२ जाने, २०१२

भंपकपणा दुसरं काय.....

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये " मुंबई टाईम्स यूथ आयकॉन " म्हणुन यंदा धनुषची निवड झाल्याची बातमी आली आहे. ती बातमी वाचली आणि कपाळाला हातच मारला. एकुण १० जणां मधुन एकाची यूथ आयकॉन म्हणुन निवड करायची होती. सुशिल कुमार, संदिप शिरोडकर, नचिकेत बर्वे , युवराज वाक्मिकी ,अंकिता राणे, अक्षय वर्दे, विद्या बालन , पल्लवी सुभाष, धनुष आणि अधिक कदम या दहाजणां मधुन एकाची निवड sms व्दारे करायची होती. त्या पैकी "कोलावरी" फेम धनुषची निवड महाराष्ट्रातल्या तरुणाईने केली आहे. आपला मराठी समाज हा जितका विरत्वाचा पुजक आहे तितकाच सरस्वतीचा देखिल पुजक आहे.बर्‍या-वाईटाची चांगली जाण असणारा हा समाज सामाजिक सुधारणांचा स्विकार देखिल तत्परतेने करतो.महाराष्ट्र टाईम्स वाचणारी बहुतांश तरुण मंडळी ही निश्चितच मायबोलीकर तरुणाई असणार हे सांगायला नकोच. तेव्हा मराठी समाजाचाच भाग असणारी तरुणाई समंजसपणे विचार करणारी असेल अशी अपेक्षा होती. त्या मुळे श्री. अधिक कदम या काश्मिर मध्ये राहुन काश्मिरी मुलींच्या संगोपनासाठी आयुष्य वेचणार्‍या तरुणाची निवड "मुंबई टाईम्स यूथ आयकॉन " म्हणुन होईल अशी आशा होती. पण त्या ऐवजी "व्हाय धिस कोलावरी" फेम धनुषची निवड तरुणाईने केली आहे.
ज्या " कोलावरी" गाण्यामुळे धनुषची निअड झाली आहे या गाण्यातल्या ना शब्दांना अर्थ ना त्याच संगित ग्रेट.तरीही ते गाण आजच्या तरुणाईला का आवडल हा मोठा प्रश्न आहे. समाज शास्त्रज्ञ त्यांच्या परीने काहीतरी कारण नक्कीच शोधतील.पण माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विचाराल तर एकच उत्तर येईल ते म्हणजे,"जेव्हा जगणंच निरर्थक होतं तेव्हा निरर्थक गोष्टीच आवडु लागतात दुसरं काय".
अधिक कदम हा सर्वसामान्य मराठी कुटूंबात वाढलेला तरुण काश्मिर सारख्या प्रदेशात प्रत्यक्ष जावुन काम करतोय जेथे ईतर जण  फक्त मौज मजेसाठी जातात.भारतचं नंदनवन असलेलं काश्मिर आजही भारताचा भाग असण्यात मोठा वाटा निश्चितच आपल्या सेनादलांचा आहे आणि त्याच बरोबर दुसर्‍या कोणाचा असेल तर तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करुन विधायक काम करणार्‍या अधिक कदम यांच्या सारख्या ध्येयवादी माणसांचा.
तेव्हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तरुणाईचा "यूथ आयकॉन" असावा ’अधिक कदम’ ना की ’धनुष’.





६ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

इतका विचार करतयं कोण रे... प्रसारमाध्यमातू सारखं जे माथी मारलं जातं ते शेवटी असं बाजी मारुन जातं.. :(:(

तुझी लगोलग दुसरी पोस्ट... संकल्प नं १ का? :):) भावलायं बरं का... लिहीत राहा... :)

Vinay म्हणाले...

अगदी बरोबर लिहिलत. यूथ आयकॉन म्हणजे खरं तर तरुणांनी ज्याला/जिला आपला आर्दश मानवं, अशी व्यक्ति. आणि धनुषला आर्दश का मानावं? त्याने मराठी तरुणांसाठी काय केलं आहे? त्याचापेक्षा सरस कलाकार मराठीत सुद्धा आहेत. सुबोध भावे, अतुल कुलकर्णी, इ.

कदाचित युवकांची सामाजिक विषयांबद्दल जाणीव वाढविण्याची गरज आहे. आणि ती वाढविण्यात आपण कुठे तरी कमी पडत आहोत. ‘कोलावेरी’ सारखं मार्केटिंग करणं अधिक कदमना शक्य नसेल, पण अशा विषयांची जाणीव होण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना अशा प्रकल्पांमधे भेटीसाठी आणि volunteering करण्यासाठी घेऊन जाणे इष्ट ठरेल. त्यांना सुद्धा ही कामं करणे किती कठीण पण महत्वाची आहेत, हे पटेल. ह्यातूनच धनुष बाजूला सरून अधिक कदम पुढे येतील.

sudeepmirza म्हणाले...

100% agree!

Devendra म्हणाले...

श्री, तु म्हणतेस हे काहीसं खर नक्कीच आहे. पण तरीही आदर्श निवडताना धनुषची निवड करणं समर्थनिय कसं बरं होवु शकतं.जास्त वाईट याचं आहे की आपली तरुण पीढी ईतका ऊथळ विचार करते याचं.

Devendra म्हणाले...

विनय, सविस्तर दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
चांगलं वाचन असेल तर विचार नक्कीच बदलु शकतात.वाचन कमी झाल्याने अस होत आहे. मराठीत खुप चांगलं साहित्य आहे पण वाचतयं कोण?. इंटरनेटने जगातल ज्ञान घरात आणलं पण वाचायच काय ते नाही शिकवलं

Devendra म्हणाले...

थॅंक्स, सुदिप....