या सर्वाला नक्की कधी
सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण दोन वर्षा पेक्षा जास्त काळ नक्कीच झाला असावा.सुरूवातीला
हे सर्व करण्याची इच्छा वारंवार होत नव्हती तो पर्यन्त जाणवल नाही. पण पाहता
पाहाता या सर्वांची इतकी सवय झाली की दारू नियमितपणे पिण्यार्या माणसाला वेळेवर
दारू मिळाली नाही की तो जसा बैचेन होतो तस व्हायला लागलं.
त्यातच मार्च एंड झाला अन
कामाच्या ताणातून काहीसा relief मिळाला. तेव्हा तर या सगळ्यांची जास्तच जास्त आठवण व्हायला लागली.
रिकाम मन सैतानाच घर म्हणतात ते खरच आहे. सकाळी उठल्यावर,
ट्रेनची वाट पाहताना , गाडीत बसायला मिळाल्यावर , ऑफिस मध्ये सकाळचा चहा घेताना, लंच टाइम मध्ये , ऑफिस मधून बाहेर पडण्या पूर्वी , परत परतीच्या
ट्रेनची वाट पाहताना, ट्रेन मध्ये उभ असताना , सुदैवाने बसायला मिळालच तर बसल्यावर, घरी पोहचल्यावर
, जेवताना , मालिका पाहताना अन झोपण्या
पूर्वी अगदी शेवटचं अस ठरवून परत ऐकदा असा
एकच चाळा तो म्हणजे ............
WhatsApp वरचे मेसेज
पाहणं अन त्यावर comments करण.....
अन त्यातही अजून वेळ मिळाला
तर Facebook, yahoo अन google सोबतीला होतच
की..............
आजूबाजूला पाहिल अन थोड घरात
लक्ष देवून पाहिलं तर माझ्या सारखीच बहुतेक सर्वांची अवस्था..
पूर्वी ही yahoo , Hotmail इत्यादि messengers वा email चा वापर होत नव्हता अस नाही. पण त्या साठी
cyber cafe वा घरी internet connection आवश्यक असल्याने या सगळ्या गोष्टी
वापरण्यावर काहीश्या मर्यादा होत्या.
पण android phone
आल्या नंतर आभासी ( Virtual) जगाशी सहजतेने connect होण जास्त
सोप होऊन गेल आहे.
WhatsApp ने तर कहरच झाला आहे. अत्यंत सुलभतेने message forward करता येवू लागले आहेच. नवीन फोन च्या touch screen मुळे एका वेळी एका पेक्षा अधिक जणांना तसेच अनेक message एकाच वेळी forward म्हणजे ऐका “टिचकीचा” खेळ झाला आहे.
त्यातच WhatsApp वरचे group म्हणजे सहन होत नाही अन सांगता येत नाही ही अवस्था. एखादा group create करताना काही चांगला हेतु ठेवून ते केले
जातात. त्या मध्ये समान परिस्थितीतल्या वा
विचारांच्या लोकांनी एकत्र येवून “मनकी
बाते” share करावी ही रास्त अपेक्षा असते. पण forwarded message forward करणे या
पेक्षा अधिक काही होत नाही हा माझ्या सारखाच अनेकांचा अनुभव असेल . त्यातही बहुतेक message इतके repeated असतात की
ते वाचण्याची तसदी घेण्याचा प्रश्नच नसतो.
Group create होतो. Admin अर्थात group स्थापक मोठ्या उत्साहाने members add करत जातो. त्यामुळे काही कारणास्तव संपर्कात
नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्याशी
संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध होत . सुरुवातीच्या उत्साहात संवाद सुरू होतोही
पण नंतर नंतर बरेच members inactive
होत जातात. वाद झाला म्हणून तस होत असेल तर समजू शकतो. पण तस नसल तरीही 100
जणांच्या group मधले फक्त 10 ते 12 members active अन
दोन तीन hyper active असतात
असाच माझा अनुभव आहे .. कोणाचा वेगळा अनुभव असेल तर आश्चर्यच म्हणावं लागेल. हे Hyper active members इतका forwarded messages चा भडिमार करतात की त्यांना सांगवस वाटत
की “जानी, हम भी बहोत सारे WhatsApp group मे रहते है”.
Members inactive होतात याच महत्वाच कारण म्हणजे संपर्कात
नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्या priorities बदललेल्या असतात आणि interest देखील बदललेले असतात
हेच असाव. पण आपल्या मनात मात्र त्यांच्या बद्दल प्रत्यक्षाहून मनातली प्रतिमा
उत्कट अशीच काहीशी चुकीची कल्पना असते. जुन्या मित्र-मैत्रिणी यांच्या बाबतीत हे
प्रकर्षाने होत .
या सर्वांची मला गेले काही काळ जाणीव होत होती तस जाणवलं की मादक
पदार्थांची सवय लागावी तशीच WhatsApp सारख्या आभासी जगाची मला
सवय लागली आहे. Addiction म्हणजे दुसर काय असत. मग रविवारि
रात्री विचार केला की किमान दोन या आभासी जगा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करूया.
आज बुधवार आहे .ठरवल्या प्रमाणे दोन दिवस मी आभासी जगापासून पूर्ण
दूर आहे. प्रामाणिक पणे सांगतो हे दोन दिवस मला फार कठीण गेले. सारखा फोन कडे हात जायचा
अन net pack open करून WhatsApp वरचे messages वाचायची प्रबळ इच्छा व्हायची. दारू
पिणार्याची दारू न मिळाल्याने होणारी तगमग
अन आभासी जगा पासून दूर राहिल्याने
माझी झालेली तगमग यात काहीच फरक
नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली................
तेव्हा सत्या पासून दूर पाळण्यासाठी मादक पदार्थांचा वापर करण अन
आभासी जगात रमण यात फरक तो काय?. हा या दोन दिवसांच्या आभासी
विपश्यनेतून मिळालेला हा आत्मबोधच
म्हणायला हवा.
असो ....विपश्यना संपली.... परत एकदा net pack open करणार आहे या सुखद कल्पनेनेच
हाताला कंप सुटला आहे. हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.
आहा....झाला झाला net pack open झाला.
सुविचारांचे messages
वाचून मला स्वत:ला परत charge करणार आहे.......
राजकारणावर, धर्मावर अन अर्थकारणावर आपली मौलिक ? अन अभ्यासू ???? मत हिरारीन अन त्वेषान मांडणार आहे
कविता , वैचारिक लेख अन बरच काही forward करून माझ्या अस्तित्वाची
परत एकदा जाणीव करून देणार आहे.
अन तिने forward केलेले प्रेम संदेश वाचून परत एकदा
बेदुंध होणार आहे.
……………………………………
अरे हो आत्मबोधाच काही तरी म्हणताय तुम्ही……..
कुठला आत्मबोध
अरे खड्ड्यात गेला तो आत्मबोध ........
**** कोणीतरी म्हटलच आहे की .......
खरे ते एकची message कर्म
Messages forward करत राहावे
Message तोच फिरून आल्यास
न चुकता forward च करावा
ऐसा जो पाळील आभासी धर्म
तोच WhatsApp वर नेहमी लोकप्रिय