६ जाने, २०१२

(१)जय

आजचा दिवस काहीसा विचित्रच होता. उठल्यापासून सगळच चुकत होत. मित्रांबरोबर कालची पार्टी चांगलीच रंगल्याने झोपायला रात्रीचे बारा-साडेबारा झाले होते.त्यामुळे सकाळी उठायला खुप उशिर झाला. त्यातच आज ऑफ़ीसला प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन असल्याने उशिरा जाउन पण चालणार नव्हतं. चहा ,आंघोळ जेमतेम उरकली आणि कस बस तयार होवून ऑफ़ीसला पोहोचलो. लिफ़्ट्ला समोर शर्मा उभा होता. मला बघताच..... " काय घाट्या " अशी हाक त्याने मारली.साल्याला किती वेळा सांगीतलं की अशी हाक मारु नकोस... पण भैया सुधरतचं नाही.
माझ्याही मनात कितीवेळा यायच की, आपण सुध्दा त्याची " अरे ओ लखनवा,काहासे आवत हो." अशी हाक मारुन चेष्टा करावी. पण साले संस्कार आडवे येतात ना?. माझ्या एक मात्र लक्षात आलंय की मोना बरोबर असली की साल्याला चेवच येतो......
शर्माचे बोलण ऎकुन मोना फ़िदीफ़िदी हसली.त्यामुळे जास्तच वाईट वाटलं. अकलेच्या आणि कामाच्या नावानं बोंब असलेली मोना, ति़च्यातली ही उणीव तोकडे कपडे घालून ती झाकत होती. किती विचित्र वाटत ना ,एखादी उणीव झाकायला दुसरी उणीव मग ती कपड्यांची का असेना कामी येते ते.पण मोना कशिही असली तरी स्वभावाने वाईट नव्हती. तिने सुध्दा शर्माला साथ द्यावी......... यु ब्रुटस 
या सगळ्यामुळे ऑफिस मध्ये शिरताना माझ्या चेहरा चांगलाच वैतागलेला दिसत असावा.कारण पंढरी प्युन पण म्हणाला " साहेब,रस्त्यात कोणाशी राडा झाला काय?" .च्यायला, माझा चेहरा ईतका बोलका का बरं. जरा मनातल लपवता येत नाही. नाहीतर तो साला शर्मा , बॉसने भोसडल तरी चेहरा असा की जस काही त्याला इन्क्रिमेंट द्यायच बॉसने कबुल केल आहे...
अरे हे मन काय भरकटत चाललय.आजच्या महत्वाच्या प्रेझेंटेशनचा विचार सोडुन सारखा शर्माचाच विचार का बरं करतो आहे.काहितरी चुकतय नक्कीच. कोणाशी बोललं तर बर वाटेल? गेल्या ७-८ दिवसापासुन समिराशी बोलणच झालेल नाही. तिच्याशी बोललो तर ...
"हॅलो "
"हॅलो, मी बोलतोय"
"काय रे ? आत्ता या वेळी फ़ोन केलास."
"बिझी आहेस का ? "
"नाही रे, कार ड्राईव्ह करतेय "
"असु दे ,नंतर फ़ोन करतो."
"जय. काही झालय का ? डिस्टर्ब आहेस का ?"
च्यायला ही मनकवडी आहे की माझाच आवाज पार पडलाय.
"जावु दे ना, नंतर फ़ोन करतो."
"ठीक आहे,बाय."
हीला कळल होतं ना मी डिस्टर्ब आहे. मग फ़ोन ठेवायची घाइ का ? जाउदे ,गेली उडत.
साल आता कोणाशी बोलाव आणि मन मोकळ करावं तेच उमजत नाही.पण मन असच भरकटत राहील तर प्रेझेंटेशन कस करणार.जाने दो जो होगा सो देखा जायेगा......
"हाय, जय"
"कोण अवि, सकाळी सकाळी इकडे कसा?"
"बापाच्या कामासाठी आलो होतो म्हटल तुला भेटाव"
"कसा आहेस"
"उडता पंछी हु. बस उड रहा हु . कभी यहा कभी वहा ."
"तेरा क्या साला,तुझे क्या चिंता. बापने ढेरो पैसा जो कमा के रखा है."
"जाने दे यार.अच्छा. तेरा क्या चल रहा है.समिरासे चक्कर अभीभी चालु है या नही."
याने पण माझ्या दुखती रग वर मिठ छिडकावं ना.साला आजचा दिवस खरच वाईट आहे.
थोड्यावेळाने आला तसा अवि निघुन गेला.खर तर तो आला की नेहमी मन हलक होत पण आज.........
अवि गेला पण जाता जाता मनात वादळ मात्र निर्माण करुन गेला.या समिराच नाव कधिही निघाल की मनात काहुर का बर येत कोण जाणे. समिरात आणि माझ्यात काहीतरी नक्कीच सुरु आहे अस कॉलेज मध्ये असल्या पासुन आमच्या ग्रुपमधिल सगळ्याच वाटत होत....पण तस खरच काही होत?
समिराच माहित नाही पण मी मात्र तिला पहिल्यांदा कॉलेजमधे पाहील्या पासूनच तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचा स्व:ता बद्दलचा आत्मविश्वास तिच्या सुंदर चेहर्‍यावर जरा जास्तच खुलुन दिसायचा. त्या मुळे तिचा मनमोकळा स्वभाव असुनही कोणालाही तिचा गैरफायदा घेण्याच धाडस होत नसे.तसच कोणत्याही कठीण प्रसंगात ती विचलीत होत नसे याच तर आमच्या ग्रुपमध्ये फ़ार कौतूक होत. मलाही कदाचीत तिचा हाच गुण जास्त भावला असावा. पण.....
आतातर मुड पारच गेला होता.तेव्हड्यात अचानक सेल वाजला. काय कट्कट आहे ? कोण असेल बरं...
आयला चक्क सलोनी.काय योगायोग आहे.....

३ टिप्पण्या:

Devendra म्हणाले...

स.न.वि.वि.
"सावनी सलोनी पिया" या कथेचा... खरं तर दीर्घकथेचा पहीला भाग आज ब्लॉगवर टाकताना काहीशी हुरहुर आणि बरीचशी साशंकता मनात आहे. साशंकता अशी की मनात जे काही लिहायच आहे ते सलग आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे सुसंगत मांडण खरच मला जमेल का?. कारण ही कथा लिहाण्याची कल्पना पहिल्यांदा मनात आली त्याला साधारण २ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. या कथेतल्या कल्पनेवर जस जस लिहायला सुरुवात केली तस तस या कथेचा आवाका जास्त आहे असं जाणवलं. त्या मुळे या कथानकातील व्यक्तिरेखाच काहीतरी सांगु पाहात आहेत अश्या स्वरुपात ही कथा मांडली पाहीजे अस मला वाटु लागलं आणि पहिले ३ भाग लिहुन काढले. त्या मध्ये परत परत वाचुन कितीतरी वेळा सुधारणा केल्या पण तरीही ही कथा व त्यातील व्यक्तीरेखा मला अजुनही बरंच काही सांगु पाहात आहे अशी भावना आजही मनात आहे. अस असलं तरीही जे ३ भाग लिहुन तयार आहेत ते आता आहेत तसेच ब्लॉगवर या महीन्यात मांडणार आहे.
अर्थात त्यानंतर पुढे काय हा मोठाच प्रश्न मनात ठेवुन आजचा पहिला भाग माझ्या विषयीच्या आपुलकीने माझ्या ब्लॉगवर भेट देणार्‍या मायबोलीकरांना सादर.
(टीप : या दिर्घकथेचे सर्व (?) भाग ’ सावनी सलोनी पिया’ या शिर्षकाखाली उपलब्ध असतील.)
आपला
मैत्रेय१९६४

अनामित म्हणाले...

Good Keep it up !!!
Vinayak

Devendra म्हणाले...

थॅंक्स, विनायक. खरच मला शुभ्हेच्छांची गरज आहे. गेले २ वर्ष या कथेवर विचार करतो आहे पण अजुनही........ विचार चालुच आहे.