१४ डिसें, २०१०

आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्म

महाजालावर भटकत असताना हेरंब यांच्या "पुन्हा चोरशील" या ब्लॉगवरचा आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्मा वरचा लेख वाचण्यात आला.या लेखात त्यांनी इतरांच्या ब्लॉगवरचे लेख ईत्यादी ढापणार्‍यांच्या चोरीचा पाठपुरवा कसा व का करायला हवा याच छान विवेचन केल आहे. त्यांची कल्पना छान पण त्याहुन जास्त महत्वाच पाठपुरावा करण्यातली त्यांची चिकाटी. म्हणुनच यावर तब्बल ५३ टीपण्या आल्यात. पण एक लक्षात येत की शेवटची टीपणी आहे ती २ ऑगष्ट २०१० ची. याचे दोन अर्थ निघतात -
(१) हा ब्लॉग जास्त जणां पर्यंत पोहोचला नाही किंवा
(२) ब्लॉग लिहीणार्‍या बहुतेकांचे अर्थाजन ब्लॉगवरील लिखाणावर अवलंबुन नसल्याने आपला लेख किंवा लिखाण दुसर्‍या कोणी चोरल्याची तितकीशी ची्ड ये्त नसावी.
या मुळे हेरंब यांचा उपक्रम कमी महत्वाचा ठरत नाही. अश्या चोर्‍या करणार्‍यांवर सामुदायीक रीत्या हल्ले चढवले नाहीत तर ते सोकावतील. तेव्हा हा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचुन चोरी करणार्‍या विरुध्दचा समुह कट्टा बनावा ही गरज आहे अस मला प्रामाणीकपणे वाटत. त्या मुळे मी माझ्या ब्लॉगवर हेरंब यांच्या ब्लॉगची लिंक देत आहे. ज्या ज्या कोणाला अश्या चोर्‍या आढ्ळतील किंवा या बाबत काही करायची इच्छा असेल त्यांनी या ब्लॉगला जरुर भेट द्यावी हे आवाहन.

हेरंब यांच्या ब्लॉगचा दुवा - http://punha-chorashil.blogspot.com

आपला

मैत्रेय१९६४





1 टिप्पणी:

हेरंब म्हणाले...

प्रिय मैत्रेय,

मनःपूर्वक धन्यवाद.. खरंय. हे आधुनिक चौर्यकर्म दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्या ब्लॉगर्सनीच एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला पाहिजे. जसजसे जास्तीत जास्त ब्लॉगर्स स्वतःच्या लिखाणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सजग होतील तसतसा या चोऱ्यांना आपोआपच आळा बसेल. हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

-हेरंब