२० फेब्रु, २०११

इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा

मराठी ई-भाष्य कट्ट्यांवर वेळ मिळेल तशी भटकंती मी करत असतो. ही भटकंती स्वैर असते. अस असल तरी काही कट्टे असे आहेत की ते टाळता येत नाहीत. त्या पैकी एक म्हणजे netbhet. त्या कट्ट्यावर गेलो असताना मला " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या नविन चर्चापिठाची ( Forum) माहीती मिळाली. विषय आहे " इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा ". " अमृताते पैजा जिंकी " असे ज्ञानेश्वर माऊलींनी जीचं वर्णन केल आहे ती आपुली माय मराठी संपुर्ण जगाची बोली भाषा, व्यवहार भाषा, संपर्क भाषा व्हावी असं स्वप्न आपण सर्वच पाहात असतो. हे होण्यासाठी भाषा नविन नविन शब्दांनी समृध्द व्हावी याचे जाणिवपुर्वक प्रयत्न व्हायला पाहीजेत. स्वप्नांना प्रयत्नांची साथ असेल तर आपली मराठी भाषा विश्वभाषा निश्चीत होईल. त्या मुळे " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या चर्चापिठाची सर्वांना माहिती व्हावी व जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवले जावेत असं मला मना पासुन वाटतं. माझ्या कडुन मी ब्लॉगला / Blog Spot ला " ई-भाष्य कट्टा " हा मराठी शब्द सुचवला आहे.

तेव्हा तुम्ही पण या चर्चापिठाच्या खालील दुव्याला (Link) जरुर भेट द्याव असं आवाह्न करीत आहे.

http://nathtel.blogspot.com/2011/02/blog-post_19.html

आपला
मैत्रेय१९६४

२ टिप्पण्या:

Admin म्हणाले...

आपण माझ्या "आगळं!वेगळं!!!" या ई-भाष्य कट्ट्यावरील चर्चापिठाची माहिती आपल्या वाचकांना मैत्रेय१९६४ च्या माध्यमातून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार!
रमण कारंजकर

Devendra म्हणाले...

प्रिय रमण, आभार कशासाठी? मराठी भाषा, मराठमोळी संस्कृती आणि आपला गौरवशाली इतिहास याचा अभिमान हा आपल्या सगळ्या कट्टेकरां मधिल समान दुवा आहे ना?. त्या मुळे चांगल्या हेतुला माझी छोटीशी मदत इतकच. उपक्रमास मनापासुन शुभेच्छा.