१ मे, २०१०

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

                 आज १ मे २०१० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त्याने महाराष्ट्र शासन तसेच राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांनी कार्यक्रम आयोजीत केले आहेत. तसेच गेल्या आठवडाभर दुरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रामधुन राजकीय नेते आणि विचारवंत यांनी महाराष्ट्राच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा मांडला आहे.या सर्वांनी मांडलेली मते आणि आपल्या राज्याची सांप्रत स्थीती या बद्दल निरक्षिरवृत्तीने विचार करण्यास आपण सगळे सक्षम आहातच.
                  तेव्हा ५० वर्षाच्या वाटचाली नंतर अपेक्षित असलेल महाराष्ट्र राज्याच चित्र आणि वास्तविकता याचा विचार आजच न करता अत्यंत आनंदाने आणि गौरवाने आपल्या राज्याचा ५० वा वाढदिवस घराघरात साजरा करुया.
                   माझ्यावतीने जगभरातील सर्व मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.


                                                                                         आपला
                                                                                      मैत्रेय१९६४.

२ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

नमस्कार मैत्रेय,

तुमच्या ब्लॉगचं ओळखचिन्ह माझ्या ब्लॉगवर जोडलं आहे. आपण पुन्हा त्या दुव्यावर पाहू शकता. http://www.mogaraafulalaa.com/2010/04/blog-post_01.html

आपल्याकडे ओळखचिन्हाची इमेज तयार नसल्याने मी माझ्याकडील एक इमेज तेथे तात्पुरती टाकली आहे. आपल्या ब्लॉगचं ओळखचिन्ह तयार झालं की मला नवीन इमेज द्या. मी ती या पोस्टमधे सुधारून घेईन.

जर आपल्याला हीच इमेज आवडली असेल, तर इतर ब्लॉग्सवर लावण्यासाठी त्याचा कोड मी आपल्याला ईमेलमधे पाठवला आहे.

धन्यवाद!