२८ डिसें, २०१०

नव्या इतिहासाचा शोध

                                                    लेखक- डॉक्टर सुनिल भुमकर


पुण्यातील लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याने पुणे महानगर पालीकेत झालेल्या सव पक्षीय खेळोमेळीच्या (?) चर्चेची सविस्तर माहिती आजच्या मराठी वर्तमानपत्रात आलेली आहे. या चर्चेत शिवसेना-भाजप आणि मनसे एका बाजुला तर दुसर्‍या बाजुला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसर्‍या बाजुला होती.तर चर्चेचे परिक्षक म्हणुन श्री.मोहनसिंग राजपाल,सन्माननीय़ महापौर,पुणे महानगरपालीका यांनी काम पाहीले .महानगर पालिकेतील तमाम मराठी नगरसेवकांची आपसाआपसात झालेली ही खेळोमेळीची चर्चा पाहाताना व अनुभवताना "मराठा तितुका मेळवावा" याची याच देही याच डोळा प्रचिती परिक्षकांना आली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रुच आले असही काहीसे वाचनात आल आहे.
या घटनेतुन तसेच इतिहास संशोधक संभाजी ब्रिगेड संस्था यांच्या इतिहास संशोधनातुन उघडकीस आलेल्या काही नव्या शोधांमुळे आणि सर्व धर्म समभाव या संकल्पनेने माझे परम मित्र डॉक्टर सुनिल भुमकर हे फारच प्रेरीत झालेले दिसतात. त्यामुळे डॉ. भुमकर यांनी,त्यांना त्यांच्या प्रदिर्घ इतिहास संशोधनाच्या अभ्यासातुन नव्याने गावलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहा्सातील काही भाग त्यांच्या ब्लॉगवर काहीश्या घाईघाईने प्रकाशीत केलेला आहे.डॉ.भुमकर यांनी प्रकाशीत केलेल्या भागातील मौत्तिके खालील प्रमाणे:
१. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले.
२. शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी (हिंदवी नव्हे) स्वराज्याची’ स्थापना केली.
३.शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते व त्यांनी त्याची प्रेरणा महात्मा गांधीं कडून घेतली होती.
४.आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. कारण अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते.
५.अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीत अफझल खानला छातीत हार्टअटॅक’ ची अचानक जोरात कळ येवुन तो मेला. त्या वेळी महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले.
माझ्या मित्राने या शिवाय बरच काही नव महत्वाचे संशोधन मांडल आहे ते त्याच्याच प्रेमळ शब्दात वाचणेच योग्य ठरेल.
हे सर्व लिहिताना महाराष्ट्रातील जातीय सलोखा टीकुन राहावा म्हणुन माझ्या मित्राने अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीच्या प्रसंगातील एक सत्य नमुद केलेले नाही.ते म्हणजे महाराजांचे डॉक्टर हे ब्राम्हण असल्याने खानाच्या औषध उपचारा साठी जाणुनबुजुन वेळेवर पोहोचले नाहीत हे ते सत्य.पण एकवेळ जातिय सलोखा तुटला तरी चालेल पण त्यांनी हे सत्य लपवुन ठेवु नये व पुढील भाग लिहीताना हा ब्राम्हणी कावा जरुर उघडकीस आणावा.
तेव्हा माझ्या मित्राने अभ्यासातुन परिश्रम पुर्वक संशोधीत केलेला इतिहास आपण जरुर वाचावा व त्याच्या अभ्यासास दाद द्यावी जेणेकरुन पुढील भाग लवकारात प्रकाशीत करण्याची त्याला प्रेरणा मिळेल हे नम्र आवाहन.

डॉ.भुमकर यांच्या ब्लॉगचा दुवा http://raamprahar.blogspot.com/2010/12/blog-post_27.html

आपला
मैत्रेय१९६४

५ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

माफ करा पण तुमच्या मित्राच्या लेखाची प्रेरणा http://goo.gl/r1zlK ही असावी असं वाटतंय..

Devendra म्हणाले...

प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभार. या घटनेच वाईट वाटत कारण मराठी समाज हा आपली भाषा, संस्कृती या साठी एक होण्याची आवश्यकता असताना आपसाआपसात झुंजत आहे.

Shasha म्हणाले...

अरे हे काय लिहिलंय? नक्की काय म्हणायचं काय डॉक्टर भूमकराना .....संभाजी 'बी' ग्रेडच्या वतीने?
हा असला-कसला विनोद?

ashley म्हणाले...

अफजाखन भेटीच्या ब्रीगेदि नि उठवलेल्या वादळाबद्दल(म्हणजे मुसलमान वाईट असतील पण ब्राम्हण जास्त वाईट ... वगैरे ...) तर माहितीच असेल त्यात एकाने ~ओर्कुट कम्युनिटी वर विडंबन केलय


वरच्या चित्रात एक खटकणारी गोष्ट म्हणजे खानाला मारल्यावर कृष्णाजीवर घाव घातला नाही प्रथम घाव कृष्णाजीवर घातला नंतर खानावर घातला...वरील चित्र पाहून असे वाटते खान नाअही तर कृष्णाजी महाराजांना मारायला आला होता..आणि तो खान कृष्णाजीचा सहकारी होता




अफजल खान केवढ्या दुरून, उनात-पावसात आपला पुतण्या शिवाजीस भेटायला विजापुरहुन आला. नुसताच एकटा कसा जावू (?) बोर होईल, सोबत कंपनी असावी म्हणुन भली मोठी फौज घेवून आला. अता फौज आनालीय तर हात हलवत कसा जायचा म्हणुन तलवारी, बारच्या, तोफा अस सार घेवून तो आला. जाता जाता तु्ळजापुर लागल म्हणून खान देव दर्शन करायला मंदिरात गेला आपली तलवार काढून ठेवोन नमस्कार करताना चुकून त्याची तलवार देवीच्या मूर्तीला लागली व मूर्ति फुटली. खान ढसा ढसा रडला... पश्चाताप पश्चाताप जाला... दिन दिन ... इंशाल्लाह खानने तिथे नवी मूर्ति बसवली (पहा मुलानो! खानचे औदार्य, आजही त्या खानावर सिनेमे निघतात माय नेम इज खान त्या प्रेमळ खानाने बसवली म्हणुन आज ही त्या मंदिरात मूर्ति आहे )

आता आपले काका इतके दुरून आले आहेत हे पाहून शिवाजी महाराज गहिवरले त्यानी संदेश धाडला "प्रताप गड वर पर्यंत चढत वगैरे बसु नका तुमचे गुड्घे दुखतील ना! त्यामुले मीच खाली येतो भेटायला". पुतण्याचे प्रेम पाहून खान काका सुखावले

भेटीची वेळ ठरली ... शिवाजी राजे गड उतरत असताना त्याना वाघ नख विक्रेता भेटला, सहज म्हणुन त्यानी ती विकत घेतली व हातात घातली. खान काका दिसले मीठी मारावी म्हणुन दोघे जवळ आले, अणि उंच असणा्र्‍या खानाच्या पोटापाशी लागणारे शिवाजी राजे मीठी मारत असताना त्यांच्या हातातील वाघ नखे चुकून चुकून खानच्या पोटात लागली.
ते पाहून संतापलेल्या कृष्णाजीने शिवाजी महाराजांवर तलवारीने वार केला( पहा बामण किती दुष्ट प्रवृत्तीचे असतात बहुजनांनो या लाघवी बामणांपासून सावध रहा कधी केसाने तुमचा गळा कापतील कळणारपण नाही) शिवाजी महाराजांनी क्षणाचा विलंब न करता त्या पापी ब्राह्मणाचे मुंडके उडवले..


तिकडे लगेच्या लगेच डॉक्टरला खानकाकांवर उपचार करण्यासाठी बोलावण्यात आले. अख्खा पोट शिवून देखिल काही झाले नाही... त्या डॉक्टर बामणाने लाघवी-प्रेमळ खान काकास वाचवले नाही "

Devendra म्हणाले...

प्रिय अ‍ॅश, सविस्तर प्रतिक्रिये बद्दल आभार. तु म्हणतेस त्या लेखाची ऑर्कुट वरची लिंक जरुर पाठव. मला वाचायला नक्कीच आवडेल.