२९ जाने, २०१२

(३)समिरा

गाडी ड्राईव्ह करताना मी शक्यतोवर फोन उचलत नाही. पण जयचा फोन ,अन तो ही सकाळी सकाळी आल्याने उचललां. खर म्हणजे मी गेला आठवडाभर जयला आज फ़ोन करु उद्या करु असा विचार करत होते. पण ते राहुनच गेलं होतं...
"हॅलो "
"हॅलो, मी बोलतोय".
मी कार ड्राईव्ह करत असल्याने त्याच्याशी जास्त बोलू शकले नाही.पण जय खुप डिस्टर्ब होता हे मला नक्कीच जाणवल होतं. मी बोलण थोडक्यात आवरल्याने जय रागावलेला दिसला. पण आत्त्ता या क्षणि काहीच करता येंण मला शक्य नव्हत. नाईलाज होता. खुप विचार करुन मग श्यामलला फ़ोन लावला. तिने जयला फ़ोन करायच कबुल केल्यान थोड बर वाटल.
ऑफ़ीसला पोहोचल्यावर जयला फ़ोन करण्याचा खुप प्रयत्न केला पण फ़ोन त्याने उचलला नाहीच.नंतर मात्र कामाच्या गडबडीत जयचा फ़ोन आला होता हे मी पार विसरुनच गेले. लंच मध्ये श्यामलचा फ़ोन आला आणि जय तिला संध्याकाळी भेटणार आहे असे तिने सांगीतलं. तेव्हा आपण जयला फ़ोन करायला विसरलो याची प्रकषाने पुन्हा एकदा जाणीव झाली.पण आत्ता एव्हड्या उशीरा फ़ोन केला तर तो जास्तच उखडला असता कारण त्याचा हळवा स्वभाव.मला त्याच्या या हळवेपणाच नेहमीच खुप आश्चर्य वाटायच. एखादा पुरुष खरचं इतका हळवा असु शकतो ?.
जयचा विचार करता करता मन एकदम ६ वर्ष मागे गेलं.कॉलेजचे मस्तीचे दिवस आठवले.कित्ती छान दिवस होते ते. कॉलेज मधला आमचा ग्रुप फ़ेमस होता. ग्रुप मधल्या आम्हा सगळ्यांचे स्वभाव इतके वेगवेगळे असुनही आम्ही नेहमीच एकत्र असायचो. मी आणि सनी कॉन्वेंट पासूनच एकत्र असलो तरी श्यामल , अवि, सिनीयर आणि जय यांची ओळख कॉलेज मध्ये आल्यानंतर झाली. त्यातचं माझ्या व सनीचे घरचे हायफ़ाय वातावरण व कॉन्वेंट मधले शिक्षण या मुळे इतर मुलांना आम्ही वेगळेच वाटत होतो. ग्रुप मधले अवि, सिनीयर आणि जय, आम्हा तिघा - मी, सनी आणि श्यामल- पेक्षा - एक वर्षाने पुढे होते. आजच्या सारख्या त्या वेळी इंजिनीयरींला मुली जास्त येत नसत.त्यामुळे असलेल्या थोड्या मुलींच्या मागे सर्वच मुलं आसण सहजीकच होत. पण माझ्या व श्यामलच्या मागे लागायच धाड्स इतर मुलांना होत नव्हत कारण सगळीच मुलं सिनीयरला टरकुन हॊती. सिनीयर अगदी रफ़ टफ़ तर जय मनस्वी व हळवा. दोघांचे स्वभाव अगदीच विरुध्द टोकाचे असुनही सिनीयर आणि जय यांची जिवलग मैत्री होती. त्यामुळॆ त्या दोघांच्या दोस्तीची आश्चर्य सगळ्यानाच, अगदी मलाही, वाटायचं. आमच्या ग्रुप मधला अवि हा बड्या बापाचा बेटा, तर श्यामल ही टीपीकल मध्यमवर्गीय घरातली. त्यामुळे आमचा ग्रुप म्हणजे इतरांना कोडच होत.
कॉलेजचा पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतोय .मी आणि सनी बरोबरच गेलॊ हॊतो. माझ्यावर खिळलेल्या मुलांच्या नजरा मला जाणवत होत्या. पण त्यांचा त्रास होण्या ऎवजी गंमतच वाटत होती. माझ्यावर खिळलेल्या नजरांन मुळे सनी मात्र जरा अस्वस्थच होता.कदाचीत येव्हड्या सर्व नजरां पासून आपल्या बाल मैत्रीणीचा कसा बचाव कराव याच त्याला दडपण आल असाव.
मी मात्र नजरांचा कुर्नीसात झेलत झेलत शांतपणे राणी सारख चालत होते.अचानक पणे माझी नजर कॅन्टीन मधे बसलेल्या एकाकडे गेली. तो माझ्याकडेच पाहात होता पण ती नजर काहीशी वेगळी होती. डोळ्यां मधे आरपार डोकवू पाहाणारी ती नजर ............
कशीबशी त्याच्या नजरेतून माझी नजर वेगळी करतच होते.... तेव्हड्यात
" अरे ए जय, कडक बघीतलीस का?".
त्याच्याच समोरचा दाढीवाला तरुण माझ्याकडे बघत म्हणाला.कोणी रोखुन बघीतल तरी मला संताप येत नसे पण कॉमेन्ट्स केलेल्या मात्र मुळीच आवडत नव्हतं.त्यामुळे माझ अस कड्कडीत स्वागत कोण करतय ते तरी बघुया म्हणुन मी त्या दोघांकडे कडे माझी पाउले वळवली.
"जावू दे समिरा, सिनीयर्स आहेत ते "
सनी माझ्या मागुन येत म्हणाला.मी मात्र तशीच पुढे गेले
"सिनीयर्स आहेत म्हणुन काय झालं. हु केयर्स?".
त्यांच्या जवळ जावून मी रागान काहीतरी बोलणार तेव्हड्यात माझी नजर परत त्याच्या कडे गेली.त्या नजरेत काय होत काय जाणे पण जे बोलायच मनात होत ते जमलच नाही. कसाबसा संताप आवरत मी दाढीवाल्याला विचारलं.
"काही म्हणालात का आपण?".
त्या दोघांनाही मी अस काही सरळच विचारेन याची कल्पना नव्हती.त्यामुळे दोघही प्रचंड गोंधळले होते. त्यांच्या चेहय्रावरचे ते भाव पाहुन मला हसुच आल. त्यांना अजुन एक धक्का द्यावा म्हणुन त्या दाढीवाल्या समोर हात पुढे करत मी म्हणाले," हाय सिनीयर, मी समिरा."
"मी सिनीयर ,सॉरी सत्यजित". स्व:ताला कसाबसा सावरत दाढीवाला म्हणाला.
त्याला तसच सोडुन मी त्याच्याकडे वळले आणि म्हणाले," हाय हॅण्ड्सम".
धक्का तर त्या दोघांनाही बसलाच पण मलाही बसला होताच की.एखाद्या मुलाला पहिल्याच भेटीत हॅण्ड्सम म्हणण माझ्या साठी पण टु मच होत.
स्वत:ला कसबस सावरत तो म्हणाला," हाय.मी अजय,पण मला तु जय म्हणालीस तर जास्त आवडेल."
त्यानंतर प्रसंगा नंतर मात्र आश्चर्यकारक गतीने आमची मैत्री वाढतच गेली..........
खरतर या जुन्या आठवणीत मी पार गुंतुनच गेले होते पण फोनच्या रींगने परत भानावर आले. क्लायंटचा फोन असल्याने त्याच्याशी बोलण्यात बाकी मग सर्व विसरुन गेले.

१६ जाने, २०१२

(2)श्यामल

सकाळीच समिराचा फोन पाहून आश्चर्यच वाट्ल. क्या बात है. या मॅड्मना सकाळी सकाळी माझी का बरे आठ्वन आली असेल ?
" मॅड्म, इस नाचिज को आज कैसे याद किया. "
" काही नाही ग, सहजच..... "
"झुठ मत बोलो यार "
"खरच सहजच फोन केला होता."
" जाने दे. कशी आहेस."
"ठीक .तु कशी आहेस सलोनी... सॉरॊ.श्यामल...."
" सॉरॊ का बरं "
" तुला सलोनी म्हणण्याचा हक्क फक्त जयचा आहे नाही का ? "
" तुझा नाही का, समु."
च्यायला हे काय चाललय. जय इथे नाही पण ...
समिराला कोणी तिला समु म्हणलेल खरतर अजिबात आवडायचं नही. अपवाद फक्त जयचा. तोच फक्त आवर्जुन अस म्हणायचा ...... फक्त तोच. समिराला त्याने तस म्हणलेल मात्र चालायच. कस काय कोण जाणे. चालायच हे मात्र नक्की.
" जावू दे , येक विनंती आहे. "
समिरा.... अन चक्क विनंती करतेय. काहीतरि नक्कीच गडबड आहे.
" हुकुम करो ,मॅड्म. "
" भंकस नको. "
" बोल"
"आत्ताच जयचा फोन आला होता. "
"खरचं, मग काय बेत आहे."
" सलोनी........ प्लिइइइइइइइइइइइइइइइइइइइइज "
"ओके. शुट "
" जय डिस्टर्ब होता. "
" मग."
" मग काय. नेहमीचच... मनातल पटकन बोलुन मोकळ व्हायचच नाही."
" जय तसाचं आहे हे तुला माहित आहे ना ? "
" माहित आहे ग. पण प्रत्येक वेळी मला अस कुरवाळून कुरवाळून बोलता येत नाही हे जयला माहित आहे ना."
मला अचानक खुद्कन ह्सायलाच आलं.
"ह्सायला काय झालं.मी सिरीयसली बोलतेय ."
" खर सांगू .माझ्या डोळ्यासमॊर तु जयला कुरवाळते आहेस अस एकदमच आलं. हाउ फ़नी.
समिरा पण खुद्कन हसली.
चला हिचा मुड्तर चांगला झाला. हेही नसे थोडसे.
"थॅंक्स.फ़ॉर मेक मी फ़िल बेटर."
" डोंट वरी.काळजी करु नकॊस मी जयकडे पाहते."
" नुस्तं पाहू नकोस........ "
" मग"
" चांगल कुरवाळ, तुझ्या पध्दतीने."
समिरा खळखळुन हसली.
" नक्कीच .कुरवाळीन बर तूझ्यावतीने."
" बाय. हॅव ए नाइस डे."
समिरा या गड्बडीत पण मॅनर्स पाळायला विसरली नाहीच. खरंच खुप संतुलीत वागणं आहे तिच. मनात कितीही खळबळ असली तरि अजिबात दाखवणार नाही. नाहितर जय. मनातले प्रत्येक तरंग त्याच्या चेहर्‍यावर कोणालाही सहज कळेल असे दिसतात.आता जास्त विचार पुरे. पाहुया जयला काय झांलय ते.....
सेलवर जयची आवडती कॉलर ट्युन वाजत होती.
अरे उचल बाबा लवकर. मलाही सकाळची घाई होतीच की......
सलोनी, व्हॉट ए प्लेझंट सरप्राइस."
" जय ,खुप बर वाट्ल तुझा आवाज ऎकुन."
"खरचं. असा कोणी स्वत:हुन आठवणीने फ़ोन केला की बरं वाटत नाही."
" जय,पण तु रे कधी मला फ़ोन करतोस."
चक....... हे बोलायची मला आत्ता काय गरज होती. शेवटी मी तरी जय पेक्षा काय वेगळी.
"सलोनी ,किमान तुला तरी अस वाट्त की मी तुला फ़ोन करावा.नाहितर ...... "
"नाहितर काय ? "
" जावूदे."
हा नक्कीच खुपच डिस्टर्ब आहे. तेव्हा चांगलच कुरवाळ लागणार अस स्पष्टच दिसतय.
काय कराव बरं. मलाही लोकल पकडायची घाई होतीच की.
" मला तुला भेटावस वाटतय रे."
" आत्ता"
जयच्या स्वरावरुनच कळल की त्याला आत्ता वेळ नाही . अर्थात हे चांगलच झाल. पण कुरवाळायच आहे ना.......
" प्लिज भेटुया ना."
तिकडे जय चांगलाच अडचणीत आलेला कळत होत.पण मग विचार केल.जास्त ताणण ठीक नाही. आणि या बाबाचा काय़ नेम ..... हो म्हणायचा.
मग मीच पट्कन बोलले." बिझी असशील तर संध्याकाळी पण चालेल. वेळ महत्वाची नाही. तुला भेटण जास्त महत्वाच आहे."
श्यामल तुस्सी ग्रेट हो. क्या कुरवाळा तुमने. लै ग्रेट. जबाब नही.
तिकडे जयने सोडलेला सुस्कारा फ़ोनवरुन पण जाणवला.
"क्यॊ नही. ये बंदा श्यामलको श्यामको जरुर मिलेगा."
काय फ़ालतू पीजे होता. एकदम बकवास. पण कुरवाळायच आहे बाब्बा ...
" यह नाचीज हुजुरकी श्यामको राह देखिगी."
खरच इतक कुरवाळायच म्हणजे.......टु मच
"नक्की भेटू. संध्याकाळी सात... इन हॉटेल लकी "
"तुझी वाट पाहीन, जय."
"डोंट वरी. मी जरुर कमिंग सलोनी"
चला .सलोनी म्हणाला . कुरवाळण्याचा फ़ायदा झाला म्हणायचा.
"बाय, मी वेळेवर पोहोचतेच."
" बाय, सलोनी, वन्स अगेन,थॅक्स फ़ॉर कॉलींग. "

१४ जाने, २०१२

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध


लेखक :डॉ. जयसिंगराव पवार
 प्रकाशक:सुमेरु प्रकाशन, डोंबिवली.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या दुख:द निधना नंतर महाराजांच्या कुटुंबातच संघर्षला सुरुवात झाली. या संघर्षात सरशी होवुन संभाजी महाराज स्वराज्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. पाठोपाठ वार्ता आली ती शहेनशाहा औरंगजेब हा प्रचंड मोठा फौजफाटा घेवुन स्वराज्यावर चालुन येत असल्याची. आणि पाहाता पाहाता सन १६८१ मध्ये ते संकट स्वराज्यावर आलंच.....
शहेनशाहा औरंगजेब हा कधिकाळी दख्खनचा सुभेदार होता.त्या मुळे त्याला दख्खनी मातीतल्या गुणदोषाची, अंतर्गत संघर्षाची आणि भौगोलीक रचनेची चांगलीच माहीती होती. तरी देखिल त्याला संभाजी महाराजांच्या रणकौशल्यामुळे सुरुवातीला म्हणावं तस यश मिळालं नाही. त्यामुळे त्याने स्वराज्य जिंकण्याचा नाद सोडुन सन १६८६ साली प्रथम आदिलशाही व नंतर कुतुबशाही नष्ट केली. त्या नंतर त्याने दख्खन मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उभ्या असलेल्या स्वराज्याकडे सर्वशक्तीनीशी आपला मोहरा परत एकदा वळवला. आणि त्याला मोठं मिळालं ते सन १६८९ मध्ये. शिर्क्यांच्या दगलबाजी मुळे छत्रपति संभाजी महाराज संगमेश्वर येथे ३ फेब्रुवारी १६८९ या दिवशी कैद झाले. त्या नंतर ठार मारण्यापुर्वी अत्यंत क्रुरतेने मराठ्यांच्या या राजाचा छळ करण्यात आला. त्या वेळी संभाजी महाराजांचे जे हाल करण्यात आले त्यांचं वर्णन आज जरी वाचलं तरी डोळ्यातुन क्रोधाच्या अंगाराचे अश्रु वाहील्या शिवाय राहात नाहीत. ठार मारल्या नंतर धर्मविर छत्रपति संभाजी महाराजांचे शिर भाल्यावर रोवुन ते उन्मादाने गावागावात फिरवण्यात आले. ज्या प्रकारे मराठ्यांच्या या राजाने अत्यंतीक हाल सोसुन आपले प्राण स्वधर्मासाठी दिले ते पाहुन त्या वेळच्या मराठी समाजाला स्वराज्यासाठी बलिदान करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रेरणेतुन जो संघर्ष सुरु झाला त्याची परिणीती क्रुरकर्मा औरंगजेबाची अखेर याच मराठी मातीत होण्यात झाली. अंतिम विजय मराठ्यांचा झाला आणि त्या नंतर उभ्या हिंदुस्थानात मराठ्यांच्या राजकीय व सामरिक वर्चस्वाला आव्हान देण्याची हिंमत कोणालाच झाली नाही.
आपल्याकडे शिवछत्रपतिंच्या व छत्रपति संभाजी महाराजांच्या कारकिर्दी बद्दल बरेच लिहीलं गेलेलं आहे.पण संभाजी महाराजांच्या बलिदाना पश्चात ज्या प्रकारे मराठे बलाढ्य अश्या मोगलां विरुद्ध एकाकी लढले त्या बद्दल त्या विषयी फारस काही लिहीलं गेलं नाही. या मुघलां विरुद्धच्या संघर्षात मराठ्यांना काही अपवाद वगळता उर्वरीत हिंदुस्थानातुन काहीही मदत झाली नाही हे बाब आवर्जुन लक्षात ठेवण महत्वाच आहे. तेव्हा या उपेक्षित, संघर्षामय व अत्यंत अभिमान वाटावा अश्या कालखंडा बाबत आजच्या मराठी समाजाला जाणिव व्हावी या हेतुने डॉ. जयसिंगराव पवार यांनी " मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे पुस्तक लिहील आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अत्यंत पराकोटीचा अभिमान असलेले माझ्या सारखे अनेक जण आहेत. या मध्ये फक्त मराठी माणसंच नसुन मराठी भाषक नसलेले पण हिंदुस्थानच्या संस्कृतीचा अभिमान असलेले अनेक जण आहेत. किंबहुना महाराष्ट्रा बाहेर आजही मराठी समाजाकडे जे काही आदराने बघितलं जातं ते आजच्या समाजाच्या कर्तुत्वामुळे नव्हे तर आपल्या पुर्वजांनी देशाच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदाना मुळे. त्यामुळे संपुर्ण मराठी समाजाने वर्तमानकाळात जगताना आपल्या इतिहासाची शक्य होईल त्या त्या मार्गाने जाणिवपुर्व माहिती करुन घेतली पाहिजे. त्या साठी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सारख्या अभ्यासु इतिहासकारांनी लिहीलेली पुस्तकं संदर्भग्रंथ म्हणुन तसंच आपल्या इतिहासा बद्दल ईतरांना माहिती करुन देण्यासाठी जरुर वाचायला हवीत.
आता थोडक्यात डॉ.पवारांच्या पुस्तका बाबत. त्यांचे "मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तक जाणिव करुन देत की,:
छत्रपति शिवाजी महाराजांच्या दुख:द निधना नंतर शहेनशाहा औरंगजेब हा प्रचंड मोठा फौजफाटा घेवुन सन १६८१ मध्ये स्वराज्यावर चालुन आला तो पासुन ते औरंगजेबाच्या सन १७०७ मध्ये मृत्यु पावतो असे २६ वर्षे मराठ्यांचे हे स्वातंत्र्ययुद्ध सुरु होते. या स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा होती ती म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या मध्ये निर्माण केलेले स्वातंत्रप्रेम व स्वराज्याभिमान. एखादा सर्वसामान्य समाज या प्रदिर्घ संघर्षात दुबळा होवुन नष्ट झाला असता. परंतु या संघर्षातुन मराठी समाज तावुन सुलाखुन व विजयी होवुन बाहेर पडला. या संघर्षा मधुन मराठी समाजाच्या चिवटपणाची, जिद्दीची, शौर्याची जाणिव मुघलांसह उर्वरीत हिंदुस्थानाला तर झालीच पण त्याहुन महत्वाच म्हणजे आपल्यातल्या स्वकर्तुत्वाची एक नवी जाणिव मराठी समाजाला पण झाली.
संभाजी महाराजांना शत्रुने पकडुन नेल्याची बातमी रायगडावर आल्यानंतर स्वत: राणी येसुबाई यांनीच अत्यंत धोरणीपणाने राजाराम महाराजांनी छत्रपति म्हणुन गादीवर बसावं असा निर्णय घेतला व पुत्रप्रेमापेक्षा स्वराज्याच हीत महत्वाचं हा संदेश सर्वसामान्य जनता व सैनिकां पर्यंत दिला. त्याच प्रमाणे राज्याभिषेका नंतर छ्त्रपति राजाराम महाराजांनी गडा बाहेर पडुन युध्द सुरु ठेवावं असा सल्ला दिला. त्यामुळे रायगड पडल्या नंतर देखिल मराठ्यांच नेतृत्व जिंजी येथे सुरक्षित राहीलं व स्वराज्याचा संघर्ष सुरुच राहीला. छ्त्रपति शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका नंतरच्या दक्षिण दिग्वीजयाच्या वेळी आपल्या चुलत भावाकडुन ताब्यात घेतलेला जिंजीचा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणुन मोठा कामी आला.
या लष्करी संघर्षात मोघलांच्या मानाने मराठ्यांकडे निश्चितच सैन्यदल आणि साधन सामुग्री कमी होतं.तरी देखिल सैन्याच्या जलद हलचाली व गनिमीकाव्याचा वापर या मुळे मराठ्यांना अंतिम विजय मिळवता आला. या संघर्षात लष्करी डावपेचांची जाणिव असलेल्या मराठी समाजाची नविन पिढी निर्माण झाली ज्यातुन अनेक पराक्रमी विर निर्माण झाले. हे स्वातंत्रयुद्ध औरंगजेबाच्या मृत्यु नंतर संपले. पण या संघर्षातुन पुढे आलेल्या या पराक्रमी विरांनी पुढील काळात मराठी राजसत्तेचा विस्तार पेशवा बाजीरावाच्या काळात नर्मदेपार नेण्यात मोठी भुमिका पार पाडली.
मोगल-मराठे संघर्षाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे मराठ्यांच्या बाजुने हे लोकयुद्ध होतं तर मोगलांच्या बाजुने बादशाही युद्ध. मराठे लढले ते स्वराज्याच्या व स्वधर्माच्या संरक्षणासाठी. त्या मुळे छ्त्रपती राजाराम हे दुरप्रांतात जिंजी येथे असुनही इकडे महाराष्ट्रात सर्वसामान्य मराठी जनता कोणत्याही वैयक्तीक लाभाची अपेक्षा न ठेवता शत्रुशी लढत राहीली.
स्वातंत्र्य हा मानवी समाजाचा मुलभुत हक्क आहे.त्या मुळे स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा असणं व ते स्वातंत्र्य ते टिकवण्यासाठी प्रयत्न करण यातुन अनेक वेळा संघर्ष झाल्याच जगाच्या इतिहासात दिसुन आलेलं आहे. दुसर्‍या समाजाच स्वातंत्र्य हिरावुन आपले वर्चस्व प्रस्थापीत करु पाहाणार्‍या सत्ताधिशांचा अखेर पराभवच होतो. या संघर्षात मराठे हे स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्यामुळे अंतिम विजय त्यांचाच झाला.
वर सारांशाने दिलेल्या माहिती व्यतिरीक्त ईतर बर्‍याच गोष्टी"मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" हे पुस्तक वाचल्या नंतर नव्याने आपल्याला कळतात . तेव्हा या पुस्तकातुन बोध घेण्यासारख खुप काही आहे याची अल्पशी जाणिव करुण देण्याचा माझा हा प्रयत्न आपणास आवडावा ही ईच्छा.
जय महाराष्ट्र जय मराठी.
(सन १७६१ च्या १४ एप्रिललाच पानीपतचं तिसरं युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाल होतं. या युद्धात मराठ्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करुया व त्यात प्राणार्पण केलेल्या ज्ञात-अज्ञात विरांना वंदन करुया.)

६ जाने, २०१२

(१)जय

आजचा दिवस काहीसा विचित्रच होता. उठल्यापासून सगळच चुकत होत. मित्रांबरोबर कालची पार्टी चांगलीच रंगल्याने झोपायला रात्रीचे बारा-साडेबारा झाले होते.त्यामुळे सकाळी उठायला खुप उशिर झाला. त्यातच आज ऑफ़ीसला प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन असल्याने उशिरा जाउन पण चालणार नव्हतं. चहा ,आंघोळ जेमतेम उरकली आणि कस बस तयार होवून ऑफ़ीसला पोहोचलो. लिफ़्ट्ला समोर शर्मा उभा होता. मला बघताच..... " काय घाट्या " अशी हाक त्याने मारली.साल्याला किती वेळा सांगीतलं की अशी हाक मारु नकोस... पण भैया सुधरतचं नाही.
माझ्याही मनात कितीवेळा यायच की, आपण सुध्दा त्याची " अरे ओ लखनवा,काहासे आवत हो." अशी हाक मारुन चेष्टा करावी. पण साले संस्कार आडवे येतात ना?. माझ्या एक मात्र लक्षात आलंय की मोना बरोबर असली की साल्याला चेवच येतो......
शर्माचे बोलण ऎकुन मोना फ़िदीफ़िदी हसली.त्यामुळे जास्तच वाईट वाटलं. अकलेच्या आणि कामाच्या नावानं बोंब असलेली मोना, ति़च्यातली ही उणीव तोकडे कपडे घालून ती झाकत होती. किती विचित्र वाटत ना ,एखादी उणीव झाकायला दुसरी उणीव मग ती कपड्यांची का असेना कामी येते ते.पण मोना कशिही असली तरी स्वभावाने वाईट नव्हती. तिने सुध्दा शर्माला साथ द्यावी......... यु ब्रुटस 
या सगळ्यामुळे ऑफिस मध्ये शिरताना माझ्या चेहरा चांगलाच वैतागलेला दिसत असावा.कारण पंढरी प्युन पण म्हणाला " साहेब,रस्त्यात कोणाशी राडा झाला काय?" .च्यायला, माझा चेहरा ईतका बोलका का बरं. जरा मनातल लपवता येत नाही. नाहीतर तो साला शर्मा , बॉसने भोसडल तरी चेहरा असा की जस काही त्याला इन्क्रिमेंट द्यायच बॉसने कबुल केल आहे...
अरे हे मन काय भरकटत चाललय.आजच्या महत्वाच्या प्रेझेंटेशनचा विचार सोडुन सारखा शर्माचाच विचार का बरं करतो आहे.काहितरी चुकतय नक्कीच. कोणाशी बोललं तर बर वाटेल? गेल्या ७-८ दिवसापासुन समिराशी बोलणच झालेल नाही. तिच्याशी बोललो तर ...
"हॅलो "
"हॅलो, मी बोलतोय"
"काय रे ? आत्ता या वेळी फ़ोन केलास."
"बिझी आहेस का ? "
"नाही रे, कार ड्राईव्ह करतेय "
"असु दे ,नंतर फ़ोन करतो."
"जय. काही झालय का ? डिस्टर्ब आहेस का ?"
च्यायला ही मनकवडी आहे की माझाच आवाज पार पडलाय.
"जावु दे ना, नंतर फ़ोन करतो."
"ठीक आहे,बाय."
हीला कळल होतं ना मी डिस्टर्ब आहे. मग फ़ोन ठेवायची घाइ का ? जाउदे ,गेली उडत.
साल आता कोणाशी बोलाव आणि मन मोकळ करावं तेच उमजत नाही.पण मन असच भरकटत राहील तर प्रेझेंटेशन कस करणार.जाने दो जो होगा सो देखा जायेगा......
"हाय, जय"
"कोण अवि, सकाळी सकाळी इकडे कसा?"
"बापाच्या कामासाठी आलो होतो म्हटल तुला भेटाव"
"कसा आहेस"
"उडता पंछी हु. बस उड रहा हु . कभी यहा कभी वहा ."
"तेरा क्या साला,तुझे क्या चिंता. बापने ढेरो पैसा जो कमा के रखा है."
"जाने दे यार.अच्छा. तेरा क्या चल रहा है.समिरासे चक्कर अभीभी चालु है या नही."
याने पण माझ्या दुखती रग वर मिठ छिडकावं ना.साला आजचा दिवस खरच वाईट आहे.
थोड्यावेळाने आला तसा अवि निघुन गेला.खर तर तो आला की नेहमी मन हलक होत पण आज.........
अवि गेला पण जाता जाता मनात वादळ मात्र निर्माण करुन गेला.या समिराच नाव कधिही निघाल की मनात काहुर का बर येत कोण जाणे. समिरात आणि माझ्यात काहीतरी नक्कीच सुरु आहे अस कॉलेज मध्ये असल्या पासुन आमच्या ग्रुपमधिल सगळ्याच वाटत होत....पण तस खरच काही होत?
समिराच माहित नाही पण मी मात्र तिला पहिल्यांदा कॉलेजमधे पाहील्या पासूनच तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचा स्व:ता बद्दलचा आत्मविश्वास तिच्या सुंदर चेहर्‍यावर जरा जास्तच खुलुन दिसायचा. त्या मुळे तिचा मनमोकळा स्वभाव असुनही कोणालाही तिचा गैरफायदा घेण्याच धाडस होत नसे.तसच कोणत्याही कठीण प्रसंगात ती विचलीत होत नसे याच तर आमच्या ग्रुपमध्ये फ़ार कौतूक होत. मलाही कदाचीत तिचा हाच गुण जास्त भावला असावा. पण.....
आतातर मुड पारच गेला होता.तेव्हड्यात अचानक सेल वाजला. काय कट्कट आहे ? कोण असेल बरं...
आयला चक्क सलोनी.काय योगायोग आहे.....

३ जाने, २०१२

नेहमीचेच " लो-लाईट्स"

सिडनी कसोटीमध्ये काय चाललय हे पाहण्यासाठी सकाळी उठल्यावर टि.व्ही. लावला. पाहतो तर काय आपली बॅटींग सुरु होती. २ विकेट्स अगोदरच गेलेल्या होत्या आणि सेहवाग- सचिन खेळत होते. हे पाहिल्यावर पुढच्या दुर्दैवाची कल्पना यायला हवी होती पण आशा सुटत नाही हे खरंच.
त्या दोघांची बॅटींग बघताना लवकर कोण आऊट होईल हे ह्याचा विचार करत होतो. तेव्हड्यात सेहवाग बाद झाला. मग पाठोपाठ लक्ष्मण. त्या नंतर मात्र थोड्यावेळ सचिन- कोहलीच्या जोडीने काही काळ वेळ घेतला. मग कोहली आउट झाला. अर्थात त्या नंतर आशा टिकवुन ठेवणं फारच अशक्य झाल्यानं टि.व्ही बंद केला आणि हताश होवुन निमुट्पणे ऑफीसला जाण्याची तयारी केली. घरातुन बाहेर पडताना मात्र माझेच खांदे श्रीनाथ सारखे पडलेले होते.
आज लोकल १०-१५ मिनीट उशिरा होत्या त्यामुळे प्लॅट्फॉर्मवर चांगलीच गर्दी होती. त्यामुळे लोकलध्ये चढताना चांगलच अंगमर्दन झाल. अंग चोरत चोरत आत ग्रुपपाशी पोहचाव लागल्याने एक मात्र झालं ते म्हणजे पडलेले खांदे परत एकदा सरळ झाले. एव्हाना लोकलने वेग पकडलेला असल्याने गच्च भरलेल्या बरणीमध्ये हालवुन हालवुन शेंगदाणे भरतात तशी डब्यातली गर्दी सेटल झाली होती. त्या मुळे माझ्या एका मित्राला घरी फोन करुन स्कोर विचारण्याची अवदसा सुचली. अवदसाच म्हणायची नाहीतर काय?. कारण त्याच्या वडिलांनी स्कोर सांगितल्यावर तो असा काही ओरडला की आजुबाजुचे सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. मी मात्र शांतपणे विचारलं, सचिनने ५० तरी केल्या का रे?.मग मात्र मित्र माझ्यावर भडकलाच. खरतर तो स्वत:वर चिडला होता कारण त्याने स्कोर विचारला नसता तर ऑफीस मध्ये जाई पर्यंत सचिन अजुन खेळतोय या भ्रमात त्याचा प्रवासाचा वेळ चांगला गेला असता. सचिन गेला म्हटल्यावर खरतर पुर्वी आमच्या चर्चा रंगायच्या पण आज सगळे गप्पच होते. ना कोणाला सचिनच शंभराव शतक न झाल्याची हळहळ वाटली ना तो कसा आऊट झाला ते जाणुन घेण्याची ईच्छा.
नंतरचा दिवस नेहमी सारखाच गेला. घरी आल्यावर आजचे ’हायलाईट्स’ सॉरी आपल्या टीमचे लो-लाईट्स शांतपणे पाहीले. काय नविन होतं त्यात?. लाल चेरीला खेळपट्टीवर जरा जास्त उसळी मिळाली आणि हवेत तो जरा स्वींग व्हायला लागला की विकेटच्या मागे असलेल्या क्षेत्ररक्षकांना झेलचा सराव देण हा उपचार नेहमी प्रमाणे या वेळीही यथासांग पार पडला. सिडनीची आजची खेळपट्टी सकाळी काही प्रमाणात बॉलरना साथ देत होती हे मान्य केलं तरी त्या वर आपल्या तथाकथित बलाढ्य फलंदाजीला तोंड देणं अवघड होतं अस काही दिसलं नाही. आपले पहिले सहाही फलंदाज आऊट झाले ते त्यांच्या कर्माने आणि त्यातले सेहवाग-सचिन थोडेफार टीकले ते दैवाची साथ असल्याने. आपल्या कोणाही फलंदाजांच्या देहबोलीत त्याला टिचुन फलंदाजी करायची आहे असा आत्मविश्वास दिसुन आला नाही. याचाच अर्थ मागच्या मेलबोर्न कसोटीतल्या अनुभवातुन आपल्या महान फलंदाजांनी काहीही धडा घेतलेला नाही.
मॅग्रा आणि वॉर्न यांच्या सारख्या महान बॉलरना सामना करताना राहुल,लक्ष्मण आणि सचिन या त्रईने या पुर्वी सातत्याने दाखवलेलं टेंपरामेंट त्यांच्या दोनही कसोट्यां मधल्या खेळींत अजुन तरी जाणवलं नाही. अर्थात अजुनही सचिनच्या बॅटची मधली तार जेव्हा छेडली जाते तेव्हा येणारा मधुर आवाज आणि त्या पाठोपाठ सिमारेषे धाव घेणारा बॉल पाहाताना तितकीच मजा येते. राहुल द्रविड्च्या बॅटवर डोक आपटुन-आपटुन निराश होणारी रेड चेरी आणि दमले भागलेले बॉलर पाहाताना कसोटी क्रिकेट्चा खरा चार्म आजही कळतो. लक्ष्मणची सहज सोपी शैलीदार फलंदाजी बघताना एखादा चित्रकार ब्रशचे सपासप फटकारे मारुन जस चित्र साकारतो तशी त्याची खेळी वाटते. पण......
आता सचिनच्या खेळीत रागाची झलक दिसते पण संपुर्ण राग काही रंगत नाही. आता द्रविडच्या बॅटला सहजपणे चकवुन बॉल स्टंप विखरुन टाकतात. आता चित्र संपुर्ण साकार होण्यापुर्वीच लक्ष्मणची खेळी अचानक संपुन जाते.
या महान फलंदाजांच अपयश सहनही होत नाही ना पाहावतं नाही. त्यातच टी २० च्या अतिरेकामुळे गुणवत्ता असलेली दुसरी फळी एकतर दुखापतीमुळे संघात आत बाहेर असते किंवा त्यांच्या तंत्रात त्यामुळे मुलभुत दोष निर्माण होतात. याचाच परिणाम म्हणुन परदेशात झालेले सलग ५ पराभव आणि ६ व्या पराजयाच्या उंबरठ्यावर आज उभ्या असलेल्या भारतीय संघाला पाहुन कसोटी क्रिकेटवर मनापासुन प्रेम करणार्‍यांना फार वेदना होतात.
आज आपल्या टिमने उणीपुरी ६० षटकं सुद्धा खेळुन काढलेली नाहीत. तर झहिरच्या अप्रतिम ’डोकेबाज’ बॉलींग मुळे पहिल्या ३ विकेट्स पटापट गमावुनही, आजी-माजी कर्णधारांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसा अखेर भक्कम स्थितीत आहे. खेळपट्टीच एकंदर स्वरुप बघता ऑस्ट्रेलियाला भरपुर धावसंख्या उभारायला काहीच अडचण येउ नये.
तेव्हा भारताला ही कसोटी आता वाचवायची असेल तर सचिनच्या १०० व्या शतकाची जेव्हडी आवश्यकता आहे तितकीच द्रविड आणि लक्ष्मणच्या मॅरेथॉन भागिदारीची. ऐकताय ना रे बाबांनो.

२ जाने, २०१२

भंपकपणा दुसरं काय.....

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये " मुंबई टाईम्स यूथ आयकॉन " म्हणुन यंदा धनुषची निवड झाल्याची बातमी आली आहे. ती बातमी वाचली आणि कपाळाला हातच मारला. एकुण १० जणां मधुन एकाची यूथ आयकॉन म्हणुन निवड करायची होती. सुशिल कुमार, संदिप शिरोडकर, नचिकेत बर्वे , युवराज वाक्मिकी ,अंकिता राणे, अक्षय वर्दे, विद्या बालन , पल्लवी सुभाष, धनुष आणि अधिक कदम या दहाजणां मधुन एकाची निवड sms व्दारे करायची होती. त्या पैकी "कोलावरी" फेम धनुषची निवड महाराष्ट्रातल्या तरुणाईने केली आहे. आपला मराठी समाज हा जितका विरत्वाचा पुजक आहे तितकाच सरस्वतीचा देखिल पुजक आहे.बर्‍या-वाईटाची चांगली जाण असणारा हा समाज सामाजिक सुधारणांचा स्विकार देखिल तत्परतेने करतो.महाराष्ट्र टाईम्स वाचणारी बहुतांश तरुण मंडळी ही निश्चितच मायबोलीकर तरुणाई असणार हे सांगायला नकोच. तेव्हा मराठी समाजाचाच भाग असणारी तरुणाई समंजसपणे विचार करणारी असेल अशी अपेक्षा होती. त्या मुळे श्री. अधिक कदम या काश्मिर मध्ये राहुन काश्मिरी मुलींच्या संगोपनासाठी आयुष्य वेचणार्‍या तरुणाची निवड "मुंबई टाईम्स यूथ आयकॉन " म्हणुन होईल अशी आशा होती. पण त्या ऐवजी "व्हाय धिस कोलावरी" फेम धनुषची निवड तरुणाईने केली आहे.
ज्या " कोलावरी" गाण्यामुळे धनुषची निअड झाली आहे या गाण्यातल्या ना शब्दांना अर्थ ना त्याच संगित ग्रेट.तरीही ते गाण आजच्या तरुणाईला का आवडल हा मोठा प्रश्न आहे. समाज शास्त्रज्ञ त्यांच्या परीने काहीतरी कारण नक्कीच शोधतील.पण माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विचाराल तर एकच उत्तर येईल ते म्हणजे,"जेव्हा जगणंच निरर्थक होतं तेव्हा निरर्थक गोष्टीच आवडु लागतात दुसरं काय".
अधिक कदम हा सर्वसामान्य मराठी कुटूंबात वाढलेला तरुण काश्मिर सारख्या प्रदेशात प्रत्यक्ष जावुन काम करतोय जेथे ईतर जण  फक्त मौज मजेसाठी जातात.भारतचं नंदनवन असलेलं काश्मिर आजही भारताचा भाग असण्यात मोठा वाटा निश्चितच आपल्या सेनादलांचा आहे आणि त्याच बरोबर दुसर्‍या कोणाचा असेल तर तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करुन विधायक काम करणार्‍या अधिक कदम यांच्या सारख्या ध्येयवादी माणसांचा.
तेव्हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तरुणाईचा "यूथ आयकॉन" असावा ’अधिक कदम’ ना की ’धनुष’.





१ जाने, २०१२

१ जानेवारी २०१२

"We will open a new book which it's pages are blank and we are going to put words on them...... ."
"The book is called Opportunity and it's pages is new year's every day...."
So ,start to fill ur book with words of success and best of what is in life....."
********* HAPPY NEW YEAR 2012 ********

मला नविन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खुप sms आले त्यात आलेला हा एक छान आणि समर्पक sms. याच मराठीत भाषांतर करण्याचा खुप खट्याटोप केला पण त्यात मुळ sms ची मजा काही आली नाही नाही. म्हणुन तो आहे तसाच देत आहे. या sms मधिल Opportunity या शब्दाचा जरा विचार केला की लक्षात येत की रात्रीच्या झोपेतुन सकाळी डोळे उघडणं म्हणजे परमेश्वराने जिवनात अधिक काही करण्याची दिलेली नविन संधीच असते. हे  सगळ दरदिवशी ईतकं सहज होतं की त्या मुळॆ उजाडलेली प्रत्येक सकाळ ही दैवी देणगी आहे हे आपल्या मुळी कळतच नाही. अर्थात हे जेव्हा कळेल तेव्हा मला आयुष्यात संधीच मिळाली नाही हा आपला दावा किती खॊटा होता हे मग आपलं आपल्यालाच कळुन येईल.
आज नविन वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या मुळे आजची सकाळ ही सुद्धा परमेश्वराने आपल्याला आयुष्यात अधिक चांगलं करण्यासाठी दिलेली नविन संधीच आहे. अस असलं तरी या वर्षाची पहिली सकाळ प्रत्येकासाठी वेगळी असेल. कोणी नववर्षाच सेलिब्रेशन करुन रात्री उशिरा झोपल्यानं सकाळी उशिरा उठले असतील तर काहींना हॅंगओव्हर मुळॆ सकाळी उठायला अंमळ उशिरच झाला असेल. बरेच जण आज रविवारची सुट्टी असल्याने पण उशिरा उठले असण्याची शक्यता आहे.माझी सकाळ मात्र पहाटे साडे पाच वाजता वाजलेल्या डोअरबेलच्या कर्कश्य आवाजाने सुरु झाली. गेले काही दिवस बर्‍या पैकी थंडी पडायला सुरुवात झाली असल्याने सकाळी लवकर उठायचा कंटाळाच येतो.त्यातच मी सुध्दा रात्री काहीसा उशिराच झोपलो अस्ल्याने कानावर ब्लॅंकेट ओढुन बेलच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं पण परत एकदा बेल वाजली.जरा कानोसा घेतला पण घरातल दुसर्‍या कोणाला जाग आली असल्याच दिसलं नाही. मग काय उठलो, काय शिंची कटकट आहे म्हणत.
त्या मुळे अर्धवट झोपेतच दार उघडल. तर समोरुन आवाज आला....
" हॅपी न्यु ईयर साहेब."
चमकुन समोर पाहील तर आमच्या कडे सकाळी दुधाच्या पिशव्या घेवुन येणारा यशवंता हसतमुखाने उभा होता.मी गडबडितच त्याच्या कडुन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि मलाही निटसं ऐकु गेल नाही अश्या आवाजात म्हणलो," तुलापण शुभेच्छा." शुभेच्छा देवुन झाल्यावर परत डोळे किलेकिले करुन बघीतल तर समोर कोणीच नव्हतं.तेव्हा हा सगळा भास समजावा तर हातात दुधाच्या पिशव्या होत्या ही वस्तुस्थिती होती.
मग लक्षात आल, यशवंता भल्या पहाटे दुधाच्या पिशव्या घेवुन आला ही वस्तुस्थितीच होती. तुमच्या माझ्या सारखे कित्येक जण नववर्ष साजरा करुन उशिरा उठत असताना यशवंता सारखी दुधाच्या पिशव्या घेवुन येणारी वा वर्तमानपत्र टाकणारी मुलं आज देखिल भल्या पहाटे अपुर्‍या कपड्यांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर मिळाव्यात म्हणुन धडपडत होती. त्यांच्याच वयाची आपली मुलं मात्र अजुनही साखरझोपेतच होती.
याची लख्ख जाणिव मला मात्र या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाली.... तुम्हाला.

तुम्हालाही जर झाली असेल तर किमान एव्हड नक्कीच करा की या वर्षात एखाद्या दिवशी दुधाच्या पिशव्या वा वर्तमानपत्र टाकण्यासाठी तुमच्या घरी येणारा यशवंता उशिरा आला तर त्याच्यावर रागवु नका....
माझा तर या वर्षीचा हाच पहिला निश्चय आहे. बघुया कितपत पाळायला जमतो ते.