प्रिय मायबोलीकर,
काही क्षणात आपल्या हिंदुस्तानात ईंग्रजी कॅलेंडर नुसार नववर्षाची सुरुवात होणार आहे.हे कॅलेंडर आपल्या ईतके अंगवळणी पडले आहे की आपल्या नविन वर्षाची सुरुवात चैत्र महीन्यातील गुढीपाडव्याला होत असते याची जाणिवच नसते.आपली पुढची पिढी तर जागतीकीकरणाच्या झंझावाटात आपली संस्कृती व आपली मायबोली या पासुन तुटत चालली आहे.वास्तव जगापेक्षा भासमय जगात ही पिढी जास्त रमते. संवादांपेक्षा एसएमएस , पत्रांपेक्षा ई-पत्र, मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक,ऑर्कुट या सारख्या कम्युनिटी साईट्स आणि मन व्यक्त करण्यासाठी याहू सारखे निरॊपे ( Messengers) यांचा वापर सहजकत्या करणार्या या पिढीला पत्रातील ह्स्ताक्षरावरुन भावना समजुन घेण्यातली संवेदनशिलता व गंम्मत कशी बर कळणार. अर्थात सर्वच दोष त्यांचा नाही तर आपल्या पिढीचा आहे जी आज पंचेचाळीस ते पन्नास दरम्यानच्या वयोगटात आहे. आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती पोहचवण्यात आपण कमी पडलो आहोत.कॉस्पॊपॉलीटीन संस्कृतीची भलावण करण म्हणजेच पुरोगामीपणा अशी आपण आपलीच समजुत घेउन घेतली आहे. मॅकडोनाल्ड मध्ये आपल्या मुलांना घेवुन जाण आणि बिसलेरीची पाण्याची बाटली देवुन आपल्या आजुबाजुच्या सर्वसामान्य माणसां पेक्षा आपण उच्च आहोत अशी त्यांची समजुत होण्यात आपलाही वाटा आहेच ना?
आपला देश हा आज तरुणाईचा देश म्हणुन ओळखला जातो.ही तरुणाई या ना त्या कारणाने घरापासुन दुरावत चालली आहे.अनेक घरात आई-वडिल एकटे तर कर्ती मुले परदेशात किंवा परगावात आहेत. अशी अनेक घरटी डोळे उघडे असतील तर आजुबाजुला सहज नजरेला पडतील. या ताटातुटीला नातेसंबधातला दुरावा हे कारण नसुन व्यवहारीक अगतीकता जास्त आहे हे ही मान्यच करायला हवं. मुल दुर गेलेल्या अश्या एकाकी वृध्द मंडळीना पैशाची गरज कमी तर सोबतीची गरज जास्त आहे.मनात असुनही किंवा शक्य असुनही अश्या मंडळींना मदत करणे अनेक कारणास्तव शक्य होत नाही. कारण काहीही असोत पण जग जवळ येत आहे अस म्हणताना जगा पासुन तुटत चाललेल्या माणसांची संख्या वाढतच चालली आहे.अश्या वेळी समुहने एकत्र येवून काही करण्याची गरज भासते.त्या दॄष्टीने काही संस्था प्रयत्न करीत आहेत ही आशेचीच किनार म्हणायला हवी. नुकताच पुण्याला काही कारणाने गेलो असता अश्याच एका संस्थाची माहिती मिळाली.ती संस्था म्हणजे " NRI Parent's Organisation, Pune ". या संस्थेच वैशिष्ट म्हणजे ज्या पालकांची मुल परदेशात आहेत अशी मंडळी या संस्थेची सदस्य आहेत.एकटे पणा कसा असतो ते प्रत्यक्षात अनुभवणारी माणसच दुसर्या समदु:खी माणसांना जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेवु शकतात नाही का?या संस्थेतील व या प्रकारचे काम करणार्या प्रत्यकाच ..मग ती संस्था असो की व्यक्ती यांच कौतुक करायला हवच.
समाजा पासुन तुटत जाणारी दुसरी माणस म्हणजे आजुबाजुला काय चालल आहे त्याच भान नसलेली माणसं. समाजातील वाईट प्रवृत्ती विरुध्द प्रत्यक्ष काम करण ही सहज शक्य गोष्ट नाही हे मला देखिल स्वानुभवातुन कळतच की. पण आजुबाजुच सगळच आलबेल नाही किंवा खर सांगायच तर दिसत त्याहुन फारच फारच वाईट आहे हे कळुन न घेण म्हणजे असंवेदशीलताच नाही का?. नुकत्याच ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे म्हणतात "समाजा पुढचे प्रश्न मांडण्या साठी साहित्यीकांनी समाजातल्या प्रश्नांसंबंधी निश्चीत भुमिका घेण्याची गरज आहे". तेव्हा फक्त साहित्यीकांनी नव्हे तर आपल्या पैकी प्रत्येकानेच निश्चीत अशी भुमिका घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.
टाटा हे आपल्या देशात आदराने घेतल जाणार नाव आहे.हे नाव फक्त एका उद्योग संस्थेचच प्रतिनिधित्व करत नाही तर संस्कृतीच प्रतिक आहे. पण निता राडीया टेप प्रकरणातुन आलेल सत्य या संस्कृतीची काळी बाजु दाखवत तेव्हा आपल्या पुढचे आदर्श अधिक डोळस पणे पारखुन घेण आवश्यक आहे हेच अधोरेखीत करत. अर्थात आदर्श या शब्दाचा अर्थ आता आपल्या महाराष्ट्रात फार वेगळा झालेला आहे.त्यामुळे शब्दकोशाच्या पुढील आवृत्यांमध्ये आदर्श या शब्दा समोर हे नविन संदर्भ देण्यात आले तर आश्चर्य वाटायच कारण नसाव.
अश्या परिस्थितीत भांबाहुन गेल्या सारख सर्व सामान्य माणसांना झाल आहे.आशेन पहाव असे समोर काही दिसत नसताना उमेद टिकवुन ठेवण्याची कसरत करण्याची वेळ नविन वर्षाला सामोरे जाताना आली आहे.अंधार असला तरि प्रकाशाची तिरीप नक्कीच दिसणार आहे हा दरवर्षीचा आशावादच आपल्याला या वर्षाला अलविदा करताना मनात नक्कीच असणार आहे.
आपल्या मनातील या आशावादाच सर्वांच समर्पक शब्दरुप खालील गझलेतुन व्यक्त होत .....चित्रा सिंग यांनी ही गझल गायली आहे.
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये
सुबह होने को है माहौल बनाके रखिये
जीनके हाथोंसे हमे जख्मे नीहॉं पहुंचे है
वो भी कहते है के जखमोंको छुपाये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये...........
कौन जाने के वो किस राह गुजर से गुजरे
हर गुजर गाह को फुलोंसे सजांये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये ..........
दामने यार की झीनत ना बने आंसु
अपनी पलकॊं के लिये कुछ तो बचाकें रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये .......
तेव्हा नविन वर्ष आपल्या सर्वांच्या मनोकामना पुर्ण करणार आणि आपल्या देशातील सर्व माणसांच जीवन समाधानाच करणार असु दे या माझ्या मनपुर्वक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र जय मराठी
आपला
मैत्रेय१९६४
४ टिप्पण्या:
नव वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
चित्रा सिंग यांनी गायलेली गझल पेश केलीस, धन्यू.
हमें तो अपनों ने लुटा
गैरो में कहा दम था मेरी नैया
वहा डूबी जहा पाणी कम था
प्रिय भानस, नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा. काही वेळा मनातल हव तस शब्दात निट मांडल गेल नाही असा सल मनात राहातो. तसच काहीस लिहुन झाल्यावर वाटल्याने गझलेची मदत घेतली झाल.
प्रिय सुनिल, तु म्हणतोस ते बरोबरच आहे. पण आपल्याच राजकीय नेत्यांनी कितीरे लुटायच आपल्याला?
टिप्पणी पोस्ट करा