१९ जाने, २०१०

हॅपी न्यू इअर २०१०


२६/ ११ च्या पार्श्वभुमीवर सन २००९ च स्वागत करताना मनात अनेक संमिश्र भावना होत्या.मुंबई वरचा दहशतवादी हल्ला सुरुवातीला अनेकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करुन गेला.पण हळूह्ळु या भीतीच चिडीमध्ये रुपांतर झाल.
दहशतवादी सहजपणे येतात काय, संपुर्ण मुंबई शहराला वेठीस धरतात काय आणि महाराष्ट पोलीस दलातील ३ वरिष्ठ अधिकार्यांसह अनेक निरपराध सर्व सामान्य माणसांचे प्राण किड्या-मुंग्याना चिरडावं अश्या सहजपणे घेतात काय , हे सर्व बघणं आणि सहन करण हे उद्वेग्जनक व केवीलवाण नाहीतर दुसर काय होत ?.या हतबलतेतून मनामध्ये चिड निर्माण होत गेली. या सर्व प्रकरणात लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणवणार्या प्रसारमाध्यामांच वर्तन अत्यंत उथळ आणि बेजबाबदार होत. लाइव्ह टेलिकास्ट्च्या नावा खाली जे काही आणि ज्या प्रकारे दाखवल गेल त्या वरुन दहशतवादी हल्ला म्हणजे मनोरंजनच जणु असच मिडीयाच वर्तन होत. चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी या प्रसंगाचा वापर करण्याची बेजबाबदार चढाओढ प्रत्येक चॅनलवर सुरु होती. त्या मानाने स्रर्व सामान्य माणूस , जो अश्या प्रसंगात मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भोगत असतो त्याच वर्तन मात्र जबाबदारीच व संयमाच होत.
जसे जसे दिवस उलटत गेले तस तस मुंबईतल जीवन आस्चर्यकारक गतीने पुर्वपदावर आलं. याला कोणी मुंबईच ’स्पीरीट’ म्हणतील . पण हे मुंबईकरांची हतबलता आणि काहीश्या प्रमाणातील असंवेदनशीलता या मुळे घडल आहे असे माझ मत आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनामुळे कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करायची सवयचं मुंबईकरांना झालेली आहे. डोळ्यांसमोर एखादी र्दुदॆवी घटना घटताना दिसली तरी वेळेचा खोळंबा होइल या भितीने कानाडोळा करायचा हा मुंबईकरांच्या स्वभावच झाला आहे.
पाहाता पाहाता १ जानेवारी २००९ आला.सर्वांन प्रमाणेच मुंबईकरांनी सुद्धा नेहमीच्याच जल्लोषात नववर्षाच स्वागत केलं. नववर्षाच स्वागत करताना खुपच थोड्या जणांनी २६ /११ च स्मरण केल असेल. स्रर्व सामान्य माणसाच्या जिवनात आनंदाचे क्षण एकंदरीतच फ़ारच कमी असतात. त्यामुळे तो बिचारा असे क्षण शोधतच असतो. प्रत्येक नविन वर्षाच स्वागत करताना पुढच्या वर्षात आपल्या जीवनात सर्व काही चांगलच घडणार आहे ही आशेची भावनाच तर त्याच्या मनाला उभारी देत असते नाही का ?
आत्ता नुकतच परत एकदा आपण सर्वांनीच आपल्या कल्पनेनुसार व ऎपतीनूसार नववर्षाच स्वागत केल आहे. मागच्या वर्षात आलेले वाईट अनुभव आणि घडलेल्या वाईट घटना यांना मागे टाकुन नव्या आशेने जिवनाला सामोरे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण मागच सर्व काही विसरायच म्हट्ल्याने विसरता येत नाही.आणि विसरायच म्हणजे त्या अनुभवातून काहीच शिकायच नाही असे तर नाही ना?.
गेल्याच वर्षात जागतीक मंदीचा सामना करावा लागला.आश्च्चर्य म्हणजे या जागतीक मंदीचा तडाखा अमेरिकेसारख्या महासत्तेला आणि पैशाचा जेथे धुर होतो अश्या दुबईला जास्त जाणवला.त्याचे बरेवाईट पडसाद भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सुध्दा उमटले.त्यामुळे महासत्ता होण्याच स्वप्न पाहाणार्या स्वनाळू भारतीयांना एका कठोर वास्तवाची जाणीव झाली की अमेरिकेच अंधानूकरण करुन महासत्ता होता येईलच असेच काही नाही .
ज्या प्रकारे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर दहशदवादाच्या भस्मासुराची जाणीव अमेरिकेला झाली त्याच प्रमाणे जागतीक मंदीमुळे आपल्या देशात देखिल सर्वकाही अलबेल नाही याच भान डोळे उघडे असलेल्या सगळ्यांनाच आलं. देशातील काही ठरावीक लोकांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नाही. आपल्या देशाला भविष्यात खरोखरच महासत्ता बनायच तर देशातला प्रत्येक नागरिक सुखी व संपन्न असला पाहीजे. हे करण्या साठी आपल्या विकासच मॉडेल आपली ताकद आणि कच्चे दुवे हे विचारत घेउन निश्चित कराव लागणार आहे.
याच काळात्त आपल्या महाराष्ट्रा सारख्या प्रगतीशिल राज्यात अनेक शेतकर्यांनी आत्मह्त्त्या केल्या याची आपल्या सगळ्यांना लाज वाटायला हवी. तेव्हा प्रगती म्हणजे काय? याचं सामाजीक द्रुष्टीकोनातून नव्याने विश्लेषण व्हायला हवं नाही का?
अंबानी,टाटा यांच्या सारख्या हाताच्या बोटांनी मोजता येणार्या भारतीयांनी जगातील पहिल्या १०० धनिकांमध्ये स्थान मिळवल म्हणजे प्रगती का?. त्यांच्या श्रीमंतीचा हेवा नाही पण त्याच वेळी देशातला सर्वसामान्य माणसाच्या जिवनाचा स्तर उंचवत नसेल तर.......................
तेव्हा देशाचा विकास होताना निश्चित धोरण काय असाव याचा आपण सर्वांनीच नविन वर्षात प्रवेश करताना वेळात वेळ काढुन विचार केला पाहिजे. लोकसंख्या बेसुमार पणे वाढत आहे. देशात अजुनही निरक्षरांची संख्या खुप आहे. बेरोजगारंचे तांडे निर्माण होत आहेत. उत्पादन क्षेत्रात देशाची अधोगतीच होत आहे हे मोठ्या प्रमाणात बंद होणार्या कारखान्यांवरुन व लघु ऒद्यॊगीक क्षेत्रातील बंद पडत जाणार्या उद्योगांवरुन सिद्धच होत आहे.
अर्थातच या निराशेच्या ढगांना रुपे्री कडा देखिल आहे. आपल्या देशाच्या निव्वळ सकळ उत्पन्नात संथपणे पण निश्चितपणे वाढ होत आहे. संगणक क्षेत्रात भारतीयांचा दबदबा अजुनही कायम आहे. टाटांनी बनवलेली नॅनो कार ही देशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत वर्चस्व देर्शवते.एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री हजारो लघु उद्योगांना जन्म देते हे लक्षात घेतलं तर याच महत्व लक्षात येईल.तेव्हा या सारख्या अनेक गोष्टी देशाची प्रगती संथपणे पणे का होईना आहे याची आशादायक जाणीव करुन देत आहे.
या नविन वर्षाच स्वागत करताना मागच्या वर्षातील इतर अनेक लहान मोठ्या घटनांचा उल्लेख करायचा मला मोह होत आहे पण तो आर्वजून टाळत आहे. कारण एखादी घटना लहान आहे की मोठी हे फ़ार व्यक्तीसापेक्ष बाब आहे. मला वाटणारी एखादी महत्वाची घटना तुम्हाला पण महत्वाची वाटेल असच काही नाही. असो
तेव्हा येत नविन वर्ष हे तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख , समृध्दी , आरोग्य आणि शांती घेवून येवो याच मनपुर्वक शुभेच्छा.
आपला
मैत्रेय१९६४

२ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

मैत्रेय खरेच आहे तुझे म्हणणे... मुंबईचे स्पिरिट- का मुंबईकरांची हतबलता. याचा अर्थ घरात रडत-दुबकून बसावे असा नसला तरी भीती पाठ सोडत नाही. आढावा घेण्याचा प्रयत्न आवडला. एखादी घटना लहान का मोठी ही व्यक्तिसापेक्ष बाबच- तसेच कुठली घटना कोणावर कसा परिणाम करून जाईल.... आणि त्या अनुषंगाने प्रगती/अधोगती करेल हेही व्यक्तीसापेक्षच. बाकी २००८-२००९ वर्षे अनेक मतांना/सत्तांना सुरूंग लावणारीच ठरली. जीवन हे क्षणभंगूर आहेच. जगणे तर सोडाच पण जगात शाश्वत असे काहीच नाही.

Devendra म्हणाले...

श्री,
तात्काळ दिलेल्या प्रतिसादा बद्द्ल आभार. असेच काहीबाही लेहिले तरी तु किमान नक्कीच वाचशील याने उत्साह वाढलाय.
मैत्रेय१९६४