देव आनंद यांच्या निधना नंतर प्रतिक्रिया देताना संगितकार खय्याम म्हणाले,
" देव आनंद यांच्या अचानक जाण्याने खुप धक्का बसला." अश्याच प्रकारच्या प्रतिक्रिया खुप जणांनी दिल्या आहेत. वास्तविक पाहाता ८८ वर्षांच्या वयाच्या माणसाचं निधन म्हणजे अचानक बसलेला धक्का असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण हे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत खरं असलं तरी देव आनंद यांच्या बाबतीत लागु होतं नाही.
देव आनंद म्हणजे मुर्तीमंत उत्साह.
गेले काही वर्षे ते जितक्या उत्साहाने नविन नविन चित्रपट काढत होते तितक्याच निरुत्साहाने प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांना प्रतिसाद देत होते. पण त्याचा कुठलाही परीणाम देवसाब यांच्यावर झाला नाही. परवाच्या, कालच्या आणि आजच्या अश्या तिन पिढ्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांनी आनंद दिला आहे. आणि खात्री आहे पुढच्या पिढीलाही त्यांचे चित्रपट आनंद देणार आहेत. कारण देवसाब यांच्या चित्रपटांचा आनंद लुटायचा असेल तर अट एकच ते म्हणजे मनाने तरूण असणं.
देवसाब जीवन जगले ते काळाबरोबर.
त्यांनी कधिही मागच्या काळाच्या आठवणी काढुन उसासे टाकल्याचं ऐकीवात नाही. त्यांच्या जगण्याच वर्णन त्यांच्याच चित्रपटा मधिल गाण्यामधुन व्यक्त होतं. ते म्हणजे," मै जिंदगी का साथ निभांता चला गया,हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........."
1 टिप्पणी:
मै जिंदगी का साथ निभांता चला गया,हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया........."हे देव आनंद ला एकदम फिट्ट बसत तो होता तसाच
टिप्पणी पोस्ट करा