मुळ लेखक : डॉ. एस.एल.भैरप्पा
अनुवाद : उमा कुळकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
अनेक वेळा वाचण्याचं व्यसन म्हणुन भारंभार वाचण्याची सवय जशी मला आहे तशीच माझ्या सारख्या तुम्हा वाचनवेड्या मायबोलीकरांना देखिल आहे. पण काही पुस्तक अशी असतात ती मनाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात. अश्या मनावर प्रभाव टाकणार्या पुस्तकांचा वयानुसार व काळानुसार होणारा परिणाम कमी-जास्त असतो. तरुणपणी ज्या पुस्तकांनी भारवुन टाकलेलं असतं ती पुस्तक काही वर्षानंतर तितकीशी आवडत नाहीत. त्या मुळे मला असं वाटु लागलयं की योग्य वयात योग्य पुस्तक वाचायला मिळणं हे वाचक म्हणून आणि व्यक्ति म्हणुन अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हे सगळं लिहीण्याच कारण म्हणजे "आवरण" ही कादंबरी जर २५-३० वर्षां पुर्वी जर मी वाचायला घेतली असती तर कदाचित कंटाळवाणी आहे म्हणुन अर्धवट वाचुन बाजुला ठेवुन दिली असती. कादंबरीची एकंदरीत मांडणी पाहीली तर रुढार्थाने ’आवरण’ ही कादंबरी आहे असं म्हणता येणार नाही. कारण या कादंबरीच्या निमित्याने डॉ. भैरप्पा यांनी केलेले वाचन, मनन लक्षात घेतलं की लेखकाने त्याच्या अभ्यासातुन तुम्हा आम्हां वाचकांशी केलेला हा संवाद आहे हे लक्षात येतं.या कादंबरीच्या कन्नड मध्ये २२ आवृत्या आता पर्यंत प्रकाशीत झालेल्या आहेत.त्यामुळे अभ्यासातुन केलेला संवाद असेल तर त्याला वाचकांची व समाजाची दाद मिळतेच.
"आवरण"च दुसरं वैशिष्ट म्हणजे मराठी समाजाने संपुर्ण हिंदुस्तानासाठी व हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाची या कादंबरीत डॉ. भैरप्पा यांनी आवर्जुन दखल घेतलेली आहे. तेव्हा आपल्या इतिहासा बद्दल अभिमान बाळगणं काहीच गैर नाही याची पुन्हा पुन्हा खात्री पटते.सध्या मराठी माणसांना संकुचित व प्रादेशिकवादी म्हणुन हिणवण्यात अनेक विचारवंत व विषेशत: इंग्रजी वर्तमानपत्र आघाडीवर आहेत.त्याच बरोबर सहिष्णु अश्या हिंदु धर्मावर वेगवेगळ्या मार्गाने टिका केली जात आहे. या सातत्याने होणार्या खोट्या प्रचाराचा हिंदु समाजावर तसेच सर्वसामान्य माणसांवर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम व त्यातील धोका ही कादंबरी वाचल्यावर जाणवतो.
या कादंबरीची नायिका मुस्लिम आहे जी पुर्वाश्रमीची हिंदु आहे. सेक्युलर विचारसरणीची ही स्त्री काही कारणाने जेव्हा भग्नावस्थेतील देवालयांच्या इतिहासाचा अभ्यास करते तेव्हा तिला जे सत्याच्ं दर्शन होतं त्याने ती भांबाहुन जाते. तिच्या या मनोवृत्तीच दर्शन घडवताना डॉ. भैरप्पा यांनी केलेली भाष्ये मुळातुनच वाचायला हवीत. असे असले तरी या कादंबरीतील काही भाष्ये आपणा साठी आवर्जुन सादर करत आहे.
- ’ब्रिटीशांविरुध्द झगडणारा’ हे कारण पुढे करुन टिपूला राष्ट्र-नायक म्हणायचं असेल तर त्याच ब्रिटीशांविरुध्द लढणार्या मराठ्यांच हेच इतिहासकार आणि साहित्यीक उदात्तीकरण का करत नाहीत? आपल्या सगळ्या शत्रुंमध्ये मराठेच सर्वात बलवान आहेत हे ब्रिटीशांनी ओळखलं होतं.
- मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतातील मुळ गावांची नाव बदलुन मुस्लिम नावं ठेवली.हिंदुंच पवित्र क्षेत्र असलेल्या प्रयागच अल्लाहबाद तर मथुरेच इस्लामाबाद हे नाव ठेवलं.
- मलबार आणि कोडगु प्रांतात टिपूने हिंदुंच जबरदस्तीने धर्मांतर केलं.याच टिपूनं अफगाणचा राजा जमानशाहाला आणि तुर्कस्तानचा खलिफाला भारतावर आक्रमण करुन संपुर्ण देश इस्लाममय करा असं पत्र पाठवलं होत. तरी म्ह्णे टिपू धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु.
- हिंदुस्तान,खुरास्तान , सिकीयांन या सर्व प्रदेशां मधिल असलेली मुळ बौद्ध देवालयं मुसलमानांनी नष्ट केली असं ह्यु एन त्संगनं लिहुन ठेवलयं.
- संपुर्ण काशी मह्णजे मी,असा भार वाहात उभी आहे ती ’ग्यानवापी मशिद’. मुळचं विश्वनाथ मंदिर औरंगजेब बादशाहान फोडलं,त्याचेच खांब -भिंती वापरुन त्याच जागी १६६९ साली ही मशिद बांधली आहे.
- काशी हे सगळ्या पंथांच प्रमुख केंद्र.काशीमध्ये जेव्हडी देवळ बांधली गेली तेव्हडी देशातल्या इतर कुठल्याही शहरात बांधली गेली नाहीत. इतर धर्माची देवळ पाडणं म्हणजेच मुसलमान धर्म अस मानणारे शतकानुशतक या काशीबर राज्य करत राहीले. इतर सर्व धर्मांचा नामशेष करण या वृत्तीच्या इस्लामनं काशीमधिल इतर पंथांच्या मंदिरांचा नाश करुन,त्या जागी मशिदी उभ्या केल्या. या काशीत अनेक घाट आहेत त्यांची नाव हनुमान घाट,नारद घाट, बाजीरावानं बांधलेला मणिकर्णिका घाट ईत्यादी अशी आहेत.हे सगळे घाट मराठयांनी आणि मराठ्यांच्या काळात बांधले गेले आहेत. जर मराठ्यांचा उद्य झाला नसता , तर काशी मुस्लिमांच्या ताब्यात राहीली असती. मग काशीला तिचं काशी असणं आणि हिंदुंना पुनर्जिवन मिळालं असतं का ?
- मुळची काशी आता नाही.आजच्या काशीमधिल बहुसंख्य देवालय्ं,घाट ,स्मशानं मराठयांनी बांधली आहेत. मुसलमानांच्या प्रभावा खालुन काशीची सुटका करुन , देवालयांच्या जागी त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने उभारलेल्या मशिदींच्या जागी पुन्हा देवळं बांधायचा प्रयत्न प्रत्येक मराठी राज्यकर्त्यांनी आणि अधिकार्यांनी केला आहे.त्या साठी त्यांनी साम ,दाम ,दंडाचाही वापर केला.पण एकदा ताब्यात घेतलेली मंदिराची जागा परत द्यायला कुठल्याही मुस्लिम राज्यकर्त्याने मान्यता दिलेली नाही.
- बनारस इंग्रजांच्या ताब्यात गेलं. इंग्रजांना हवा तेवढा पैसा आणि ईतर ठिकाणी त्यांना सैनिकी साहाय्य देवुन विश्वनाथ मंदिराची मुळची जागा मिळवण्याचा मराठयांनी खुप प्रयत्न केला. पण हिंदु आणि मुस्लिम यांच्या मध्ये सतत तेढ ठेवुन स्वत:च रक्षण करणं हे धोरण असलेल्या इंग्रजांनी हे नाकारलं. पहिल्या बाजीरावाचा हेतु तर केवळ ग्यानवापी मशिद पाडुन तिथे मंदिर उभारणं, हाच होता.
- बाजीरावानं रामजी शिंदे यांना १७५९ मध्ये लिहीलेल्या पत्रात लिहीलयं,"शुजाउद्दौलाशी दोन-तिन गोष्टी ठरवल्या पाहीजेत. त्याच्या कडुन बनारस , अलाहाबाद , आणि अयोध्या काढुन घे. त्यानं माझ्या वडिलांना बनारस आणि अयोध्या देईन असा शब्द दिला होता.अलाहाबादेवर अजुनही चर्चा चालु आहे.त्याही बाबतीत सहजासहजी तडजोड होत असेल तर कर."
- अकबराचा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक मुसलमान राज्यकर्त्यानं हिंदु यात्रेकरुं कडुन कर वसुल केलेला आहे. औरंगजेबाने हा कर असह्य होईल अशा पातळी पर्यंत वाढवला. त्याच्या मृत्युनंतरही तिथे आलेल्या सुभेदार, बादशहा, नवाबांनीही हे कर कमी केले नाहीत. काहीतरी करुन काशी, अलाहाबाद आणि प्रयाग आपल्या ताब्यात घेवुन हिंदुंची यात्रा सुकर करुन द्यावी म्हणून मराठे सतत प्रयत्न करत राहीले. युद्धात जिंकुन किंवा विकत घेवुन, पण ग्यानवापी मशिदीच्या जागी पुन्हा विश्वनाथ देवालय उभं करण्याचे खुप प्रयत्न मराठयांनी केले पण मुसलमानांनी ते कधिच शक्य होवु दिलं नाही.पाठोपाठ आलेल्या इंग्रजांनी मुसलमानांची बाजु घेतली. विश्वनाथ मंदिर देणार असाल तर टिपू सुलताना विरुद्धच्या युद्धात मदत करु . अशी नाना फडणविसांनी अट घातली होती. पण ती इंग्रजांनी मान्य केली नाही. त्यामुळे इंग्रज- मराठ्यांत वितुष्ट निर्माण झालं.
- १६६९ साली औरंगजेबानं नष्ट केल्या पासुन १७७५ पर्यंत विश्वनाथ मंदिर उरलंच नव्हत.आज ग्यानवापी मशिद शेजारी असलेला छोटासा ’मंदिर’ म्हणवला जाणारा मंडप १७७५ च्या सुमारास अहिल्याबाईनी उभारला.
(टीप : असे असुनही आपण मराठी माणसं संकुचितवादी.... शेम शेम शेम)
- साकी मुश्ताकखान यांन औरंगजेब बादशाहाचा इतिहास लिहिलेला आहे.त्या ग्रंथाच नाव ’मासिर-ई-आलमगीरी’. दरबारात असलेल्या पुराव्या शिवाय त्यानं एकही शब्द लिहीलेला नाही. बादशाहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकार्यांनी काशीचं विश्वनाथ देवालयं नष्ट केलं अशी नोंद त्यानं त्याच्या ग्रंथात केली आहे.
कादंबरीच्या शेवटी नायिकेच्या तोंडुन हिंदु- मुस्लिम ऎक्याबाबत डॉ. भैरप्पा यांनी केलेल भाष्य जसेच तस देण्याशिवाय मला राहावतच नाही.
- "हिंदु- मुसलमानां मध्ये ऎक्य निर्माण करणं हा विचार निश्चितच उदात्त आणि स्वागतार्य आहे. त्याची आज नितांत गरजही आहे. पण असत्यावर समाज उभा करणं शक्य नाही. दर वर्षी किमान पंचविस लाख हिंदु यात्रेकरु काशीला जात असतात.ज्या अपेक्षेनं आणि श्रद्धेने आपण आलो ते काशी विश्वेश्वराचं मंदिरच अस्तित्वात नसुन तिथे एक अजस्त्र मशिद उभी असल्याचं पाहुन धक्क्याने ते कोलमडुन जातात.गावी परतल्यावर आपल्या जवळपासच्या सगळ्यांना या आघाताविषयी सांगतात.अशा प्रकारची भावना मनात असताना राष्ट्रीय भावना कशी निर्माण हॊणार?. आज शाळेत शिकणार्या विद्यार्थां पासुन तुम्ही हे सत्य दडवुन ठेवण्यात यशस्वीही व्हाल. हीच मुलं शैक्षणीक प्रवासा साठी जातील आणि सोबत असलेल्या अध्यापकांना या संबंधी प्रश्न विचारतील. त्यावेळी त्यांनी काय उत्तर द्यावं? ही केवळ काशी- मथुरा- अयोध्येची गोष्ट नाहीये. भारतात अशी किमान तिस हजार भग्न देवालयं आहेत! हा संशोधकांनी सांगीतलेला आकडा आहे. ही सगळी देवालयं रानटी प्राण्यांनी भग्न केली असं सांगायच काय? जैन, बौद्ध , शैव, वैष्णव या परस्परांनी देवळं पाडली म्हणुन कथा निर्माण करायच्या काय?.या पैकी कुणाच्याही धर्मग्रंथांनी इतरांची देवालयं पाडावी म्हणुन सांगितलेलं नाही.कुणी समाजकंटकाने असलं काही केलं तरी त्याला आपल्या धर्माने आदर्श मानलेलं नाही. उलट इतर धर्मियांची पुजास्थळं आणि मूर्ती फोडणं,हातात तलवार घेवुन धर्माचा प्रसार करणं. जिझीया लादणं, हरलेल्यांना हजारोंच्या संख्येने गुलाम करणं या सार्या गोष्टी स्वत: धर्मसंस्थापकांनी केलेल्या आहेत, त्यांनाच आदर्श मानण्यात आलं आहे. कधी काळी, असंस्कृत काळी, असंस्कृत देशात केलेली कृत्यं आणि सांगीतलेला उपदेश आजच्या काळातही अनुसरण्याची मनोभुमिका असे पर्यंत तुम्ही म्ह्णता ते ऎक्य कसं शक्य आहे.? मनुसारख्याच्या मनोभुमिकांना त्याज्य ठरवुन, सर्व जण समान आहेत, या तत्वाचा स्विकार करुन आपण आपल्या देशाचं संविधान लिहीलं आहे नाही कां?त्याचप्रमाणे परधर्माचा व्देष करत स्वत:च्या प्रेषितानं सांगितलेलाच धर्म श्रेष्ठ मानुन,आपल्या धर्मात न येणार्यांना ठार करा असं सांगणार्यांच्या मनोभावाचा तिरस्कार करुन ’एकं सतविप्रा: बहुदा वदंति’ हे तत्व सगळ्यांवर कठोरपणे लादल्या शिवाय आपण ऎक्याच्या गोष्टी केल्या, तर त्या पोकळ ठरणार नाहीत काय?
डॉ. भैरप्पा यांच हे भाष्य राष्ट्राच्या एका मोठ्या समस्ये वरील अभ्यासु व निर्भिड असं भाष्य आहे.राष्ट्रीय ऎक्याच्या तथाकथीत गोष्टी करणार्या विचारवंतांना विचार करण्यास प्रवृत्त करणारं हे भाष्य आहे. पण विचारवंतांना विचार करायला वेळ आहे का ? त्यांनी फक्त सांगायचं, विचार तर आपण सर्वसामान्य माणसांनी करायचा असतो नाही का?
पुस्तकाच्या शेवटी कथेच्या नायीकेनं पर्यायानेच डॉ.भैरप्पा यांनी अभ्यासलेल्य़ा विविध पुस्तकांची व ग्रंथांची सुची दिलेली आहे.त्या वरुन ही कादंबरी लिहीताना केलेला अभ्यास व त्या मधुन केलेला संवाद आपल्यालाही विचार करण्यास प्रवृत्त करतो ही निश्चित.
थोडक्यात काय हिंदु म्हणुन जन्म मिळणं ,हिंदु म्हणुन जगणं आणि हिंदु असणं यांच महत्व मनावर अधोरेखित करण्यात डॉ. भैरप्पा हे यशस्वी झाले आहेत.
७ टिप्पण्या:
अशीही ’ आवरण ’ यादीत होतीच. आता तर वाचायलाच हवी. आवरण ही फक्त वाचनीय नसून विचार करायला लावणारी आहे, गुंतवणारी आहे याची साक्ष तुझ्या उहापोहातून पुरेपूर जाणवतेय.
विवेचन आवडले.
छान परिक्षण...पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळाली...धन्यवाद.
प्रिय भानस, काहींच्या प्रतिक्रिया नेहमीच अपेक्षित असतात. पण त्या जुळणार्या असल्या की जास्त आनंद होतो. मनापासुन आभार.
प्रिय प्रणव, प्रतिक्रियेच स्वागत. पुस्तक नक्कीच वाचण्या सारखं आहे. आपल्या इतिहासाचा सार्थ गौरव असण्यात काहीच गैर नाही.
टिपूला राष्ट्र-नायक म्हणायचं?
विचारवंत आणि तथाकथीत धर्मनिरपेक्ष तस म्हणतात आणि समजावतात. आपल्या मतांना कोण विचारतो?
” आवरण ’दोन वेळा वाचली. कथानक हे केवळ तिथेच मर्यादित न राहता मनावर गारुड करते. अप्रतिम! या अनुषंगाने भेटू तेव्हां चर्चा करायला मला आवडेल. :)
टिप्पणी पोस्ट करा