गाडी ड्राईव्ह करताना मी शक्यतोवर फोन उचलत नाही. पण जयचा फोन ,अन तो ही सकाळी सकाळी आल्याने उचललां. खर म्हणजे मी गेला आठवडाभर जयला आज फ़ोन करु उद्या करु असा विचार करत होते. पण ते राहुनच गेलं होतं...
"हॅलो "
"हॅलो, मी बोलतोय".
मी कार ड्राईव्ह करत असल्याने त्याच्याशी जास्त बोलू शकले नाही.पण जय खुप डिस्टर्ब होता हे मला नक्कीच जाणवल होतं. मी बोलण थोडक्यात आवरल्याने जय रागावलेला दिसला. पण आत्त्ता या क्षणि काहीच करता येंण मला शक्य नव्हत. नाईलाज होता. खुप विचार करुन मग श्यामलला फ़ोन लावला. तिने जयला फ़ोन करायच कबुल केल्यान थोड बर वाटल.
ऑफ़ीसला पोहोचल्यावर जयला फ़ोन करण्याचा खुप प्रयत्न केला पण फ़ोन त्याने उचलला नाहीच.नंतर मात्र कामाच्या गडबडीत जयचा फ़ोन आला होता हे मी पार विसरुनच गेले. लंच मध्ये श्यामलचा फ़ोन आला आणि जय तिला संध्याकाळी भेटणार आहे असे तिने सांगीतलं. तेव्हा आपण जयला फ़ोन करायला विसरलो याची प्रकषाने पुन्हा एकदा जाणीव झाली.पण आत्ता एव्हड्या उशीरा फ़ोन केला तर तो जास्तच उखडला असता कारण त्याचा हळवा स्वभाव.मला त्याच्या या हळवेपणाच नेहमीच खुप आश्चर्य वाटायच. एखादा पुरुष खरचं इतका हळवा असु शकतो ?.
जयचा विचार करता करता मन एकदम ६ वर्ष मागे गेलं.कॉलेजचे मस्तीचे दिवस आठवले.कित्ती छान दिवस होते ते. कॉलेज मधला आमचा ग्रुप फ़ेमस होता. ग्रुप मधल्या आम्हा सगळ्यांचे स्वभाव इतके वेगवेगळे असुनही आम्ही नेहमीच एकत्र असायचो. मी आणि सनी कॉन्वेंट पासूनच एकत्र असलो तरी श्यामल , अवि, सिनीयर आणि जय यांची ओळख कॉलेज मध्ये आल्यानंतर झाली. त्यातचं माझ्या व सनीचे घरचे हायफ़ाय वातावरण व कॉन्वेंट मधले शिक्षण या मुळे इतर मुलांना आम्ही वेगळेच वाटत होतो. ग्रुप मधले अवि, सिनीयर आणि जय, आम्हा तिघा - मी, सनी आणि श्यामल- पेक्षा - एक वर्षाने पुढे होते. आजच्या सारख्या त्या वेळी इंजिनीयरींला मुली जास्त येत नसत.त्यामुळे असलेल्या थोड्या मुलींच्या मागे सर्वच मुलं आसण सहजीकच होत. पण माझ्या व श्यामलच्या मागे लागायच धाड्स इतर मुलांना होत नव्हत कारण सगळीच मुलं सिनीयरला टरकुन हॊती. सिनीयर अगदी रफ़ टफ़ तर जय मनस्वी व हळवा. दोघांचे स्वभाव अगदीच विरुध्द टोकाचे असुनही सिनीयर आणि जय यांची जिवलग मैत्री होती. त्यामुळॆ त्या दोघांच्या दोस्तीची आश्चर्य सगळ्यानाच, अगदी मलाही, वाटायचं. आमच्या ग्रुप मधला अवि हा बड्या बापाचा बेटा, तर श्यामल ही टीपीकल मध्यमवर्गीय घरातली. त्यामुळे आमचा ग्रुप म्हणजे इतरांना कोडच होत.
कॉलेजचा पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतोय .मी आणि सनी बरोबरच गेलॊ हॊतो. माझ्यावर खिळलेल्या मुलांच्या नजरा मला जाणवत होत्या. पण त्यांचा त्रास होण्या ऎवजी गंमतच वाटत होती. माझ्यावर खिळलेल्या नजरांन मुळे सनी मात्र जरा अस्वस्थच होता.कदाचीत येव्हड्या सर्व नजरां पासून आपल्या बाल मैत्रीणीचा कसा बचाव कराव याच त्याला दडपण आल असाव.
मी मात्र नजरांचा कुर्नीसात झेलत झेलत शांतपणे राणी सारख चालत होते.अचानक पणे माझी नजर कॅन्टीन मधे बसलेल्या एकाकडे गेली. तो माझ्याकडेच पाहात होता पण ती नजर काहीशी वेगळी होती. डोळ्यां मधे आरपार डोकवू पाहाणारी ती नजर ............
कशीबशी त्याच्या नजरेतून माझी नजर वेगळी करतच होते.... तेव्हड्यात
" अरे ए जय, कडक बघीतलीस का?".
त्याच्याच समोरचा दाढीवाला तरुण माझ्याकडे बघत म्हणाला.कोणी रोखुन बघीतल तरी मला संताप येत नसे पण कॉमेन्ट्स केलेल्या मात्र मुळीच आवडत नव्हतं.त्यामुळे माझ अस कड्कडीत स्वागत कोण करतय ते तरी बघुया म्हणुन मी त्या दोघांकडे कडे माझी पाउले वळवली.
"जावू दे समिरा, सिनीयर्स आहेत ते "
सनी माझ्या मागुन येत म्हणाला.मी मात्र तशीच पुढे गेले.
"सिनीयर्स आहेत म्हणुन काय झालं. हु केयर्स?".
त्यांच्या जवळ जावून मी रागान काहीतरी बोलणार तेव्हड्यात माझी नजर परत त्याच्या कडे गेली.त्या नजरेत काय होत काय जाणे पण जे बोलायच मनात होत ते जमलच नाही. कसाबसा संताप आवरत मी दाढीवाल्याला विचारलं.
"काही म्हणालात का आपण?".
त्या दोघांनाही मी अस काही सरळच विचारेन याची कल्पना नव्हती.त्यामुळे दोघही प्रचंड गोंधळले होते. त्यांच्या चेहय्रावरचे ते भाव पाहुन मला हसुच आल. त्यांना अजुन एक धक्का द्यावा म्हणुन त्या दाढीवाल्या समोर हात पुढे करत मी म्हणाले," हाय सिनीयर, मी समिरा."
"मी सिनीयर ,सॉरी सत्यजित". स्व:ताला कसाबसा सावरत दाढीवाला म्हणाला.
त्याला तसच सोडुन मी ’त्या’च्याकडे वळले आणि म्हणाले," हाय हॅण्ड्सम".
धक्का तर त्या दोघांनाही बसलाच पण मलाही बसला होताच की.एखाद्या मुलाला पहिल्याच भेटीत ’हॅण्ड्सम’ म्हणण माझ्या साठी पण टु मच होत.
स्वत:ला कसबस सावरत तो म्हणाला," हाय.मी अजय,पण मला तु जय म्हणालीस तर जास्त आवडेल."
त्यानंतर प्रसंगा नंतर मात्र आश्चर्यकारक गतीने आमची मैत्री वाढतच गेली..........
खरतर या जुन्या आठवणीत मी पार गुंतुनच गेले होते पण फोनच्या रींगने परत भानावर आले. क्लायंटचा फोन असल्याने त्याच्याशी बोलण्यात बाकी मग सर्व विसरुन गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा