्साहाने आणि निर्विघ्नपणे विसर्जन होण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व पोलीस यंत्रणेच आणि त्यातही रस्तोरस्ती अहोरात्र दक्ष उभ्या असलेल्या सर्व पोलीसांच आपण सर्वांनीच न विसरता निश्चितच कौतुक केल पाहीजे.

३१ ऑग, २०११

आली वारी मोरयाची.....

महाराष्ट्रात श्री पंढरीरायाच्या वारीची मोठी परंपरा आहे.ही वारी नित्यनेमाने दरवर्षी पंढरपुरला जाण्यासाठी निघत असते. अशीच एक दुसरी वारी महाराष्ट्रात आहे. पंढरीची वारी ही भक्तीची वारी आहे तर ही दुसरी वारी आनंदोत्सवाची आहे.या दुसर्‍या वारीत भक्ती नाही अस नाही पण भक्ती पेक्षाही जास्त आहे तो आनंदाचा जल्लोष. ही आनंदाची वारी आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणरायाची. ही वारी ’निघत’ नसुन ती ’येत’ असते. पंढरपुरच्या वारीत भक्तजन पंढरीरायाच्या दर्शनासाठी निघतात तर या वारीमध्ये साक्षात श्री गणराय आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतात.परमेश्वराने भक्त्यांच्या भेटीसाठी येण्याच दुसर कुठल उदाहरण मला तरी आठवत नाही.
अश्या या श्री गणरायाच घराघरात व सार्वजनिक उत्सव मंडळ्यांच्या मंडपात आज आगमन झालेल आहे.घरातील व मंडपातील उत्साही मंडळी केलेल्या सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.याच धामधुमीत आता पर्यंत सजावटीच्या कामात मदत करण्यासाठी अजीबात न फ़िरकलेली काही मंडळी या क्षणी त्यांच्या सुचनांचा भडिमार करायला उगवलेली आहेत. त्यांच्या या सुचनांचा त्रास गेले काही दिवस सतत सजावटिसाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या मंडळींना होत असल्याने चिड तर आलेली आहे. पण तरीही या आनंदोत्सवाला भांडणाच गालबोट लागु नये म्हणून शक्य तितक्या सुचना स्विकारल्या जात आहेत.वैताग येव्हडाच आहे की ही सुचना देणारी अनाहुत मंडळी अंगाला तोषीश न लावता मुकादमगिरी करत आहेत.या सगळ्यात घरातल्या छोट्या मंडळींना कस बर विसरुन चालेल. यांच्या तर कल्पनेच्या भरार्‍या विचारायलाच नकॊ. त्यांच्या सुचनाही कधी नव्हे त्या गंभीरपणे स्विकारुन त्यांचा सजावटीत आवर्जुन समावेश केला जात आहे. पण ही मंडळी जरा जादाच हौशी असल्याने त्यांची सजावटीच्या कामात लुडबूड सुरु आहे. या लुडबुडीचा त्रास सहन होत नाही पण बोलायची तर अज्याबात सोय नाही असा आहे. घरातील मुलं सजावटीच्या कामात गुंगलेली असल्याने कधी नव्हे ते घरातील समस्त महिला वर्गाला त्यांची काम निवांत पणे पार पडण शक्य होत आहे. अश्या तर्‍हेने सगळीकडे एकच धांदल सुरु आहे पण तिचा ना क्षीण ना त्रास कारण हे सगळ चालल आहे ते भेटिसाठी आवर्जुन आलेल्या लाडक्या श्री गणराया स्वागतासाठी.
एकीकडे ही धांदल तर दुसरीकडे अजुनही घरा समोरच्या रस्त्यातुन ढोल-ताश्यांच्या गजरात जात असलेल्या श्री गणरायाच्या मिरवणुका.मिरवणुकीतील ताश्यांच्या जोषपुर्ण आवाज मनातल्या मनात पावलं थिरकवत आहे.अश्या या मिरवणुकां पाहाताना त्यामध्ये  बेभान होवुन नाचणार्‍या तरूणाईची झिंग बघणार्‍यांच्या मनात पाहाता पाहाता कधी उतरते तेच कळत नाही.आणि त्याच जोषातुन मनामनात घुमतो एकच आवाज......

            बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे

५ जून, २०११

आज दि. ५ जुन २०११ (पर्यावरण दिन) रोजी मुंबईत होत असलेल्या मराठी ई-भाष्य कट्ट्येकर्‍यांच्या (Bloggers) स्नेह मेळाव्यास मन:पुर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय मराठी.


१४ मे, २०११

सांगावंसं वाटलं म्हणुन

काहीतरी पाहीलं की ...
काहीतरी वाचलं की ...
सांगावसं वाटतं ... वाटतं ना?
कुणाला तरी ... कधीतरी ...

आदिशक्ती देवीची साडेतिन शक्तिपिठं विख्यात आहेत.तद्‌वत मराठी सारस्वताची तिन जगमान्य संस्कृतीपिठं आहेत. ती म्हणजे पार्ले, डोंबिवली आणि तिसरं ... सांगायलाच हवं का, अहो पुणं. अश्या मराठी सारस्वताच्या पार्ले या संस्कृतीपिठातील काही मायबोलीकरांनी एक चांगला कार्यक्रम, खरतरं उपक्रम हाती घेतला आहे. ज्याच पहिल सादरीकरण दि. १५ एप्रिल २०११ रोजी त्यांनी डोंबिवलीत केल. या कार्यक्रमाच नाव आहे "सांगावंसं वाटलं म्हणुन" आणि निर्मिती आहे "चैत्र" यांची. हा कार्यक्रम आहे मराठी साहित्यातल्या दर्जेदार पुस्तकातील काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करण्याचा. हा कार्यक्रम सादर करणारी कोणी हौशीगवशी मंडळी नसु्न त्यातील बहुतेक जण मराठी नाट्यक्षेत्रातील तसेच दुरचित्रवाणीवरील नावाजलेली कलाकार मंडळी आहेत.ही सर्व मंडळी त्यांच्या व्यस्त व्यावसायीक दिनक्रमातुन मराठी साहित्याच्या निखळ प्रेमापोटी वेळ काढुन हा कार्यक्रम करणार आहेत.त्या मुळे हा कार्यक्रम म्हणजे फ़ावल्या वेळातला टाईमपास नसुन अतिशय गांभिर्याने व एक निश्चीत भुमिका घेवुन केलेला प्रयोग आहे हे आपण सर्वांनी आवर्जुन ध्यानात घ्यायला हवं.
"सांगावंसं वाटलं म्हणुन" हा कार्यक्रमाचा उद्देश आहे तो मराठी साहित्यावर प्रेम करणार्‍या तुमच्या आमच्या सारख्यांच वाचनवेड वाढव व त्याचबरोबर दर्जेदार पुस्तकांची आपल्याला ओळख व्हावी. त्या साठी मराठी भाषेतल्या दर्जेदार पुस्तकातल्या काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करुन मराठी साहीत्यातले काही अमृतकण मांडण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.कलावंत हे जात्याच अधिक संवेदनाशिल असतात. त्या मुळे त्यांची उत्तम साहित्याची निवड व निकष जाणुन घेण्याची उत्सुकता तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात बर्‍याच वेळा असते.अन्‌ त्याच उत्सुकते पोटी हा कार्यक्रम पाहाण्यास खरतरं मी गेलो होतो. पण अभिवाचन ऎकल्या नंतर माझ्या जाणिवा तर बदलल्याच पण त्याच बरोबर मराठी साहित्यातल दर्जेदार अस बरच काही वाचायच राहुन गेलयं हे ही लक्षात आलं. या पहिल्याच कार्यक्रमात ज्या ८ पुस्तकातील वेधक उतार्‍यांच अभिवाचन सादर केलं गेलं ती पुस्तकं म्हणजे, ३२ हार्टबीट्‍स (लेखक- प्रकाश वेलणकर), आहे मनोहर तरी (लेखिका- सुनिता देशपांडे),भोगले जे दु:ख्ख त्याला ... (लेखिका- आशा आपराद) ,गार्गी अजुन जिवंत आहे (लेखिका- मंगला आठलेकर), हे सर्व कोठुन येते (लेखक- विजय तेंडुलकर) ,किरण पाणी (लेखक- महावीर जोंधळे), माणसं (लेखक- अनिल अवचट),ऋतुचक्र (लेखिका-दुर्गा भागवत). प्रामाणिकपणे सांगायचंच झाल तर या ८ पुस्तकांपैकी अनिल अवचट यांच " माणसं " हे पुस्तक वगळता इतर कोणतही पुस्तक मी अद्याप वाचलेल नाही. पण या ८ पुस्तकांतील वेचक उतार्‍यांचे अभिवाचन ऐकल्या नंतर निवडलेलं प्रत्येक पुस्तक किती आगळ-वेगळ आणि वैशिष्टपुर्ण आहे याची कल्पना आली.त्याचबरोबर खुप चांगल आणि मनाच्या जाणिवा बदलु शकणार बरंच काही अद्यापही वाचलेलं नाही याची खंतही निश्चितच वाटली.या पुस्तकांपैकी "गार्गी अजुन जिवंत आहे "हे पुस्तक आहे गंगा किनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या स्त्रीचं तर "३२ हार्टबीट्‍स" हे पुस्तक आहे अश्या माणसाच ज्याच्या हृद्याचे प्रती मिनीट फक्त ३२ ठोके पडतात.अस असुनही हा माणुस तुमच्या आमच्या सारखंच त्याच नित्य जीवन सहजपणे जगतो आहे...पुढच्या क्षणाची खात्री नसताना.या दोन पुस्तकांवरुन अभिवाचनाच्या निवडलेल्या पुस्तकांचा दर्जा लक्षात येईल.
तेव्हा या कार्यक्रमाद्वारे वाचनवेड्या रसिकांच्या अधिक जवळ जाण्याचा व मराठी भाषेतल्या दर्जेदार साहित्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न त्युस्त तर आहेच पण त्यातुनच उद्याचे चांगल्या कार्यक्रमांना व उपक्रमांना दाद देणारे रसिक घडणार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळेच मराठी भाषेच्या निखळ प्रेमापोटी सकारात्मक विचारातुन सादर केलेल्या या कार्यक्रमाची ओळख जास्तीत जास्त मराठी माणसांना माहिती करुन देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न.या व अश्याच प्रकारच्या इतर प्रयोगशिल कार्यक्रमांची-उपक्रमांची माहित करुन देण्याचा माझ्या सारखाच सर्व ई-भाष्य कट्ट्य़ावरील मायबोलीकरांचा प्रयत्न व हेतु असला पाहीजे अस मला वाटतं.
कारण, आपण ई-भाष्य कट्टेकरी देखिल आपापल्या ब्लॉगवर लिहीतो ते मनातल काहीतरी "सांगावंसं वाटलं म्हणुन".च ना?


२० एप्रि, २०११

झलक पुस्तकाची- झुळुक अमेरिकन तोर्‍याची

लेखक :शरद वर्दे (मॅजेस्टिक प्रकाशन)
           ह्यांच ( म्हणजे अमेरिकन लोकांच) भौगोलीक अज्ञान हा तर संपुर्ण जगाचा थट्टेचा विषय झालाय. परवाच वाचलं,की युनोने एक जागतीक सर्व्हे करायचा प्रयत्न केला आणि प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन ड्रॉप केला. सर्व्हेत फक्त एकच आयटेम होता.तो म्हणजे,"उर्वरीत जगातील अन्न-तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी कोणता तोडगा अमलात आणावा ह्याबद्दलचं तुमचं प्रामाणीक मत कृपया सांगा." हा सर्व्हे फिसकटला, कारण आफ्रिकनांना "अन्न" म्हणजे काय तेच ठाऊक नव्हतं, युरोपीयांना "तुटवडा" हा शब्द माहित नव्हता. मध्यपुर्वेतल्या लोकांना "तोडगा", भारतीयांना "प्रामाणिकपणा", चिन्यांना "मत", दक्षिण अमेरिकेतल्यांला "कृपया" म्हणजे काय हेच माहित नव्हतं. आणि अमेरिकेतुन प्रतिसाद मिळाला नाही, कारण "उर्वरित जग"  म्हणजे काय हेच त्यांना ठाऊक नव्हतं.

१६ एप्रि, २०११

अल्‌मोस्ट सिंगल

मेनका प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं "अल्‌मोस्ट सिंगल" हे अनुवादीत पुस्तक नुकतच वाचण्यात आलं. पुस्तकाची लेखिका आहे अव्दैता कला तर पुस्तकाचा सुंदर अनुवाद केला आहे आषुतोश उकिडवे यांनी. जागतिकरणाच्या तथाकथीत लाटेत जगण्याची आणि संस्कृतीची एकंदरीतच परिभाषा अमुलाग्र बदलत असताना व्यक्तीं व्यक्तीं मधले संबंध देखिल बदलत जात आहेत. माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे.त्यामुळे स्त्री असो की पुरुष, दोघांवरही आपापल्या क्षेत्रात टीकुन राहाण्याच आणि यशस्वी होण्याच दडपण आहे.पुढचं युग हे सेवाक्षेत्राच आहे.या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार असुन या क्षेत्रात आज स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर आहेत.काही सेवाक्षेत्र तर अशी आहेत की त्यात स्त्रियांचा वरचष्मा आहे. त्यापैकी हॉटेल इंडस्ट्री ही सेवाक्षेत्रातली एक मोठी इंडस्ट्री आहे.या इंड्स्ट्रीला आपल्या ग्राहकांना परत परत येण्यास भाग पाडण्यास जाहिरातींपेक्षा मिळणारी सेवा हा महत्वाचा घटक आहे याची पुर्ण कल्पना आहे. त्या मुळे पंचतारांकीत हॉटेल मध्ये " गेस्ट रिलेशन मॅनेजर" या पदावर काम करताना आलेले अनुभव आणि त्यातील आव्हाने यावर लिहीलेले "अल्‌मोस्ट सिंगल" पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळी मन जरा साशंकच होत. पण पुस्तक जस जस वाचत गेलो तस तस मन प्रसन्न होत गेलं. अत्यंत सहजतेने केलेला खुसखुशित संवाद आणि त्यातुन वाचकांना नकळत अंतर्मुख करण्यातलं लेखिकेच कौशल्य याला दाद द्यायलाच हवी.पंचतारांकीत हॉटेलच्या विश्वाचा मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेतुन प्रिया तेंडुलकर यांनी घेतलेल्या धुंडोळा आपण वाचला असेलच पण त्याहुन सर्वस्वी वेगळा अनुभव नविन पिढीच्या या लेखिकेच्या मानसिकतेतुन दिसुन येतो.मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या या दोन लेखिका पण त्यांचा जगण्याकडे बघण्यातला बदललेला दृष्टीकॊन एकाच वातावरणातील अनुभव संपुर्ण वेगळेपणाने व्यक्त करतो यालाच तर दोन पिढयातील अंतर म्हणायच का?
पुस्तकाची नायिका आहे आयेशा भाटीया ,जी एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर या पदावर काम करित आहे. या पदावर काम करताना अनेक तर्‍हेवाईक बड्या ग्राहकांना आणि त्यांच्या नखर्‍यांना तिला समोर जाव लागत. याचा ताण अर्थातच तिच्या मनावर आहे. नायिकेच्या मनावरील मध्यमवर्गीय संस्कार आणि कॉस्मॉपॉलिटन जीवनशैली यातील विसंगतीला दैनंदिन जीवनात समोरे जाताना ती मात्र तिचा तोल सांभाळुन आहे. आपल्या बेधुंद वागण्याचे समर्थन करताना आपण आपले कौमार्य जपले आहे असं ती आवर्जुन सांगते. असं असलं तरी पार्ट्या, मद्य, आणि मैत्रिणीं बरोबर बेधुंद आयुष्य जगत असतानाच आपण अजुनही अविवाहीत आहोत याची खंत तिच्या मनात आहे. करियरच्या मागे धावताना अश्या प्रकारची ओढाताण होण हे आजच्या पिढीचं भागदेय आहे.अस असल तरी हे सर्व ज्या प्रकारे या पुस्तकात व्यक्त झालेल आहे त्या वरुन आजची पिढी दिसते तशी पुर्णच बेफिकीर नसुन त्यांचा जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन त्यांच्याच नजरेनं पाहाण्याची गरज आहे याची पुस्तक वाचल्यावर जाणिव होते. या पुस्तकातील एक प्रसंग जरुर सांगावासा वाटतो.
आयेशाच्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत.त्यातील एक तिच्या सारखीच अविवाहीत असुन चांगल्या जीवनसाथीच्या शोधात आहे तर दुसर्‍या मैत्रिणीचा नुकताच घटस्फोट झालेला आहे.एके दिवशी या तिघी मैत्रिणी मौजमजा करण्यासाठी पब जातात.तिथे तिच्या घटस्फोटीत मैत्रिणीला तिच्या एक्स नवरा भेटतो. त्यानंतर ती दोघ अचानक पबमधुन गायब होतात. काळजीने आयेशा रात्रभर तिच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.पण त्या मैत्रिणीचा मोबाईल बंद असतो.सकाळी त्या मैत्रिणीचाच आयेशाला फोन येतो.आयेशा त्या मैत्रिणीला काल रात्री तिच्यात आणि तिच्या एक्स नवर्‍यात काय झाल ते विचारते. मैत्रिण शांतपणे ती आणि तिच्या एक्स नवर्‍यामध्ये शारिरीक संबंध आल्याचे सांगते.त्याला ती ब्रेक-अप सेक्स अस म्हणते.हे ऐकल्यावर आयेशाला धक्काच बसतो. मैत्रिण मात्र शांतपणे तिला समजावते.ती म्हणते," काल आमच्यात जे घडलं तो निव्वळ सेक्स होता. केवळ वासनाशमन.पुरुषाला जशी गरज लागल्यावर तो भागवतो तसच बाईनं केल तर त्यात चुक काय?मी तुला खरचं सांगते आता आमच्यात कसलेही बंध उरलेले नाहीत.".थोडा विचार केल्यावर नायिकेला आपली मैत्रिण अंत:करणा पासुन आणि गांभिर्यान हे सांगत असल्याच जाणवतं.नायिका म्हणते," माझ्या मैत्रिणीच ते पोटतिडकेच म्हणणं मला पटलं.आयुष्य म्हणजे एक पुस्तकच असतं.एखाद्या उत्कंठावर्धक पुस्तकाचा शेवट जाणुन घेण्यासाठी आपण शेवटची पानं पुर्ण न वाचताच भरभर पान उलटतो. पण शेवट वाचल्यावर तुमच कुतुहल परत जागृत होत. मधली पान निट न वाचल्यानं शेवट नीट उमजला नाही अशी काहीशी भावना तुमची होते.मग शेवट निट कळण्यासाठी ती पानं परत एकदा वाचण्याचा निर्णय तुम्ही घेता.तसच माझ्या मैत्रिणीन आपल्या आयुष्याच्या या पुस्तकाची शेवटची पान परत येकदा निट वाचली आणि आयुष्यातील ते पुस्तक कायमच बंद केलं."
या प्रसंगावरुन नायिकेच्या अर्थातच लेखिकेच्या परिपक्व मनाची जाणिव आपल्याला होते आणि खुषखुशीत शैलीत लिहिलेल्या या पुस्तकाकडे जरासं गांभिर्यान पाहाव अस वाटायला लागतं.

 

१० एप्रि, २०११

वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी

"वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी" हे श्री. यशवंत रांजणकर यांनी राजहंस प्रकाशन यांच्यावतीने लिहीलेले पुस्तक नुकतेच वाचण्यात आले.वॉल्ड डिस्ने या नावाशी आपल्या सगळ्यांची अप्रत्यक्ष ओळख होते ती त्याने निर्मिती केलेल्या विविध कार्टुनपटांमुळे.डिस्नेच्या मिकी माऊस,डोनाल्ड डक,गुफी,प्लुटो यांची कार्टुन्स बघताना लहान मुलचं नव्हे तर त्यांचे आई-बाबा सुद्धा रंगुन जातात हे जगभरात दिसणारं आणि अनुभवायला येणारं सार्वत्रीक चित्र आहे.भाषा,प्रांत,देश यांच्या मध्ये जाणावणारे भेद आणि तणाव लक्षात घेता या कार्टुन्सनी घातलेली जागतीक मोहिनी हा आश्चर्याचा आणि त्याहुन अधिक म्हणजे अभ्यासाचा विषय आहे.अस असलं तरी या कार्टुन्समुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य रसिकाला मिळणारा आनंद त्याचे दैनंदिन जीवनातले ताणतणाव विसरुन जाण्यास मदत करतो हे सर्वात अधिक महत्वाच अस मला वाटतं.
डिस्नेच्या या सगळ्या कार्टुन्स मध्ये मिकी माऊस हा माझ्या सगळ्यात आवडता. मिकीचे कार्टुनपट बघताना त्या मागच्या उच्च निर्मितीमुल्यांची जाणिव नक्कीच होते पण त्यातील सफाईदारपणा साधण्यासाठी त्याच्या निर्मात्याने आणि त्याच्या कार्टुनिस्ट सहकार्‍यांनी किती कष्ट केले असतील याची जाणिव मात्र होत नाही.आणि हीच महत्वाची जाणिव माझ्या सारख्या रसिकाच्या मनात निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. या साठी श्री. रांजणकर यांनी अभ्यासलेल्या संदर्भग्रंथांची यादी त्यांनी या पुस्तकासाठी केलेले चिंतन-मनन दर्शवते तर हे पुस्तक त्यांच्या कडुन मराठी भाषेत जाणिव पुर्वक लिहुन घेण्यामागचा राजह्ंस प्रकाशन यांचा हेतु स्पष्ट होतो.
अश्या अभ्यासपुर्वक लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अभिप्राय देण्यापेक्षा किंवा त्यांचा थोडक्यात परिचय करुन देण्यापेक्षा ती मुळातुनच वाचणे अधिक योग्य अस माझ मत आहे. कारण "वॉल्ड डिस्ने - द अल्टीमेट फॅण्टसी"हे पुस्तक संपुर्ण वाचल्या नंतर मला कळलेला वॉल्ड डिस्ने आणि तुम्हाला हे पुस्तक वाचल्या नंतर कळणारा डिस्ने खुपसा वेगळा असु शकतो.पण त्याची कार्टुन्स पाहुन मला मिळणारा आनंद आणि तुम्हाला मिळणारा आनंद यात मात्र फार फरक नक्कीच नसेल.
कुठल्याही कार्टुनच्या निर्मितीच्या पुर्वी डिस्नेच्या मनात त्या कार्टुनची संकल्पना तयार असे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच काम त्याच्या स्टुडीओतल्या ईतर सहकार्‍यांच असे.डिस्ने स्व:त सफाईदार कार्टुनिस्ट नव्हता पण त्याची कल्पनाशक्ती मात्र असामान्य होती. एखादा कार्टुनपट तयार होण्या पुर्विच तो कसा व्हायला हवा याच मानसचित्र डिस्नेच्या समोर असे.त्यामुळे आपल्या सहकार्‍यां कडुन आपल्याला काय अपेक्षित आहे व ते त्यांच्या कडुन कस करवुन घेता येईल याची निर्माता म्हणुन त्याला पुर्ण कल्पना असे.असं असलं तरी सहकार्‍यांच्या सुचना योग्य वाटल्या तर त्या मनमोकळेपणाने स्विकारण्याच्या लवचिकपणा त्याच्या कडे होता.त्याचप्रमाणे त्याच्या अपेक्षे प्रमाणे एखाद्या सहकार्‍याने काम केले नाही तर तो आपल्या सहकार्‍यांवर रागवत असला तरी त्याच सहकार्‍याने एखादे काम चांगले केले तर त्याचं कौतुक करण्यात देखिल तो अवमान करत नव्हता. खर्चाची तमा न बाळगता जास्तीत जास्त उच्च दर्जाची निर्मिती करण त्याचा ध्यास असे. त्याच्या या स्वभावामुळे तो व त्याची कंपनी बर्‍याच वेळा कर्जाच्या विळख्यात सापडत असे. तरी देखिल या सर्व संकटामधुन एखाद्या फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा यशस्वी होवुन डिस्नेलॅंड सारख अव्दितिय पार्क उभ करण्याच स्वप्न त्याने पुर्ण केल ते त्याच्या निर्मितीमुल्यांशी तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळेच. त्याने आयुष्यभर बांधिलकी मानली ती फक्त प्रेक्षकांची आणि त्याच्यावर तितकच भरभरुन प्रेम केल ते ही प्रेक्षकांनीच.आज डिस्ने आपल्यात नाही पण त्याने निर्मिती केलेली कार्टुन्स ही कालातीत असल्याने त्याची आठवण कालच्या,आजच्या आणि उद्याच्याही पिढीला नेह्मीच होत राहील यात शंकाच नाही.

****************************************************
                                             कनवाळु डिस्ने
एके दिवशी वॉल्डचा माळी त्याच्या कडे खारींच्या वाढत्या उपद्रवाची तक्रार घेवुन आला. त्याने खुप मेहनत घेवुन चांगली चांगली फळझाडं लावुन त्यांची मनापासुन जोपासना केली होती.परंतु खारी काही त्या झाडांवर एक फळ टिकु देत नव्हत्या. त्या मुळे तो माळी फार वैतागला होता. त्याने शेवटी चिडुन त्या खारींचा विषारी गोळ्यांनी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला.त्याचा हा निर्णय वॉल्डच्या कानी पडताच तो शहारला आणि माळ्याला म्हणाला,"तु असं काही करु नकोस बाबा.हे करण्या पेक्षा तु अजुन जास्त झाड का लावत नाहीस? अस बघ.आपण बाजारात जाऊन फळं विकत आणु शकतो. पण बिचार्‍या खारींनी काय बरं करावं?"

****************************************************
                                                       भविष्यवेधी डिस्ने
ईतर चित्रपट निर्मात्यांपेक्षा डिस्नेनं दुरचित्रवाणीचं सुप्त सामर्थ्य आणि सुरुवातीच्या काळात असलेल्या त्याच्या मर्यादा जास्त चांगल्या प्रकार ओळखल्या होत्या.त्यामुळेच आपल्या स्टुडिओच्या व चित्रपटांच्या जाहिरातीं साठी या माध्यमाचा स्विकार करणारा तो पहिला निर्माता होता. टीव्हीवर त्याने पहिलीच मालीका सादर केली ती डिस्नेलॅंड या त्याच्या पार्क मधिल आकर्षणांची झलक आणि वर्णन करणारी.त्या वेळी रंगित टेलिव्हीजन अस्तित्वात देखिल नव्हता पण तरी देखिल या मालिकेच व त्या नंतर टीव्हीसाठी निर्माण केलेल्या ईतर सर्वच मालिकांच संपुर्ण चित्रीकरण रंगित करण्याचा निर्णय त्याने घेतला. या मुळेच ज्या लक्षावधी प्रेक्षकांनी टीव्हीवरुन "डेव्ही क्रॉकेट" ही त्याची मालिका फुकट पाहिली होती त्याच प्रेक्षकांनी या मालिकेच्या तिन्ही भागाच संकलन करुन तयार केलेला चित्रपट पैसे देवुन परत परत पाहीला.कारण एकच,छोट्या पडद्यावरचा कार्यक्र्म कृष्णधवल होता तर मोठ्या पडद्यावरचा चित्रपट हा परिपुर्ण रंगित होता.डिस्नेच्या या भविष्यवेधी वृत्तीमुळेच त्या वेळी टीव्हीवरुन कृष्णधवल सादर झालेल्या डिस्नेच्या मालिका आपण आजही रंगित स्वरुपात पाहात आहोत.

****************************************************

६ एप्रि, २०११

॥ गंगा ॥

ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक या भारताशी जिव्हाळ्याच नात जडलेल्या अभ्यासु पत्रकाराच ’गंगा’ हे पुस्तक श्री प्रकाश अकोलकर यांनी अमेय प्रकाशन, पुणे यांच्यावतीने मराठीत अनुवादीत केलेलं आहे. ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक यांनी केलेल्या गंगेच्या परिक्रमेतुन त्यांना जी गंगा गोमुख ते पार समुद्राला मिळेपर्यंत ठाईठाई दिसली याचच प्रवास वर्णन फक्त या पुस्तकात नसुन गंगेच्या बाबत सध्या जाणावणार्‍या व भविष्यात उपस्थित होणार्‍या समस्यांचा अभ्यासपुर्ण मागोवा या पुस्तकात घेतला आहे असं म्हटल तर ते वावग ठरणार नाही.
’गंगा’ हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरला जातो ते आजीच्या-आईच्या तोंडुन ऎकलेल्या विविध पौराणीक कथांमधुन. या सर्व कथांमधुन ’गंगा’ ही नदी आहे या पेक्षाही तिच दैवीपण मनावर अधिक ठसतं. तमाम भारतीयांच्या, विशेष करुन हिंदुंच्या, मनातील गंगेच हे देवतारुप भाषा-प्रांत यांच्यातील दिवसेन दिवस तिव्र व ठळक होत जाणार्‍या भेद-रेषांच्याही पलिकडचं आहे.दक्षिणेतला मद्रासी असो की उत्तरेतला भैया, पश्चिमेतला मरहट्टा असो की पुर्वेतला बाबु मोशाय या सगळ्यांच्याच मनात आहे वरदायिनी गंगेच पवित्र व पापनाशिनी देवतारुप.त्या मुळेच जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या मुखात गंगाजल पडाव या साठी घराघरात ठेवला जातो,पुजला जातो तो गंगेचा चिमुकला घडा.जीवनातील अनेक मोहांचा पाठलाग करताना व त्यांचा उपभोग घेताना माता गंगेची आठवण कदाचित होत नसेलही पण आत्म्याच्या अंतिम यात्रेला सुरुवात करताना प्रत्येक हिंदुला गंगेच हे दैवी पावित्र आपल्या सगळ्या पापांचा नाश होवून आपण परमेश्वराला सामोर जाणार आहोत याच आत्मिक समाधान मिळवुन देतं.
अश्या मनामनात रुजलेल्या गंगेची परिक्रमा करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असली तरी ती करण्याच भाग्य फार थोड्या लोकांना साध्य होत.अर्थात या भाग्यवान लोकांनी जरी परिक्रमा केली तरी त्यांचा त्या मागचा एकमेव हेतु हा धार्मिक असल्याने गंगेच्या सद्यस्थिती विषयी परखड विचार करण्याची अपेक्षा त्यांच्या कडुन पुर्ण होत नाही.अश्या वेळी ज्युलीयन हॉलिक यांच्या सारख्या अभ्यासु पत्रकाराने त्रयस्थ व निरक्षिर बुद्धीने गंगेच्या विविध रुपांचा व अवस्थांचा केलेला अभ्यास आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घातल्या शिवाय राहात नाही.त्या मुळेच ज्युलीयन हॉलिक यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेले भाष्य आपल्या भारतीय लोकांच्या मनोवृत्तीवर टिका करणारे वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येत नाही. ते म्हणतात,
" गंगा नदीला देवता मानुन तिची उपासना करणारे भारतीय ,तिच नदी इतकी प्रदुषीत कशी काय करु शकतात?आपल्या पापा पासुन मुक्ति मिळावी म्हणुन दररोज सकाळी या नदीत पवित्र स्नान करणारे लक्षावधी लोक याच नदीत मोठ्या प्रमाणावर मैला आणि औद्योगिक कचरा कसा काय टाकु धजतात?या विरोधाभासाच स्पष्टीकरण कस्म देता येईल?"
या हॉलिक यांना जाणवलेल्या या विरोधाभासाचा स्वत: पुरता शोध घेण्यासाठी त्यांनी गंगेची परिक्रमा करण्याच ठरवलं.या परिक्रमेत त्यांना गंगेची चांगली-वाईट अशी दोन्ही रुप वेगवेगळ्या ठिकाणी दिसुन आली.भुमीला सुजलाम-सुफलाम करणारी गंगा कधि कधि तांडव करत विनाश करत असलीतरी लोकांच्या मनात असलेल्या तिच्या दैवी प्रतिमेला मात्र कुठेच तडा जात नाही याच या परदेशी अभ्यासकाला मोठं आश्चर्य व कौतुक वाटतं.गंगेवर बांधलेल्या मोठ्या मोठ्या धरणांमुळे गंगेचा सातत्याने वाहाणारा जलौघ बर्‍याच ठिकाणी तिच एखाद्या नाल्यात रुपांतर करत आहे.त्यातच गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांतील वाढत्या लोकसंख्ये मुळे,शेतीसाठी सतत वाढत चाललेल्या तिच्या पाण्याच्या उपश्या मुळे , औद्योगिक कारणां मुळे मोठ्या प्रमाणात तिच्यात सोडल्या जाणार्‍या रसायनां मुळे पवित्र अश्या गंगेच पावित्र नष्ट होत आहे हे त्यांना परिक्रमेतुन दिसुन आलं. तेव्हा या व अश्या अनेक प्रकारच्या उपस्थित झालेल्या समस्यांवर उपाययोजना करताना केवळ वैद्यानिक दृष्टीकोनातुन विचार न करता गंगेच्या विषयीच्या लोकांच्या भावनांचा देखिल विचार करायलाच पाहिजे कारण गंगेतील प्रदुषण दुर करण्याचे खरे उपाय भारतीय संस्कृतीतच दडले आहेत अस हॉलिक यांनी अनुभवांती मत मांडल आहे.त्यातच ’ग्लोबल वार्मिंग’मुळे गंगेसारख्या हिमनद्यांवर होणारे भविष्यातील परिणाम हे पुढील अनेक पिढ्यांचा विचार करता अधिक चिंताजनक आहेत ज्यामुळे पाण्याचा मुळ स्त्रोत आटु शकतो याची जाणिव हॉलिक करुन देतात तेव्हा माता गंगा नष्ट होणार की काय या कल्पनेनं मन विषण्ण होतं. गंगा ही फक्त नदी नसुन ती त्याहुनही अधिक देवी आहे अशी भारतीयांची पिढ्यान पिढ्या श्रद्धा आहे. त्यामुळे तिच तिचं अस्तित्व कायम राखण्या साठी निश्चीतच काहीतरी प्रयत्न करेल या श्रद्धेने गंगेच्या अस्तित्वावर परिणाम करणार्‍या या सर्व घटनांकडे सर्व भारतीय अत्यंत उदासीन दृष्टीकोनातुन बघत आहेत असं हॉलिक यांच निरिक्षण आहे. आणि इथेच ज्युलीयन क्रॅंडॉल हॉलिक आणि आपण भारतीय यांचा गंगेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो.असं असलं तरी गंगे विषयीचा त्यांचा अभ्यास आणि त्यातुन जाणावणारा त्यांचा गंगे विषयीचा जिव्हाळा आपल्यालाही विचार करायला प्रवृत्त करतो. या जिव्हाळ्या पोटीच त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.ते म्हणतात,"गंगामातेला तिच अस्तित्व कायम ठेवण शक्यच झाल नाही किंवा तिनच तस न करण्याचा निर्णय घेतला तर काय?"
आहे का या प्रश्नाच उत्तर आपल्याकडे?.या प्रश्नाद्वारे प्रत्येक समस्या निव्वळ दैवाधिन ठेवुन चालणार नाही तर आपल्या संस्कृतीशी पिढ्यान पिढ्या निगडित असलेल्या माता गंगेच अस्तित्व निर्मळ आणि पवित्र राहाण्या साठी संपुर्ण समाज उभा राहीला पाहीजे याची जाणिव अप्रत्यक्ष्रपणे जुलियन हॉलिक आपल्याला करुन देतात. तेव्हा गंगा असो की इतर नद्या, त्या सर्वांवर मोठी मोठी धरण बांधुन आणि त्यांच्या काठी औद्योगिक विकास करुन आपण आपले पाण्याचे जलौघ कुंठीत व प्रदुषीत करत तर नाही आहोत ना ?याच्या बाबत विचार करण्याची वेळ आता आली आहे याची जाणिब करुन देणार हे पुस्तक वाचाव अशी माझी शिफारस आहे.

मैत्रेय १९६४

२७ फेब्रु, २०११

मराठी भाषा दिवस - २७ फ़ेब्रुवारी २०११



आज आपण सर्व मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत.विविध कारणाने जगभरात विखुरलेले आपण सर्व मायबोलीकर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध माध्यमांचा उपयोग करुन सहजगत्या एकमेकांशी संपर्क साधत आहोत.असे असले तरी मायबोली मराठीत चार शब्द लिहीणे आणि ते आपल्या माणसां पर्यंत पोहचवणे हा आपल्या भावना अभिव्यक्त करण्याचा सर्वांत सुंदर मार्ग आहे असं माझं मत आहे. मराठीतले ई-भाष्य कट्टे (Blogs) देखिल हाच हेतु ठेवुन लिहीले जातात. त्या कट्ट्यांवर व्यक्त केलेल्या मनमोकळ्या भावना व विचारांना तशीच दिलखुलास दाद मिळते कारण आपल्यातला समान धागा आहे तो मराठी भाषेच्या अभिमानाचा.अश्या आपल्या मायबोली मराठी बद्दल संत ज्ञानेश्वर म्ह्णतात," माझा मराठाचि बोलु कौतुके।अमृतातेही पैजा जिंके।".ईतकं सर्मपक वर्णन आणि ते ही मोजक्या शब्दात त्यांच्या शिवाय दुसरं कोणालाही करता येणार नाही.
आपल्या वर आलेलं संकट दुर व्हावं किंवा आपल्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात या साठी प्रत्येकानं देवाला काही ना काही मागणं घातलं आहे.देवाला घातलेलं आपलं मागणही आपल्या स्वत: पुरतच असतं. पण ज्ञानेश्वरांनी देवाला मागणं घातल ते सर्वांसाठी.त्या मुळेच ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागीतलेले ’पसायदान’ ही जगातली सर्वोत्कृष्ठ वैश्विक प्रार्थना ठरते आणि तिही आहे आपल्या मराठीत.तेव्हा तिच प्रार्थना आपण सर्वांनी आजच्या दिवशी म्हणणं उचित ठरेल नाही का?

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें।
येणें वाग्‌यज्ञें तोषावें।
तोषोनी मज द्यावें।
पसायदान हें॥

जें खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मीं रती वाढो।
भूतां परस्परें पडो।
मैत्र जीवाचें॥

दुरिताचें तिमिर जावो।
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो।
प्राणिजात॥

वर्षत सकळमंडळी।
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी।
भेटतु भूतां॥

चलां कल्पतरुंचे आरव।
चेतनाचिंतामणीचें गांव।
बोलते जे अर्णव।
पीयूषाचे॥

चंद्रमे जे अलांछान।
मार्तंड जे तापहीन।
ते सर्वाही सदा सज्जन।
सोयरे होतु॥

किंबहुना सर्वसुखीं।
पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।
भजिजो आदिपुरुषीं।
अखंडित॥

आणि ग्रंथोपजीविये।
विशेषीं लोकीं इयें।
दृष्टादृष्ट्विजयें।
होआवें जी॥

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो।
हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो।
सुखिया जाला॥

*** संत ज्ञानेश्वर महाराज***

२४ फेब्रु, २०११

माझा ’संकुचित’ दृष्टीकोन


माझा दृष्टीकोन संकुचित आहे हे कबुल करायला मला आता अजिबात लाज वाटत नाही.अर्थात माझा दृष्टीकोन ’संकुचित’ आहे अस म्ह्णाल्याने कोणी लगेचच तसं समजु लागेल असा भ्रम मला नाही कारण मराठी माणसं चिकीत्सक फार हे मी जाणुन आहे.तेव्हा माझ्या संकुचितपणाचे पुरावेच तुमच्या समोर मांडतो.
  • मी बाजारात गेल्यावर कटाक्षाने मराठीत बोलतो.बरेचशे भाजीवाले मराठी नसतात याची कल्पना असुनही.
  • मला समोरच्या भाजीवाल्याने मराठीत उत्तर दिलं नाही तर मी पुढच्या भाजीवाल्या कडे जातो.
  • फळवाला तर बहुदा भैयाच असतो. मग स्वत:ची तंगडतोड करुन मराठी फळवाला शोधण्याचे कष्ट घेतो.त्या मराठी फळवाल्याने मग्रुरी केली तरी मलाच गरज असल्या सारखा केवीलवाणा चेहरा करुन त्याच्या कडुनच फळं घेतो.
  • समोरच्या माणसाने " कितना बजा" असं हिंदीत विचारल तरी मराठीतुनच वेळ सांगतो. बहुतेक वेळा विचारणारी माणसं मराठीच असतात आणि नसली तरी वेळ समजल्या सारखा चेहरा करुन निघुन जातात.
  • पान खाण्याची आवड आहे पण मराठी पानवाला सापडणं दुर्मिळच.पानाशिवाय पान हालत नसल्याने त्यातल्या त्यात मराठीतुन उत्तर देवु शकणारा पानवाला शोधतो.
  • टॅक्सीवाले-रिक्षावाले पण बहुदा परप्रांतीयच असतात पण तरीही त्यांच्याशी मराठीतुनच बोलण्याचा माझा अट्टाहास असतो.
माझ्या या संकुचित वागण्याने माझी बायको वैतागते कारण ती ’ग्लोबल’ विचारांची आहे. तिचही चुक नाही म्हणा कारण माझ्या अश्या वागण्याने बरेच वेळा तिची कुचंबणा व वेळेचा अपव्यय होतो. त्या मुळे आता माझा संकुचित पणा दिवसेन दिवस वेडेपणा कडे झुकत चाललाय याची तिला आता खात्रीच पटली आहे.
या रविवारचीच गोष्ट घ्याना. आम्ही दोघ बाजारात निघालो असताना मुलीने ’द्राक्ष’ आणायला सांगितली. सध्या द्राक्ष बाजारात मुबलक असल्याने ती सहज आणू असा बायकोचा समज. बाजारात गेल्यावर पहीले भाजी वैगरे घेतली. आता ’द्राक्ष’ घेवुया म्हणुन मी पहील्याच फळवाल्याला विचारलं," द्राक्ष कशी देणार." तो बोलला," साब,अंगुर तो पच्चीस रुपय्या पाव है. मगर चालीस को आधा लेलो." त्याने सांगतलेला भाव तसा वाजवीच होता.त्या मुळे बायकॊ त्याच्या कडुन खरेदी करणार होतीच. तेव्हड्यात मी तिला आडवलं.
मी म्हणालो," थांब जरा अजुन एक दोघांना विचारु."
मी भाजी घेताना जास्त चिकीत्सकपणा करत नाही हा तिचा नेहमीचा अनुभव. त्या मुळे तिला माझ्या म्हणण्याच जरा आश्चर्यच वाटल.पण ती काही बोलली नाही.मग आम्ही दुसर्‍या फळवाल्या कडे वळलो. पुन्हा तेच . मी द्राक्ष मागतोय तर तो मात्र अंगुर बेचतोय. मग मी पण पेटलोच... मराठी माणुस आहे पेटण्या शिवाय दुसरं काय करु शकतो?.मग मी एका मागे एक 'अंगुर'वाल्यांना नाकारण्याचा सपाटाच लावला आणि बायकॊ हाताशपणे माझ्या मागे मागे " अरे ऎक,अरे ऎक." म्हणत चालत होती. एका क्षणी मात्र मला तिनं आडवलचं.
मी म्हणालो, "काय झालं".
ती म्हणाली," अरे बाजारातले जवळपास सगळे फळवाले आता विचारुन झाले."
"मग"
"मग काय.अंगुर घ्यायचे नाहीत का?"
"अंगुर काय म्हणतेस. द्राक्ष म्हण द्राक्ष."
"तेच ते."
"तेच ते काय.अं "
"बरं बाबा द्राक्ष. घ्यायची आहेत ना नक्की आपल्याला."
"मग. तुला द्राक्षवाला दिसला की घेवुया."
मग तिच्या लक्षात आल की मी का द्राक्ष घेत नाही ते.
" अरे पण .... "
" पण बिण काही नाही. जो पर्यंत द्राक्षवाला भेटणार नाही तो पर्यंत ती खरेदी करायची नाहीत."
" म्हणजे आज द्राक्ष न घेताच घरी जायचा विचार दिसतोय बहुदा."
" मिळतील गं. जरा धिर धर."
" लेक घरी वाट पाहातेय. बाबा द्राक्ष आणणार याची"
बायकोन अगदी माझ्या भावनेलाच हात घातला.मग मी विचारात पडलो.तरी उसनं आवसान आणुन म्हणालो," द्राक्ष घेवुनच घरी जायचं".
यावर बायकोन असा काही चेहरा केला की मी पण मनातुन नर्व्हसच झालो.तेव्हड्यात समोर एक फळवाला दिसला. मनातल्या मनात देवाचं नावं घेवुन हळुच त्याला विचारलं,"द्राक्ष कशी".


आता पर्यंतचे अनुभव पचवुन माझाही धीर सुटायला लागला होताच की.
तो म्हणाला," तीस रुपये पाव साहेब."
" इतना महंगा क्युं. बाकी सब तो पच्चीस रुपया पाव विक रहा है"
" नाशिकची द्राक्ष आहेत साहेब"
माझ धेडगुजरी हिंदी ऎकुन त्याला गिर्‍हाईक मराठी असल्याच समजल असावं बहुदा.
तो चक्क द्राक्ष म्ह्णला... की मलाच भास झाला हे कळेनाच. माझा झालेला गोंधळ एव्हना बायकोच्या लक्षात आला होता.
मग तिनेच विचारलं" अर्धा किलो घेणार. पन्नासला दे."
" परवडत नाही. तेव्हडी खरेदीच नाही साहेब". त्याला समोरच्या दोघां पैकी आपलं गिर्‍हाईक(?) कोण कळलं होत.
आता द्राक्ष समोर होती पण बायको मुळे व्यवहार फ़िस्कटणार याची चिन्ह दिसत होती.मीच मध्ये पडलो.
" अगं घेवुन टाक. आपल्या नाशिकची द्राक्ष आहेत. छान गोड असतात."
" अहो पण....."
" जावु दे. द्राक्ष आहेत ना मग बस झालं"
मी द्राक्ष या शब्दावर ईतका जोर दिला की बायकोला मला काय म्हणायच ते चटकन ध्यानात आल. मग तिनेही जास्त खळखळ न करता द्राक्ष घेतली.
या प्रसंगा वरुन माझ्या संकुचित दृष्टीकोनाची तुम्हाला आता खात्री पटली असेलच.आज हे सगळं तुम्हाला आवर्जुन सांगायच कारण म्हणजे आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधली एक बातमी. बातमी आहे " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटला एक वर्ष पुर्ण झाल्याची. मराठी उद्योजकांना ’ग्लोबल’ व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी डोंबिवलीतल्या दोन मराठी मुलांनी ही वेबसाइट तयार केली असुन सध्या साडेचार हजार मराठी उद्योजक या साइटला नोंदीत झाले आहेत.किमान एक लाख मराठी उद्योजकांना या साइटवर नोंदीत करायच उद्दीष्ट या वेबसाइटच आहे.ही वेबसाइट सुरु करण्याची कल्पना कुणाल गडहिरे व दीपक उमरेडकर या दोन डोंबिवलीकर तरुणांना कशी आली ते समजुन घेण्या सारखं आहे. या दोघांना एकदा चहा पिण्याची तल्लफ आली असताना त्यातील एकाने मराठी माणसाच्याच टपरीवर चहा पिण्याचा हट्ट धरला. त्या साठी टपरीचा शोध घेता घेता त्यांना शेवटी मराठी माणसाची टपरी तर सापडलीच पण मनात एक अभिनव कल्पना देखिल सुचली. त्यातुन जन्म झाला " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटचा.
हे वाचल्यावर संकुचित दृष्टिकोनातुन किती मोठी कल्पना न ध्येय निर्माण होत हे मला जाणवलं.म्हणुन मला माझ्या ’संकुचित’ दॄष्टीकोनाची लाज आता वाटत नाही कारण याच संकुचित दृष्टीकोनातुन न जाणो पुढे कधितरी एखादी भव्य कल्पना सुचेलही.
तुर्त "मराठी इन्फोलाइन"  वेबसाइटची माहीती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना करुन द्यावी ही ई-भाष्य कट्ट्यावरील समस्त मायबोलीकरांना विनंती.

आपला
मैत्रेय१९६४




२० फेब्रु, २०११

इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा

मराठी ई-भाष्य कट्ट्यांवर वेळ मिळेल तशी भटकंती मी करत असतो. ही भटकंती स्वैर असते. अस असल तरी काही कट्टे असे आहेत की ते टाळता येत नाहीत. त्या पैकी एक म्हणजे netbhet. त्या कट्ट्यावर गेलो असताना मला " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या नविन चर्चापिठाची ( Forum) माहीती मिळाली. विषय आहे " इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा ". " अमृताते पैजा जिंकी " असे ज्ञानेश्वर माऊलींनी जीचं वर्णन केल आहे ती आपुली माय मराठी संपुर्ण जगाची बोली भाषा, व्यवहार भाषा, संपर्क भाषा व्हावी असं स्वप्न आपण सर्वच पाहात असतो. हे होण्यासाठी भाषा नविन नविन शब्दांनी समृध्द व्हावी याचे जाणिवपुर्वक प्रयत्न व्हायला पाहीजेत. स्वप्नांना प्रयत्नांची साथ असेल तर आपली मराठी भाषा विश्वभाषा निश्चीत होईल. त्या मुळे " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या चर्चापिठाची सर्वांना माहिती व्हावी व जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवले जावेत असं मला मना पासुन वाटतं. माझ्या कडुन मी ब्लॉगला / Blog Spot ला " ई-भाष्य कट्टा " हा मराठी शब्द सुचवला आहे.

तेव्हा तुम्ही पण या चर्चापिठाच्या खालील दुव्याला (Link) जरुर भेट द्याव असं आवाह्न करीत आहे.

http://nathtel.blogspot.com/2011/02/blog-post_19.html

आपला
मैत्रेय१९६४

१९ फेब्रु, २०११

शिवजयंती २०११


श्री छत्रपती शिवाजी महाराज



आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणा स्थान. त्यांना त्रिवार वंदन करताना त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज अस्तित्वात आहे का याचा विचार मनात यायलाच हवा....आणि अर्थातच तसा विचार आपण सर्व मायबोलीकर आपल्या आपल्या परीने निश्वितच करत असालच.
आपल्या महाराष्ट्र राज्याची सध्याची आर्थिक, सामाजीक , भाषीक आणि त्याहुन महत्वाची म्हणजे राजकीय परिस्थिती पाहुन छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आपण विसरत चाललो आहोत की काय अशी शंका माझ्या मनात येते.त्या मुळे मी माझे महाराष्ट्र धर्मा बद्दलचे विचार खरं म्हणायच माझ्या भावना आपणा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा हा प्रयत्न आपण समजुन ( आणि सहन करुन.... ) घ्याल अशी खात्री असल्यानेच हे धाडस.

जय महाराष्ट्र जय मराठी

आपला
मैत्रेय१९६४.

*************************************

महाराष्ट्र धर्म आठवावा
वन्ही मनी चेतवावा
एल्गार पुन्हा करावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

बलीदान ते पुर्वजांचे
नित्यस्मरुनी मनामनाते
शिवराजधर्म तो जाणावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

जातपात पंथ विसरुनी
जाणावी अस्मिता महाराष्ट्राची
आण घ्यावी मायबोलीची
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

लढलो देश रक्षणासाठी
नाही कोणत्या स्वार्थासाठी
सांगावे हे अभिमानाने
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आठवावे बलिदान ते
बाजी मुरार अन तानाजीचे
धर्मनिष्ठ शंभुराजांचे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

गवतालाही फुटले भाले
फक्त याच मातीमध्ये
लक्षात नेहमीच ठेवावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आण आम्हाला शिवरायांची
वारकर्‍यांच्या भक्तीमार्गाची
याचे भान असो द्यावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

रोहीडेश्वराशी संकल्प केला
स्थापण्या राज्य मरहट्ट्यांचा
हेतु जाणावा महाराजांचा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

महाराजांचे करण्या स्मरण
नाही उत्सवा्चे प्रयोजन
नित्य करावे शिव-चिंतन
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

मावळे आम्ही महाराजांचे
जाणीव असावी मनामध्ये
सावध चित्ती सदा असावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

***************************




६ फेब्रु, २०११

आवरण



                                मुळ लेखक    : डॉ. एस.एल.भैरप्पा
                                अनुवाद         : उमा कुळकर्णी
                                प्रकाशक        : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

अनेक वेळा वाचण्याचं व्यसन म्हणुन भारंभार वाचण्याची सवय जशी मला आहे तशीच माझ्या सारख्या तुम्हा वाचनवेड्या मायबोलीकरांना देखिल आहे. पण काही पुस्तक अशी असतात ती मनाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात. अश्या मनावर प्रभाव टाकणार्‍या पुस्तकांचा वयानुसार व काळानुसार होणारा परिणाम कमी-जास्त असतो. तरुणपणी ज्या पुस्तकांनी भारवुन टाकलेलं असतं ती पुस्तक काही वर्षानंतर तितकीशी आवडत नाहीत. त्या मुळे मला असं वाटु लागलयं की योग्य वयात योग्य पुस्तक वाचायला मिळणं हे वाचक म्हणून आणि व्यक्ति म्हणुन अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हे सगळं लिहीण्याच कारण म्हणजे "आवरण" ही कादंबरी जर २५-३० वर्षां पुर्वी जर मी वाचायला घेतली असती तर कदाचित कंटाळवाणी आहे म्हणुन अर्धवट वाचुन बाजुला ठेवुन दिली असती. कादंबरीची एकंदरीत मांडणी पाहीली तर रुढार्थाने ’आवरण’ ही कादंबरी आहे असं म्हणता येणार नाही. कारण या कादंबरीच्या निमित्याने डॉ. भैरप्पा यांनी केलेले वाचन, मनन लक्षात घेतलं की लेखकाने त्याच्या अभ्यासातुन तुम्हा आम्हां वाचकांशी केलेला हा संवाद आहे हे लक्षात येतं.या कादंबरीच्या कन्नड मध्ये २२ आवृत्या आता पर्यंत प्रकाशीत झालेल्या आहेत.त्यामुळे अभ्यासातुन केलेला संवाद असेल तर त्याला वाचकांची व समाजाची दाद मिळतेच.
"आवरण"च दुसरं वैशिष्ट म्हणजे मराठी समाजाने संपुर्ण हिंदुस्तानासाठी व हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाची या कादंबरीत डॉ. भैरप्पा यांनी आवर्जुन दखल घेतलेली आहे. तेव्हा आपल्या इतिहासा बद्दल अभिमान बाळगणं काहीच गैर नाही याची पुन्हा पुन्हा खात्री पटते.सध्या मराठी माणसांना संकुचित व प्रादेशिकवादी म्हणुन हिणवण्यात अनेक विचारवंत व विषेशत:  इंग्रजी वर्तमानपत्र आघाडीवर आहेत.त्याच बरोबर सहिष्णु अश्या हिंदु धर्मावर वेगवेगळ्या मार्गाने टिका केली जात आहे. या सातत्याने होणार्‍या खोट्या प्रचाराचा हिंदु समाजावर तसेच सर्वसामान्य माणसांवर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम व त्यातील धोका ही कादंबरी वाचल्यावर जाणवतो.
या कादंबरीची नायिका मुस्लिम आहे जी पुर्वाश्रमीची हिंदु आहे. सेक्युलर विचारसरणीची ही स्त्री काही कारणाने जेव्हा भग्नावस्थेतील देवालयांच्या इतिहासाचा अभ्यास करते तेव्हा तिला जे सत्याच्ं दर्शन होतं त्याने ती भांबाहुन जाते. तिच्या या मनोवृत्तीच दर्शन घडवताना डॉ. भैरप्पा यांनी केलेली भाष्ये मुळातुनच वाचायला हवीत. असे असले तरी या कादंबरीतील काही भाष्ये आपणा साठी आवर्जुन सादर करत आहे.
  • ’ब्रिटीशांविरुध्द झगडणारा’ हे कारण पुढे करुन टिपूला राष्ट्र-नायक म्हणायचं असेल तर त्याच ब्रिटीशांविरुध्द लढणार्‍या मराठ्यांच हेच इतिहासकार आणि साहित्यीक उदात्तीकरण का करत नाहीत? आपल्या सगळ्या शत्रुंमध्ये मराठेच सर्वात बलवान आहेत हे ब्रिटीशांनी ओळखलं होतं.
  • मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतातील मुळ गावांची नाव बदलुन मुस्लिम नावं ठेवली.हिंदुंच पवित्र क्षेत्र असलेल्या प्रयागच अल्लाहबाद तर मथुरेच इस्लामाबाद हे नाव ठेवलं.
  • मलबार आणि कोडगु प्रांतात टिपूने हिंदुंच जबरदस्तीने धर्मांतर केलं.याच टिपूनं अफगाणचा राजा जमानशाहाला आणि तुर्कस्तानचा खलिफाला भारतावर आक्रमण करुन संपुर्ण देश इस्लाममय करा असं पत्र पाठवलं होत. तरी म्ह्णे टिपू धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु.
  • हिंदुस्तान,खुरास्तान , सिकीयांन या सर्व प्रदेशां मधिल असलेली मुळ बौद्ध देवालयं मुसलमानांनी नष्ट केली असं ह्यु एन त्संगनं लिहुन ठेवलयं.
  • संपुर्ण काशी मह्णजे मी,असा भार वाहात उभी आहे ती ’ग्यानवापी मशिद’. मुळचं विश्वनाथ मंदिर औरंगजेब बादशाहान फोडलं,त्याचेच खांब -भिंती वापरुन त्याच जागी १६६९ साली ही मशिद बांधली आहे.
  • काशी हे सगळ्या पंथांच प्रमुख केंद्र.काशीमध्ये जेव्हडी देवळ बांधली गेली तेव्हडी देशातल्या इतर कुठल्याही शहरात बांधली गेली नाहीत. इतर धर्माची देवळ पाडणं म्हणजेच मुसलमान धर्म अस मानणारे शतकानुशतक या काशीबर राज्य करत राहीले. इतर सर्व धर्मांचा नामशेष करण या वृत्तीच्या इस्लामनं काशीमधिल इतर पंथांच्या मंदिरांचा नाश करुन,त्या जागी मशिदी उभ्या केल्या. या काशीत अनेक घाट आहेत त्यांची नाव हनुमान घाट,नारद घाट, बाजीरावानं बांधलेला मणिकर्णिका घाट ईत्यादी अशी आहेत.हे सगळे घाट मराठयांनी आणि मराठ्यांच्या काळात बांधले गेले आहेत. जर मराठ्यांचा उद्य झाला नसता , तर काशी मुस्लिमांच्या ताब्यात राहीली असती. मग काशीला तिचं काशी असणं आणि हिंदुंना पुनर्जिवन मिळालं असतं का ?
  • मुळची काशी आता नाही.आजच्या काशीमधिल बहुसंख्य देवालय्ं,घाट ,स्मशानं मराठयांनी बांधली आहेत. मुसलमानांच्या प्रभावा खालुन काशीची सुटका करुन , देवालयांच्या जागी त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने उभारलेल्या मशिदींच्या जागी पुन्हा देवळं बांधायचा प्रयत्न प्रत्येक मराठी राज्यकर्त्यांनी आणि अधिकार्‍यांनी केला आहे.त्या साठी त्यांनी साम ,दाम ,दंडाचाही वापर केला.पण एकदा ताब्यात घेतलेली मंदिराची जागा परत द्यायला कुठल्याही मुस्लिम राज्यकर्त्याने मान्यता दिलेली नाही.
  • बनारस इंग्रजांच्या ताब्यात गेलं. इंग्रजांना हवा तेवढा पैसा आणि ईतर ठिकाणी त्यांना सैनिकी साहाय्य देवुन विश्वनाथ मंदिराची मुळची जागा मिळवण्याचा मराठयांनी खुप प्रयत्न केला. पण हिंदु आणि मुस्लिम यांच्या मध्ये सतत तेढ ठेवुन स्वत:च रक्षण करणं हे धोरण असलेल्या इंग्रजांनी हे नाकारलं. पहिल्या बाजीरावाचा हेतु तर केवळ ग्यानवापी मशिद पाडुन तिथे मंदिर उभारणं, हाच होता.
  • बाजीरावानं रामजी शिंदे यांना १७५९ मध्ये लिहीलेल्या पत्रात लिहीलयं,"शुजाउद्दौलाशी दोन-तिन गोष्टी ठरवल्या पाहीजेत. त्याच्या कडुन बनारस , अलाहाबाद , आणि अयोध्या काढुन घे. त्यानं माझ्या वडिलांना बनारस आणि अयोध्या देईन असा शब्द दिला होता.अलाहाबादेवर अजुनही चर्चा चालु आहे.त्याही बाबतीत सहजासहजी तडजोड होत असेल तर कर."
  • अकबराचा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक मुसलमान राज्यकर्त्यानं हिंदु यात्रेकरुं कडुन कर वसुल केलेला आहे. औरंगजेबाने हा कर असह्य होईल अशा पातळी पर्यंत वाढवला. त्याच्या मृत्युनंतरही तिथे आलेल्या सुभेदार, बादशहा, नवाबांनीही हे कर कमी केले नाहीत. काहीतरी करुन काशी, अलाहाबाद आणि प्रयाग आपल्या ताब्यात घेवुन हिंदुंची यात्रा सुकर करुन द्यावी म्हणून मराठे सतत प्रयत्न करत राहीले. युद्धात जिंकुन किंवा विकत घेवुन, पण ग्यानवापी मशिदीच्या जागी पुन्हा विश्वनाथ देवालय उभं करण्याचे खुप प्रयत्न मराठयांनी केले पण मुसलमानांनी ते कधिच शक्य होवु दिलं नाही.पाठोपाठ आलेल्या इंग्रजांनी मुसलमानांची बाजु घेतली. विश्वनाथ मंदिर देणार असाल तर टिपू सुलताना विरुद्धच्या युद्धात मदत करु . अशी नाना फडणविसांनी अट घातली होती. पण ती इंग्रजांनी मान्य केली नाही. त्यामुळे इंग्रज- मराठ्यांत वितुष्ट निर्माण झालं.
  • १६६९ साली औरंगजेबानं नष्ट केल्या पासुन १७७५ पर्यंत विश्वनाथ मंदिर उरलंच नव्हत.आज ग्यानवापी मशिद शेजारी असलेला छोटासा ’मंदिर’ म्हणवला जाणारा मंडप १७७५ च्या सुमारास अहिल्याबाईनी उभारला.
        (टीप : असे असुनही आपण मराठी माणसं संकुचितवादी.... शेम शेम शेम)

  • साकी मुश्ताकखान यांन औरंगजेब बादशाहाचा इतिहास लिहिलेला आहे.त्या ग्रंथाच नाव ’मासिर-ई-आलमगीरी’. दरबारात असलेल्या पुराव्या शिवाय त्यानं एकही शब्द लिहीलेला नाही. बादशाहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकार्‍यांनी काशीचं विश्वनाथ देवालयं नष्ट केलं अशी नोंद त्यानं त्याच्या ग्रंथात केली आहे.
कादंबरीच्या शेवटी नायिकेच्या तोंडुन हिंदु- मुस्लिम ऎक्याबाबत डॉ. भैरप्पा यांनी केलेल भाष्य जसेच तस देण्याशिवाय मला राहावतच नाही.

  • "हिंदु- मुसलमानां मध्ये ऎक्य निर्माण करणं हा विचार निश्चितच उदात्त आणि स्वागतार्य आहे. त्याची आज नितांत गरजही आहे. पण असत्यावर समाज उभा करणं शक्य नाही. दर वर्षी किमान पंचविस लाख हिंदु यात्रेकरु काशीला जात असतात.ज्या अपेक्षेनं आणि श्रद्धेने आपण आलो ते काशी विश्वेश्वराचं मंदिरच अस्तित्वात नसुन तिथे एक अजस्त्र मशिद उभी असल्याचं पाहुन धक्क्याने ते कोलमडुन जातात.गावी परतल्यावर आपल्या जवळपासच्या सगळ्यांना या आघाताविषयी सांगतात.अशा प्रकारची भावना मनात असताना राष्ट्रीय भावना कशी निर्माण हॊणार?. आज शाळेत शिकणार्‍या विद्यार्थां पासुन तुम्ही हे सत्य दडवुन ठेवण्यात यशस्वीही व्हाल. हीच मुलं शैक्षणीक प्रवासा साठी जातील आणि सोबत असलेल्या अध्यापकांना या संबंधी प्रश्न विचारतील. त्यावेळी त्यांनी काय उत्तर द्यावं? ही केवळ काशी- मथुरा- अयोध्येची गोष्ट नाहीये. भारतात अशी किमान तिस हजार भग्न देवालयं आहेत! हा संशोधकांनी सांगीतलेला आकडा आहे. ही सगळी देवालयं रानटी प्राण्यांनी भग्न केली असं सांगायच काय? जैन, बौद्ध , शैव, वैष्णव या परस्परांनी देवळं पाडली म्हणुन कथा निर्माण करायच्या काय?.या पैकी कुणाच्याही धर्मग्रंथांनी इतरांची देवालयं पाडावी म्हणुन सांगितलेलं नाही.कुणी समाजकंटकाने असलं काही केलं तरी त्याला आपल्या धर्माने आदर्श मानलेलं नाही. उलट इतर धर्मियांची पुजास्थळं आणि मूर्ती फोडणं,हातात तलवार घेवुन धर्माचा प्रसार करणं. जिझीया लादणं, हरलेल्यांना हजारोंच्या संख्येने गुलाम करणं या सार्‍या गोष्टी स्वत: धर्मसंस्थापकांनी केलेल्या आहेत, त्यांनाच आदर्श मानण्यात आलं आहे. कधी काळी, असंस्कृत काळी, असंस्कृत देशात केलेली कृत्यं आणि सांगीतलेला उपदेश आजच्या काळातही अनुसरण्याची मनोभुमिका असे पर्यंत तुम्ही म्ह्णता ते ऎक्य कसं शक्य आहे.? मनुसारख्याच्या मनोभुमिकांना त्याज्य ठरवुन, सर्व जण समान आहेत, या तत्वाचा स्विकार करुन आपण आपल्या देशाचं संविधान लिहीलं आहे नाही कां?त्याचप्रमाणे परधर्माचा व्देष करत स्वत:च्या प्रेषितानं सांगितलेलाच धर्म श्रेष्ठ मानुन,आपल्या धर्मात न येणार्‍यांना ठार करा असं सांगणार्‍यांच्या मनोभावाचा तिरस्कार करुन ’एकं सतविप्रा: बहुदा वदंति’ हे तत्व सगळ्यांवर कठोरपणे लादल्या शिवाय आपण ऎक्याच्या गोष्टी केल्या, तर त्या पोकळ ठरणार नाहीत काय?
डॉ. भैरप्पा यांच हे भाष्य राष्ट्राच्या एका मोठ्या समस्ये वरील अभ्यासु व निर्भिड असं भाष्य आहे.राष्ट्रीय ऎक्याच्या तथाकथीत गोष्टी करणार्‍या विचारवंतांना विचार करण्यास प्रवृत्त करणारं हे भाष्य आहे. पण विचारवंतांना विचार करायला वेळ आहे का ? त्यांनी फक्त सांगायचं, विचार तर आपण सर्वसामान्य माणसांनी करायचा असतो नाही का?
पुस्तकाच्या शेवटी कथेच्या नायीकेनं पर्यायानेच डॉ.भैरप्पा यांनी अभ्यासलेल्य़ा विविध पुस्तकांची व ग्रंथांची सुची दिलेली आहे.त्या वरुन ही कादंबरी लिहीताना केलेला अभ्यास व त्या मधुन केलेला संवाद आपल्यालाही विचार करण्यास प्रवृत्त करतो ही निश्चित.
थोडक्यात काय हिंदु म्हणुन जन्म मिळणं ,हिंदु म्हणुन जगणं आणि हिंदु असणं यांच महत्व मनावर अधोरेखित करण्यात डॉ. भैरप्पा हे यशस्वी झाले आहेत.



२७ जाने, २०११

अस्वस्थ करणारे प्रश्न


काल २६ जानेवारीला माझ्या एका मित्राचा मला एसएमएस आलाय.
एसएमएस असा आहे की :

- मायक्रोसॉफ़्टच्या एकुण कर्मचार्‍या पैकी ३४% भारतीय आहेत.
- इंटेलच्या एकुण कर्मचार्‍या पैकी १७% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल डॉक्टरां पैकी ३८% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल शास्त्रज्ञां पैकी १२% भारतीय आहेत.
- नासा मधिल शास्त्रज्ञां पैकी ३६% भारतीय आहेत.

याचाच अर्थ भारतीय महान आहेत पण भारत नाही ..............
कारण या बुद्धीवान भारतीयांनी केलेल्या मुर्खपणा मुळेच.
जर या बुद्धीवान भारतीयांनी भारतासाठी आपली बुद्धी वापरली असती तर आपला भारत पण महान झाला असता.

या एसएमएसच्या शेवटी भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पण हा एसएमएस वाचल्यावर मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थीत होतात..................

भारत सोडुन परदेशात गेलेल्या आपल्याच माणसांना दोष देण खरच योग्य आहे का?
ते ईथेच राहीले असते तर त्यांच्या बुद्धीमत्तेला खरच वाव मिळाला असता का?
या देशात आपली प्रगती होणार नाही अशी भावना निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?
भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करणार्‍यां पैकी किती जण संधी मिळाली तरी परदेशात, विशेषत: यु.एस.ए ला जाणार नाहीत?
जात पात धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व आणि समाज ख्ररच या देशात आहे?

असे एक ना अनेक प्रश्न मनात उभे राहीले आहेत.
मला आज तरी या विषयी मत व्यक्त करावसे वाटत नाही. पण तरीही यावर विचार व्हायला हवा या विषयी दुमत नसाव.

काय वाटत तुम्हाला?






१५ जाने, २०११

हेडहंटर

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात गेलो असताना "हेडहंटर" हे पुस्तक नजरेस पडल.पुस्तकाच्या नावातच काहीस वेगळेपण जाणवल्याने मनात उत्सुकता जागी झाली व ते पुस्तक घेवुन घरी आलो. जस जस हे पुस्तक वाचत गेलो तशी तशी चढत्या श्रेणीने ती उत्सुकता वाढतच गेली आणि पुस्तक वाचुन होईपर्यंत ती तशीच कायम होती. राजहंस प्रकाशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशीत केल आहे. या पुस्तकाचे नायक आहेत श्री.गिरिश टिळक जे हेडहंटींगच काम करतात.त्यांच्या या कामामधिल अनुभवांच श्री. सुमेध वडवाला (रिसबुड) यांनी या पुस्तकात शैलीदार शब्दांकन केलेल आहे.
माझ्या सारखीच आपल्या पैकी अनेकांना हेडहंटर म्हणजे काय याची पुस्तकाच्या नावावरुन कल्पना नसेल.पण उमेदीच्या काळात चांगल्या नोकरीच्या शोधात असताना किंवा अधिक चांगल्या नविन संधीच्या अपेक्षेने आपल्या पैकी अनेकांनी कुठल्या ना कुठल्या प्लेसमेंट कन्सल्टन्सी मध्ये नक्कीच नाव नोंदवल असेलच. त्याच प्रमाणे आपले ’रिझ्युमे’ सुध्दा बर्‍याच ठिकाणी पाठवलेले असतील. त्या पैकी काही प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन चांगल्या संधीही तुम्हाला उपलब्ध झाल्या असतील.
अश्या प्रकारच्या बहुतांश प्लेसमेंट कन्सल्टन्सीज काम करतात ते कंपनांना त्यांच्या गरजे नुसार मनुष्यबळ शोधुन देण्याच. पण हेडहंटरच काम हे त्याहुन फार वेगळ असत. कारण कंपन्याना मुळातच माणस लागतात ती दोन प्रकारची.एक दिलेल्या आज्ञेनुसार काम करणारी आणि दुसरी म्ह्णजे पहिल्या प्रकारच्या माणसांन करुन काम करवुन घेणारी.ही दुसर्‍या प्रकारची माणस कंपन्यांच्या दृष्टीने फारच महत्वाची असतात. कारण ही माणस असतात त्या त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व विचारपुर्वक काम करणारी मंडळी ज्यांना कंपनीतले टॉप बॉसेस किंवा डिसीजन मेकर्स अस संबोधल जात. ते जर अचानक कंपनी सोडुन गेले किंवा त्यांनी घेतलेले निर्णय चुकले तर कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहु शकतो. त्या मुळे कंपनी अश्या महत्वाच्या जागांवर तिच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी किंवा तज्ञ व्यक्ती नेमण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते.कंपन्यांना त्यांना हव्या असणार्‍या योग्य व्यक्ती शोधुन देण्याच काम जे करतात त्यांना हेडहंटर अस म्हणतात.
अश्याच एका प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन काम करता करता श्री. गिरिश टिळक यांच्यातील यशस्वी हेडहंटर कसा घडत गेला याच प्रवाही शब्दांकन म्हणजे हे पुस्तक. पुस्तक वाचल्यावर एक लक्षात येत ते म्हणजे हाती घेतलेल्या कामात झोकुन देण , त्याचा अभ्यास करण आणि त्याहुन महत्वाच म्हणजे जगात वावरताना वेगवेगळ्या व्यक्तींशी आलेले संबंध टिकवुन ठेवण ही श्री.गिरिश टिळक यांची वृत्ती अंगी बाळगण हा साधा सरळमार्गही आजच्या गळेकापु जगात यशाचा महामंत्र ठरु शकतो.
तेव्हा हेडहंटर म्हणजे काय व तो कसा घडतो हे मुळापासुन समजुन घ्यायच असेल तर हे पुस्तक संपुर्णपणे वाचण्या शिवाय दुसरा शॉर्टकट नाही.