"We will open a new book which it's pages are blank and we are going to put words on them...... ."
"The book is called Opportunity and it's pages is new year's every day...."
So ,start to fill ur book with words of success and best of what is in life....."
********* HAPPY NEW YEAR 2012 ********
"The book is called Opportunity and it's pages is new year's every day...."
So ,start to fill ur book with words of success and best of what is in life....."
********* HAPPY NEW YEAR 2012 ********
मला नविन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खुप sms आले त्यात आलेला हा एक छान आणि समर्पक sms. याच मराठीत भाषांतर करण्याचा खुप खट्याटोप केला पण त्यात मुळ sms ची मजा काही आली नाही नाही. म्हणुन तो आहे तसाच देत आहे. या sms मधिल Opportunity या शब्दाचा जरा विचार केला की लक्षात येत की रात्रीच्या झोपेतुन सकाळी डोळे उघडणं म्हणजे परमेश्वराने जिवनात अधिक काही करण्याची दिलेली नविन संधीच असते. हे सगळ दरदिवशी ईतकं सहज होतं की त्या मुळॆ उजाडलेली प्रत्येक सकाळ ही दैवी देणगी आहे हे आपल्या मुळी कळतच नाही. अर्थात हे जेव्हा कळेल तेव्हा मला आयुष्यात संधीच मिळाली नाही हा आपला दावा किती खॊटा होता हे मग आपलं आपल्यालाच कळुन येईल.
आज नविन वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या मुळे आजची सकाळ ही सुद्धा परमेश्वराने आपल्याला आयुष्यात अधिक चांगलं करण्यासाठी दिलेली नविन संधीच आहे. अस असलं तरी या वर्षाची पहिली सकाळ प्रत्येकासाठी वेगळी असेल. कोणी नववर्षाच सेलिब्रेशन करुन रात्री उशिरा झोपल्यानं सकाळी उशिरा उठले असतील तर काहींना हॅंगओव्हर मुळॆ सकाळी उठायला अंमळ उशिरच झाला असेल. बरेच जण आज रविवारची सुट्टी असल्याने पण उशिरा उठले असण्याची शक्यता आहे.माझी सकाळ मात्र पहाटे साडे पाच वाजता वाजलेल्या डोअरबेलच्या कर्कश्य आवाजाने सुरु झाली. गेले काही दिवस बर्या पैकी थंडी पडायला सुरुवात झाली असल्याने सकाळी लवकर उठायचा कंटाळाच येतो.त्यातच मी सुध्दा रात्री काहीसा उशिराच झोपलो अस्ल्याने कानावर ब्लॅंकेट ओढुन बेलच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं पण परत एकदा बेल वाजली.जरा कानोसा घेतला पण घरातल दुसर्या कोणाला जाग आली असल्याच दिसलं नाही. मग काय उठलो, काय शिंची कटकट आहे म्हणत.
त्या मुळे अर्धवट झोपेतच दार उघडल. तर समोरुन आवाज आला....
" हॅपी न्यु ईयर साहेब."
चमकुन समोर पाहील तर आमच्या कडे सकाळी दुधाच्या पिशव्या घेवुन येणारा यशवंता हसतमुखाने उभा होता.मी गडबडितच त्याच्या कडुन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि मलाही निटसं ऐकु गेल नाही अश्या आवाजात म्हणलो," तुलापण शुभेच्छा." शुभेच्छा देवुन झाल्यावर परत डोळे किलेकिले करुन बघीतल तर समोर कोणीच नव्हतं.तेव्हा हा सगळा भास समजावा तर हातात दुधाच्या पिशव्या होत्या ही वस्तुस्थिती होती.

मग लक्षात आल, यशवंता भल्या पहाटे दुधाच्या पिशव्या घेवुन आला ही वस्तुस्थितीच होती. तुमच्या माझ्या सारखे कित्येक जण नववर्ष साजरा करुन उशिरा उठत असताना यशवंता सारखी दुधाच्या पिशव्या घेवुन येणारी वा वर्तमानपत्र टाकणारी मुलं आज देखिल भल्या पहाटे अपुर्या कपड्यांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर मिळाव्यात म्हणुन धडपडत होती. त्यांच्याच वयाची आपली मुलं मात्र अजुनही साखरझोपेतच होती.
याची लख्ख जाणिव मला मात्र या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाली.... तुम्हाला.
तुम्हालाही जर झाली असेल तर किमान एव्हड नक्कीच करा की या वर्षात एखाद्या दिवशी दुधाच्या पिशव्या वा वर्तमानपत्र टाकण्यासाठी तुमच्या घरी येणारा यशवंता उशिरा आला तर त्याच्यावर रागवु नका....
माझा तर या वर्षीचा हाच पहिला निश्चय आहे. बघुया कितपत पाळायला जमतो ते.

२ टिप्पण्या:
हे असे उत्स्फुर्त आतून आलेले संकल्प बरेचदा तडीस जातात असा माझा तरी अनुभव आहे. :) तुला शुभेच्छा ! नववर्षाची सुरवात तुझ्या विचारांनी झाली... छान वाटले !
रात्रीनंतर सकाळ होतेच पण आपल्याला जीवनातही होणारच हे इतकं गृहित धरलं गेलंय... मात्र सकाळी उठल्यावर दोन क्षण देवाचे आभार मानायचा नेम मी मोडला नाही. तो न मोडो हिच प्रार्थना !
दुसरी प्रतिक्रिया.... आणि तिहि लागोलाग. लिहीण्याच्या सादेला प्रतिक्रियेचा प्रतिसाद मिळाला की लिहिण्याचा हुरुप वाढतो.धन्यवाद श्री.
टिप्पणी पोस्ट करा