१९ जाने, २०१०

मनोगत

मनोगत

मी दिनांक १३..२००९ रोजी ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली. वाटल होत सुरुवात केली आहे तर पुढेही आपसुक लिहील जाईल. पण कसल काय. आरंभशुर माणसाच होत तसच माझही झाल. आज लिहीन उद्या लिहीन अस करता करता दिवस गेले, महिने गेले पण मला काही मुहुर्त मिळाला नाही.

मनात अनेक विचार होते पण ते सुसंगतवार मांडता येतील का याची मनात शंका होती... खरंतर आत्त्ताही आहेच.ब्लॉगवर लिहायची सुरुवात करताना मनात इतकच होत की मनातल लिहीव आणि आपल्या सारखा विचार दुसर कोणी करत असेल तर संवाद साधावा. हे करताना काही वेळा मतभिन्नता असेल तर ती पण जरुर कळावी .जेणेकरुन माझी मते कुठेकाही चुकत असतील तर नव्याने तपासुन पहाता येतील.अर्थात लिहायला सुरुवात केली की लगेचच संवादाला सुरुवात होइल असा भ्रम मनात नक्कीच नव्हता आणि नाही.पण मी लिहीन त्याला कुठुनतरी प्रतिसाद नक्कीच मिळेल अशी आशा मात्र मनात होती.

हे सगळ मनात नक्कीच असुनही मी नियमीत लिहीण्यास कमी पडलो हे कबुल करतो. आजही हे सगळ लिहीत असताना मन साशंक आहे कारण कुठलिही गोष्ट सातत्याने न करण्याचा माझा स्वभाव. तरीही नसलेली चिकाटी बळेबळे आणुन मी माझा ब्लॉग लिहीत आहे.

या नविन वर्षात खुप नाही पण थोडेफ़ार तरी नक्कीच लिहीन असा संकल्प केला आहे. हा संकल्प दरवर्षीच्या संकल्पाप्रमाणॆ विरुन जाणार नाही ही आशा आहे.ही आशाच तर नविन वर्षात प्रवेश करताना जगण्याला नविन उमेद देत असते नाही का?

तेव्हा या वर्षात अधुनमधुन आपण निश्चितच भेटु हे प्रामाणिक आश्वासन

आपला

मैत्रेय१९६४

1 टिप्पणी:

भानस म्हणाले...

मैत्रेय तुझ्या नवीन वर्षाच्या सगळ्या संकल्पांसाठी शुभेच्छा. खासकरून लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा! तू आश्वासन पाळशीलच तेव्हां....वाचण्यास उत्सुक आहेच.:)